आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीच्या नवरात्राला सुरूवात होते या दिवसात आदिशक्तीची उपासना केली जाते तेजस्वरुपाची, शक्तीची उपासना केली जाते श्री महालक्ष्मी ही मुख्य देवता असून श्री महाकाली, श्री महासरस्वती ही तिचीच प्रासंगिक रुपं आहेत इतर नावांनीही या त्रिशक्ती प्रसिद्ध आहेत नवरात्रीत या देवीच्या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते या नवरात्रीनिमित्त हिंदुस्थानातील काही मंदिरांविषयी थोडंसं
* चंडिका मंदिर
कोकणात दापोली-दाभोळ रस्त्यावर (२३ कि.मी.) दाभोळच्या अलीकडे दगडाच्या काळ्या काताळांत चंडिका देवीचे भूमिगत मंदिर आहे. बाहेर फक्त दगडी कातळ आहे पण डोंगरात ताशीव काम करून मंदिराचे प्रांगण करण्यात आले आहे. हे पांडवकालीन देवी मंदिर आहे. एखाद्या गुहेत शिरावे तसे काळ्याकुट्ट अंधारातून आपण खाली येतो. आत पाण्यातून चालत आपण अंदाज घेत मूर्तीसमोर येतो.
* कच्छची आशापुरा
भक्तांच्या आशाआकांक्षा पूर्ण करणारी, भक्तांचे अत्यंत आदराचे व श्रद्धेचे ठिकाण म्हणजे कच्छची
‘आशापुरा’. कच्छ (गुजरात) व सिंध (पाकिस्तान) मधील जवळिकी (धार्मिकदृष्ट्या) सांगणारे हे देवीचे श्रद्धास्थान. भूजपासून आखाताकडे जाणार्या राज्य मार्गावर ९५ कि.मी.वर वसलेले मातानुमद (मातेचा मठ) हे ठिकाण. येथील देवी फक्त कमरेपर्यंतच वर आलेली आहे. एक आख्यायिका त्यामागे आहे. (माहुरची रेणुका व अंबाजोगाई अंबाभवानीदेखील पूर्ण स्वरूपात वर आलेली नाही.) देवीचे मंदिर छोटेसेच, पण आकर्षकपूर्वक संगमरवराचे आहे. त्रिदेवीचे आशापुरा हे एकच स्वरूप आहे. कच्छची मालकीण (देवी) म्हणून भक्तांच्या हृदयात वास करून आहे. सिंधमधील प्रसिद्ध असलेल्या हिंगलाज देवीचे हे द्वितीय स्वरूप आहे. येथे वर्षातून तीनवेळा नवरात्रोत्सव संपन्न होतो. जैन धर्मीयांची ही कुलदेवता आहे.
मनालीची हिडिंबा
मनालीच्या दाट वृक्षराजीतील देवीचे पुरातन मंदिर मनालीचे मोठे भूषण आहे. भीमपुत्र घटोत्कचाची आई दैत्यपुत्री हिडिंबेने दुर्गेची तपश्चर्या केली व तिला देवत्व पावले. दगडी व लाकडी बांधणीचे पॅगोडा प्रकारचे छोटेसे मंदिर फारच आकर्षक आहे. मंदिराचे प्रवेशद्वार छोटे असल्याने आत वाकूनच प्रवेश करावा लागतो. मंदिरावरील नक्षीकाम अप्रतिम आहे. आत देवीची छोटी मूर्ती आहे. सोबत अन्य देवताही आहेत. नवरात्रीत येथे मोठा उत्सव असतो.
देशनोकची करणीमाता
बिकानेर-जोधपूर मार्गावर देशनोक नावाचे छोटेसे रेल्वेस्थानक आहे. तेथे जवळच करणीमातेचे मंदिर आहे. भक्तांचे ते मोठे श्रद्धास्थान आहे. छोटेसे किल्लास्वरूप मंदिरवास्तू आहे. १३८७ला जोधपूर
जिल्ह्यातील फाळोडीजवळील सुरण गावातील बहुकन्यका असलेल्या घरात दुर्गेने जन्म घेतला. लहानपणापासून अनेक चमत्कार करून व भक्तांना सुपथावर लावून १५१ वर्षांनी तिने आपली अवतार समाप्ती केली. मंदिर परिसरात राखाडी रंगाचे उंदिर बिनधास्तपणे फिरत असतात. देवीपुढे ठेवलेल्या परातीमधील खीर ते पितात. तेथे त्यांना पूर्ण अभय आहे. आत कुत्रा वा मांजर येत नाही. हे उंदिर पूर्वाजन्मीचे पुजारी असल्याची भक्तांत भावना आहे. मंदिरातील पुजारी मृत्यूनंतर उंदिर बनून देवीच्या सहवासात राहतात असे समजते. बिकानेरपासून देशनोकसाठी भरपूर बससेवा उपलब्ध आहे.
* एकवीरा देवी व अंबामाता
हजारो वर्षांपासून विदर्भाचे महान शक्तिस्थान असलेली एकवीरा देवी आहे. ती अंबाबाईची मोठी बहीण समजली जाते. अंबाभवानीच्या दक्षिणेस अंबानाल्याच्या पलीकडे या देवीचे स्थान आहे. एकवीरा देवीची स्थापना महान तपस्वी सद्गुरू जनार्दन स्वामींनी केली. सप्तशती पाठाच्या प्रारंभीच एकवीरा देवीच्या अवताराची कहाणी दिसते. माहूरच्या रेणुकेचे हे स्वरूप आहे. असेच स्वरूप नगर व पुण्याजवळील कार्ल्याजवळच आहे. रेणुकेच्या पाच पुत्रांत परशुराम हा धाकटा पराक्रमी पुत्र. हा एकच वीर पुत्र जन्मल्याने रेणुकेला एकवीरा म्हणून भूतलावर ओळखू लागले. ही देवी कायस्थ, पाठारे प्रभू, कोळी आदींची कुलस्वामिनी आहे. ती उग्र स्वरूपाची असून रक्तदंती, नीलवर्णी, मोठे विशाल डोळे असलेली आहे. तिच्या हातात शस्त्रे आहेत. ही ब्रह्मरूपिणी अयोनिसंभवा होती. याच अमरावतीपासून ४२ कि.मी. अंतरावर वर्धा नदीकाठी ‘कौंडिण्यपूर’ आहे. रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी करण्याचे योजिले होते पण रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णालाच मनोमन वरले होते. रुक्मिणी अंबामातेचे दर्शन घेण्यासाठी आली असताना पूर्वनियोजित ठरल्याप्रमाणे खिडकीच्या बाहेर तयार ठेवलेल्या रथात घालून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले. मंदिर पुरातन असून ती खिडकी आजही त्या घटनेची साक्षीदार आहे. मंदिर पूर्ण दगडी असून आत गारवा जाणवतो.
- रामकृष्ण अभ्यंकर
सौजन्य:- देव्हारा, सामना २६०९२०११.
* चंडिका मंदिर कोकणात दापोली-दाभोळ रस्त्यावर (२३ कि.मी.) दाभोळच्या अलीकडे दगडाच्या काळ्या काताळांत चंडिका देवीचे भूमिगत मंदिर आहे. बाहेर फक्त दगडी कातळ आहे पण डोंगरात ताशीव काम करून मंदिराचे प्रांगण करण्यात आले आहे. हे पांडवकालीन देवी मंदिर आहे. एखाद्या गुहेत शिरावे तसे काळ्याकुट्ट अंधारातून आपण खाली येतो. आत पाण्यातून चालत आपण अंदाज घेत मूर्तीसमोर येतो.
* कच्छची आशापुरा
भक्तांच्या आशाआकांक्षा पूर्ण करणारी, भक्तांचे अत्यंत आदराचे व श्रद्धेचे ठिकाण म्हणजे कच्छची
‘आशापुरा’. कच्छ (गुजरात) व सिंध (पाकिस्तान) मधील जवळिकी (धार्मिकदृष्ट्या) सांगणारे हे देवीचे श्रद्धास्थान. भूजपासून आखाताकडे जाणार्या राज्य मार्गावर ९५ कि.मी.वर वसलेले मातानुमद (मातेचा मठ) हे ठिकाण. येथील देवी फक्त कमरेपर्यंतच वर आलेली आहे. एक आख्यायिका त्यामागे आहे. (माहुरची रेणुका व अंबाजोगाई अंबाभवानीदेखील पूर्ण स्वरूपात वर आलेली नाही.) देवीचे मंदिर छोटेसेच, पण आकर्षकपूर्वक संगमरवराचे आहे. त्रिदेवीचे आशापुरा हे एकच स्वरूप आहे. कच्छची मालकीण (देवी) म्हणून भक्तांच्या हृदयात वास करून आहे. सिंधमधील प्रसिद्ध असलेल्या हिंगलाज देवीचे हे द्वितीय स्वरूप आहे. येथे वर्षातून तीनवेळा नवरात्रोत्सव संपन्न होतो. जैन धर्मीयांची ही कुलदेवता आहे. मनालीची हिडिंबा
मनालीच्या दाट वृक्षराजीतील देवीचे पुरातन मंदिर मनालीचे मोठे भूषण आहे. भीमपुत्र घटोत्कचाची आई दैत्यपुत्री हिडिंबेने दुर्गेची तपश्चर्या केली व तिला देवत्व पावले. दगडी व लाकडी बांधणीचे पॅगोडा प्रकारचे छोटेसे मंदिर फारच आकर्षक आहे. मंदिराचे प्रवेशद्वार छोटे असल्याने आत वाकूनच प्रवेश करावा लागतो. मंदिरावरील नक्षीकाम अप्रतिम आहे. आत देवीची छोटी मूर्ती आहे. सोबत अन्य देवताही आहेत. नवरात्रीत येथे मोठा उत्सव असतो. देशनोकची करणीमाता
बिकानेर-जोधपूर मार्गावर देशनोक नावाचे छोटेसे रेल्वेस्थानक आहे. तेथे जवळच करणीमातेचे मंदिर आहे. भक्तांचे ते मोठे श्रद्धास्थान आहे. छोटेसे किल्लास्वरूप मंदिरवास्तू आहे. १३८७ला जोधपूर
जिल्ह्यातील फाळोडीजवळील सुरण गावातील बहुकन्यका असलेल्या घरात दुर्गेने जन्म घेतला. लहानपणापासून अनेक चमत्कार करून व भक्तांना सुपथावर लावून १५१ वर्षांनी तिने आपली अवतार समाप्ती केली. मंदिर परिसरात राखाडी रंगाचे उंदिर बिनधास्तपणे फिरत असतात. देवीपुढे ठेवलेल्या परातीमधील खीर ते पितात. तेथे त्यांना पूर्ण अभय आहे. आत कुत्रा वा मांजर येत नाही. हे उंदिर पूर्वाजन्मीचे पुजारी असल्याची भक्तांत भावना आहे. मंदिरातील पुजारी मृत्यूनंतर उंदिर बनून देवीच्या सहवासात राहतात असे समजते. बिकानेरपासून देशनोकसाठी भरपूर बससेवा उपलब्ध आहे.* एकवीरा देवी व अंबामाता
हजारो वर्षांपासून विदर्भाचे महान शक्तिस्थान असलेली एकवीरा देवी आहे. ती अंबाबाईची मोठी बहीण समजली जाते. अंबाभवानीच्या दक्षिणेस अंबानाल्याच्या पलीकडे या देवीचे स्थान आहे. एकवीरा देवीची स्थापना महान तपस्वी सद्गुरू जनार्दन स्वामींनी केली. सप्तशती पाठाच्या प्रारंभीच एकवीरा देवीच्या अवताराची कहाणी दिसते. माहूरच्या रेणुकेचे हे स्वरूप आहे. असेच स्वरूप नगर व पुण्याजवळील कार्ल्याजवळच आहे. रेणुकेच्या पाच पुत्रांत परशुराम हा धाकटा पराक्रमी पुत्र. हा एकच वीर पुत्र जन्मल्याने रेणुकेला एकवीरा म्हणून भूतलावर ओळखू लागले. ही देवी कायस्थ, पाठारे प्रभू, कोळी आदींची कुलस्वामिनी आहे. ती उग्र स्वरूपाची असून रक्तदंती, नीलवर्णी, मोठे विशाल डोळे असलेली आहे. तिच्या हातात शस्त्रे आहेत. ही ब्रह्मरूपिणी अयोनिसंभवा होती. याच अमरावतीपासून ४२ कि.मी. अंतरावर वर्धा नदीकाठी ‘कौंडिण्यपूर’ आहे. रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी करण्याचे योजिले होते पण रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णालाच मनोमन वरले होते. रुक्मिणी अंबामातेचे दर्शन घेण्यासाठी आली असताना पूर्वनियोजित ठरल्याप्रमाणे खिडकीच्या बाहेर तयार ठेवलेल्या रथात घालून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले. मंदिर पुरातन असून ती खिडकी आजही त्या घटनेची साक्षीदार आहे. मंदिर पूर्ण दगडी असून आत गारवा जाणवतो. - रामकृष्ण अभ्यंकर
सौजन्य:- देव्हारा, सामना २६०९२०११.


पुण्याची ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी देवीची ख्याती जगभर पोहोचली आहे. नवरात्रीमध्ये तर देवीच्या मंदिरामध्ये भाविकांचा अक्षरश: पूर लोटतो. तांबडी जोगेश्वरी देवीचे वैशिष्ट्य म्हणजे नऊ दिवस देवीची विविध वाहनांवरील साकारण्यात येणारी रूपे. अर्थात दरवर्षी ही रूपे बदललीही जातात. प्रत्येक दिवशी वेगळी साडी आणि सजावटही नवी असते. जशी साडी आणि तिचे रूप त्याला साजेसे दागिने देवीला घालते जातात. महालक्ष्मीचे रूप असले की कोल्हापुरी साज, तोडे असे पांरपरिक पद्धतीच्या सोन्याच्या दागिन्यांनी देवीला सजविण्यात येते. बहुतांश सोने आणि मोत्याच्या प्रकारातील दागिने असतात. देवीला सजविण्याचे काम मंदिराचे पुजारीच करतात अशी माहिती तांबडी जोगेश्वरी मंदिराचे ज्ञानेश बेंद्रे यंानी दिली.


डाळींबामुळे पचनशक्ती वाढते, तोंडाला चव येते हे ह्रदयरोगावर उपयुक्त आहे डाळींबात असे अनेक औषधी गुणधर्म आहेत
अचानकपणे नाकातून, हिरड्यांतून किंवा त्वचेच्या कुठल्याही भागातून अनियंत्रित रक्तस्त्राव होण्याच्या समस्या ही बर्याचदा आय.टी.पी. या आजाराची लक्षणे असू शकतात. आयटीपी म्हणजेच इम्युन थ्रम्बोसायटोपेनिक पुर्परा हा आजार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये विशेषत: आढळतो.
संगीत म्हणजे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. ऑफिसमध्ये किंवा घरी अगदी थेट प्रवासातदेखील जर तुमच्याबरोबर तुमचा संगणक आणि इंटरनेट असेल तर तुम्ही कुठेही तुमचे आवडीचे गाणे ऐकू शकता. सध्या इंटरनेटवरील अनेक लोकप्रिय ऑनलाइन म्युझिक संकेतस्थळांवरून तुमचा आवडीचा कलाकार किंवा चित्रपट किंवा संगीत दिग्दर्शक अशा कोणत्याही पर्यायाचा वापर करून तुमचे आवडीचे गाणे ऐकू शकता. इंटरनेटवर अनेक मराठी चित्रपटांचीदेखील गाणी आपण ऑनलाइन ऐकू शकता.
बिल गेटस्चे संगणकावर ‘लाईव्ह टीव्ही’चे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे व सध्या इंटरनेटवर अनेक संकेतस्थळांवर आपण ऑनलाइन टीव्हीचा मनमुराद आनंद घेऊ शकतो व त्यासाठी तुम्हाला कोणत्याही हार्डवेअर डिव्हाईसची गरज पडत नाही. फक्त संगणक व इंटरनेट एवढ्याच गोष्टींचा वापर करून तुम्ही तुम्हाला हवा तो चॅनेल व हवा तो कार्यक्रम थेट इंटरनेटवर बघू शकता. ऑनलाइन टीव्ही सेवा देणारी बहुतांशी संकेतस्थळे मात्र हिंदुस्थानबाहेरची आहेत.
आपण आपल्या घरातील रेडिओ किंवा मोबाईल फोनमधील एफएमप्रमाणेच संगणकावर इंटरनेटचा वापर करून कोणत्याही एफएम रेडिओ चॅनलवरील हवे ते गाणे किंवा हवा तो कार्यक्रम ऐकू शकतो. ऑनलाइन एफएम वरील गाणे ऐकण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या संगणकाला इंटरनेटव्यतिरिक्त स्पीकर किंवा हेडफोन्सची गरज लागते. इंटरनेटवरील एफएम रेडिओवर थेट एफएम रेडिओपेक्षा जास्त स्पष्टता अनुभण्यास मिळते. त्याचबरोबर आपण कोणताही रेडिओ चॅनल पाहिजे तेव्हा लावू शकतो. सध्या इंटरनेटवर अनेक देशी व विदेशी संकेतस्थळांवर ऑनलाइन एफएम रेडिओची सोय देण्यात आली आहे.
आजच्या ई-युगातील इंटरनेटवरून केली जाणारी कोणतीही खरेदी-विक्री सुरक्षित करण्याचे नवे तंत्रज्ञान म्हणजे ‘२FA’ (टू फॅक्टर ऑथेंटिकेशन) हे ई-युगातील व्यवहार सुरक्षित करण्यासाठी प्रभावी अस्त्र आहे. ‘‘तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करून कोणतेही ऑनलाइन व्यवहार करणार असाल तर तुमच्याकडे ‘२FA’ आहे याची खात्री करून घ्या व त्यानंतरच इंटरनेटवरून कोणताही ऑनलाइन व्यवहार करा.
भाद्रपद महिन्यातील अमावास्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात. या तिथीला सर्व पितरांना श्राद्ध घालतात. श्रद्धेने करावयाचे ते श्राद्ध. असा हा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला कुळाचार आहे. भाद्रपद कृष्णपक्ष हा पंधरवडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपले निकटवर्तीय ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला या पंधरवड्यात श्राद्ध घातले जाते. आपले मृत पूर्वज म्हणजेच पितर होय. या तिथीला काही धार्मिक विधींची परंपरा आहे. हा पंधरवडा म्हणजेच पितृपक्ष वा श्राद्धपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या तर्पणाचा पक्ष. तर्पण करावयाचे म्हणजे श्रद्धेने, मनोभावाने तृप्त करावयाचे.
Anant Chaturthi (or Anant Chaturdashi) is the last day of the “Ganesh festival” celebrated in Maharashtra, Gujarat, Karnataka and Andhra Pradesh. It is the tenth day after Ganesh Chaturthi which falls on the 14th day of the bright Bhadrapada (the sixth month of Hindu calendar). The day follows the immersion of the idols of the beloved Lord but to be welcomed the next year with equal fervor. Some people observe a vow in honour of Lord Vishnu, which if kept for 14 years is supposed to bring wealth.
डिजिटल कॅमेर्यामध्ये जुन्या कॅमेर्याच्या तुलनेत असंख्य नवीन वैशिष्ट्ये आहेत. त्यातील काही प्रमुख वैशिष्ट्यांवर डिजिटल कॅमेरा घेताना लक्ष ठेवावे लागते.