मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह. तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असेसुद्धा म्हणतात. हा तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साईडमुळे मिळाला आहे. यावरील वातावरण विरळ आहे. याचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे अनेक विवरे तसेच पृथ्वीप्रमाणे अनेक ज्वालामुखी, दर्या, वाळवंट व धु्रवीय बर्फ यांचा बनला आहे. सूर्यमालेतील सर्वात उंच पर्वत ऑलिंपस मॉन्स तसेच सर्वात मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळावरच आहे. इतर ग्रहांच्या तुलनेत तो बराचसा पृथ्वीसारखा आहे. मंगळ पृथ्वीवरून डोळ्यांनी दिसू शकतो. याला फोबोस व डिमॉस हे दोन अनियमित आकाराचे नैसर्गिक उपग्रह आहेत. यापैकी फोबोस मंगळापासून ५,८८० मैल तर डिमॉस १४,६०० मैल अंतरावरून मंगळाभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतो.
सौजन्य :- फुलोरा, सामना १५१२१३
सौजन्य :- फुलोरा, सामना १५१२१३
No comments:
Post a Comment