‘आमची कुठेही शाखा नाही’ला मोडून काढताना सुरेखा वाळके या अस्सल ‘मालवणी’ आईने मालवणमधल्या फॉर्मात चालणार्या ‘हॉटेल चैतन्य’ची एक शाखा तीन वर्षांपूर्वी दादरनजीकच्या आगरबाजार मार्केटसमोर उघडली... आणि अस्सल मालवणीपणा जपत मुंबईकर खवय्यांना मालवणी आग्रहाने वाढून तृप्त केले... त्यामुळे खवय्यांच्या लिस्टमध्ये सध्या ‘हॉटेल चैतन्य’ टॉपवर आहे म्हटल्यास हरकत नाही...
‘हॉटेल चैतन्य’ची सुरमई म्हणा किंवा कालवं म्हणा, येतात थेट मालवणहून. शेवटी पाण्याची म्हणून एक चव असतेच. फक्त मालवणी मसाले वापरले म्हणजे ‘मालवणी’ चव आली असे होत नाही... त्यासाठी पाण्यालाही त्या मातीची, तिथल्या मौसमाची चव असावी लागते... सुरेखा वाळके यांनी हे लक्षात घेऊनच त्यांची स्वत:ची रेसिपी तयार केली... मासेच नव्हे तर मालवणी जेवणात प्रामुख्याने वापरला जाणारा नारळही थेट मालवणातून आणतात. त्यामुळे इथली मालवणी नारळाच्या दुधात बनवलेली सोलकढी असो किंवा स्वीटमधली खीर, नाचणी हलवा, मोदक, पातोळ्या, काकडीचे धोंडस...कितीही भरपेट खाऊन घेतले तरी मन भरत नाही.
साधारण फिशची थाळी दीडशेपासून माशाच्या आकाराप्रमाणे ३०० पर्यंत जाते, पण एकदा का थाळीची ऑर्डर गेली की खवय्याने पोट भरेपर्यंत खात राहायचे. मच्छी किंवा सागुती सोडल्यास सर्व काही अनलिमिटेड... आणि या ‘अन्लिमिटेड’पणाला मालवणी आग्रहाची जोड. स्वत: सुरेखा वाळके वाढताना, ‘अहो घ्या हो...पहिलाच भात आहे...’ कधी ‘अरे जेव रे...काय तडस लागूची नाय...’ तर कधी ‘शेवटचो भात कडयेबरोबर...’ असा आग्रह चालूच. एकीकडे गिर्हाईकांशी आपुलकीच्या गप्पा आणि दुसरीकडे खवय्याला तृप्त करण्याची धावपळ... त्याचवेळी किचनमध्येही रेसिपीकडे, चवीकडे आणि दर्जाकडे लक्ष...एकावेळी तीन आघाड्यांवर त्यांची कसरत...
मांसाहारीमध्ये ‘कोळंबी भात’ ही स्पेशल डिश... बिर्याणी नव्हे... चिकण सागुती कशी अगदी मराठी - मालवणी... म्हणजे छोटे छोटे पीस... आणि खोबर्यात बनलेली ग्रेव्ही... खेकडा फ्राय... जवळा कोशिंबीर ही वेगळीच डिश... टिपीकल कालवं मसाला. एकापेक्षा एक...सरस. नुसत्या यादीनेच तोंडाला पाणी...

व्हेजसाठीही तेवढाच चांगला मेनू... पक्वान्नाचे जेवणच... थाळीमध्ये दोन भाज्या, डाळ-वरण, आमटी भात, पापड, लोणचे, चपाती असणारच. पण रोज बदलणारी कडधान्याची उसळ आणि पालेभाजी हमखास... व्हेजबरोबर स्वीटही खास आणि बदलते... तेही नारळ दुधातले... मोसमाप्रमाणे पेरू सरबत... फणस आइस्क्रीम जोडीला.शाकाहारी किंवा मांसाहारी...किती खाऊ किंवा नको असं होऊन जाते ते त्या माऊलीच्या आग्रहापुढे. प्रेमाने, आग्रहाने ते वाढणे...
‘‘हयसरल्या जेवणाची खासियत सांगूची म्हणशाल तर...म्हणजे मालवणी हाताची, मसाल्याची स्पेशल चव, मालवणी आग्रह, जिव्हाळो, आपुलकी व ऋतुमानातलो कोकणी मेवो आणि दर्जा. एकदा इलेलो रसिक खवय्यो हयसून चवीबरोबरच ‘चैतन्य’ घेऊन जाव्कच व्हयो..’’
- सुरेखा वाळके

सौजन्य :- फुलोरा, सामना १५१२१३
No comments:
Post a Comment