Sunday, December 29, 2013

मालवणी ‘सिंधू’

  मालवणचा किनारा... समुद्रात पिवळे गुलाबी झेंडे फडकवत पाण्यावर तरंगणार्‍या बोटी... नारळी, पोफळीच्या बागा... निसर्गाच्या कुशीतून डोके वर काढणारी टुमदार कौलारू घरे... अंगणात तुळशी वृंदावन आणि नजर फिरवावी तिथे कायम लक्षात राहणारे निसर्गसौंदर्य... असेच अस्सल मालवणी ‘लूक’मध्ये खवय्यांची भूक भागवते ते विलेपार्ल्याचे ‘सिंधू.’
मुंबईकरांना स्वादिष्ट मालवणी मेजवानी द्यावी अशा विचाराने पार्ल्याच्या जवाहर बुक डेपोच्या भोगले परिवारातले मिथिल भोगले यांनी ‘सिंधू’ सुरू केले. हुबेहूब कोकणातले घर. लाल मातीच्या भिंती. मुख्य प्रवेशद्वारावर सुपारीची झाडे. होडी, तुळशी वृंदावन आणि त्यात तेवणारी पणती. बाहेरचा हा ‘लूक’ पाहिला की ‘सिंधू’प्रवेश करण्याचा मोह आवरतच नाही.
आत प्रवेश करताच नजर फिरते ती भिंतीवर खुंटीला टांगलेल्या टोपी सदर्‍यावर... काचेच्या कंदिलांवर... सुपल्या आणि रवळ्यांवर... नाकात घुमत असतो मालवणी मसाल्याचा हवाहवासा वाटणारा वास... सदरा पायजम्यातले वेटर ‘येवा कोकण आपलाच आसा’ म्हणत स्वागत करतात. त्यानंतर टेबलावर येतो चमचमीत मालवणी पदार्थांचा ‘मेन्यू’.‘सिंधू’ची एक भिंत मासे पकडायच्या जाळ्याने सजली आहे. त्यात बांगडा, पापलेट, सुरमई, कुर्ल्याची फायबरची मॉडेल्स लटकविण्यात आली आहेत. ताज्या फडफडणार्‍या माशांचे खाद्यपदार्थच ‘सिंधू’मध्ये बनवले जातात. चिनीमातीच्या बरण्या अगदी कोकणातल्या चुलीजवळ असतात तशाच मांडलेल्या.
‘फणसाची बिर्याणी’. कधी ऐकलंय हे नाव. नवीनच. हीच तर खासियत आहे ‘सिंधू’ची. चिकन आणि मटणाऐवजी बिर्याणीसाठी फणस वापरला जातो. तोसुद्धा खास कोकणातून येतो. मालवणी मसाल्यांमध्ये बनवण्यात येणारी फणसाची बिर्याणी खायची तर विलेपार्ल्याच्या ‘सिंधू’शिवाय पर्यायच नाही. फणसाची भाजी खावी तर कोकणात आणि फणसाची बिर्याणी चाखावी तर ‘सिंधू’ची.
चिकन बिर्याणी आणि ‘मटण मालवणी बिर्याणी’सुद्धा ‘सिंधू’मध्ये मिळते. ती पण मालवणी मसाल्यात बनवलेली. म्हणूनच तिचे नावही ठेवलेय ‘चिकन मालवणी बिर्याणी’. चिकन थाळी, चिकन सागोती वडे, तांदळाच्या भाकर्‍या, माशाचे सार आणि हो इथे माशांच्या काट्यांचा वापर करून बनवलेले सार घ्यायलाच हवे. त्याच्या वासानेच तोंडाला पाणी सुटेल.
आंबोळी... चपाती... तळण... कोळंबी सुके... आंबट वरण... कोळंबी भात... तळलेले बोंबील, सुरमई, पापलेट अन् कोळंबीचा आस्वादही ‘सिंधू’ने खवय्यांना दिलाय. कोकणवासीच नव्हे तर अन्य प्रांतातील लोकांनाही ‘सिंधू’च्या मालवणी ठसक्याची चटक लागली आहे. खाऊन पोट भरलं असेल तर मुखवास... काय तर सुपारी आणि मालवणी खाजा. कोकणभूमी झिंदाबाद...
सागोती वडे तर कोकणचे पेटंट. आम्हाला द्यायचे होते त्यापेक्षाही वेगळं. फणसाची बिर्याणीही त्यातूनच आली. मालवणी माणसाचा स्वभाव फणसासारखा. वरून काटेरी वाटला तरी आतून मऊ, प्रेमळ. आमची फणसाची बिर्याणीही तशीच आहे. नाव ऐकले की ग्राहक थोडा विचार करतात, पण आस्वाद घेतला की ती चव त्यांच्या जिभेवर कायमची रेंगाळते. मालवण, मालवणी माणूस, मालवणी मसाला याला तोडच नाही. 
- मिथिल भोगले

सौजन्य :- फुलोरा, सामना २९१२१३

शैवालं

पश्चिम घाटातल्या जंगलात निरनिराळी शैवालं पाहिलीत. शैवाल या वनस्पतींची संरचना अतिशय साधी. एकपेशीय किंवा बहुपेशीय. बहुपेशीय असल्यास अनेक पेशी एकत्र येऊन वसाहत बनते. एकापुढे एक पेशी जोडल्या जाऊन तंतू(टिशू)बनतात.शैवाल परोपजीवी नाही. क्लोरोफिलच्या साह्याने ती स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात.
बहुतांशी शैवालं पाण्यातच वाढतात. त्यांचा विशिष्ट प्रकारचा वास येतो. डबकी, तळी, नद्या व समुद्र अशा ठिकाणी तसेच उष्ण झर्‍यांमध्ये आणि बर्फाखालीही त्यांचे आस्तत्व दिसते. नील-हरित शैवालं गुठळींमध्ये किंवा लांब धाग्यांच्या स्वरूपात असतात. हरित शैवाले समुद्रातही सापडतात. काही जमिनीच्या ओलसर पृष्ठभागावर वाढतात. त्यांची वाढ झालेल्या ठिकाणी हिरवा तवंग तयार होतो. आर्द्रता आणि पाऊस जास्त असलेल्या एरियात खडकावर, मोठ्या झाडांच्या सालीवर शैवालांची जोमाने वाढ होते. इतर वनस्पतींप्रमाणे यांना मूळ,खोड,पान असे अवयव नाहीत.
विशेष म्हणजे पाण्यातल्या परिसंस्थेतील अनेक प्राण्यांचे आस्तत्व शैवालांवर अवलंबून असते. माशांसह बहुतेक जलचर प्राण्यांचे अन्न शैवाल आहे. म्हणूनच जैवसाखळीतला हा अत्यंत महत्त्वाचा घटक. शैवालात जीवनसत्त्वे व क्षार विपुल प्रमाणात असतात. अलीकडे शेतीसाठी जैविक औषधे आणि खतांना(बायोफर्टीलायझर) मागणी वाढलीय. स्पायोरीना जातीच्या शैवालात विपुल प्रमाणात प्रोटिन्स असतात. ‘स्पायरोलीन’ नावाने बाजारात प्रोटिन्सच्या टॅबलेट मिळतात. शैवालांमध्ये पेशीविभाजन,खंडन,बीजाणू व युग्मक यांद्वारे प्रजनन होते. नॉस्टॉक, ऍनाबीना, स्पायरोगायरा, क्लोरेला, लँमिनॅरिया व जेलिडियम ही शैवालांची काही उदाहरणे सांगता येतील.
फुले न येणार्‍या वनस्पतींना ‘अपुष्प वनस्पती’ (क्रिप्टोगॅमस) म्हणतात. जलवाहिन्या आणि रसवाहिन्याचा अभाव असलेल्या आणि पाने,खोड, मूळ ही वैशिष्ट्यदर्शक इंद्रिये नसलेल्या अशा वनस्पतींचे थॅलोफायटा व ब्रायोफायटा असे दोन गट. मूळ,खोड,पाने हे अवयव तसेच जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असलेल्या पण फुले,फळे व बीजे नसलेल्या अपुष्प वनस्पतींचा समावेश टेरिडोफायटा विभागात होतो.या वनस्पती सरळ वरच्या दिशेने वाढतात. थॅलोफायटा या विभागांत शैवाल,जीवाणू,कवक आणि शोवाक (लायकेन) यांचा समावेश होतो. या वनस्पती जमिनीला समांतर वाढतात.

सौजन्य :- फुलोरा, सामना २९१२१३

झुंजार रामशेज

 संभाजीराजेंचा इतिहास वाचत असताना किल्ले रामशेजचा उल्लेख आला. शंभूराजांच्या कारकीर्दीत या दुर्गने मोगलांना अशी काही झुंज दिली की, जवळपास साडेपाच वर्षे हा किल्ला मोगलांना जिंकताच आला नाही. मोगलांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही त्यांच्या पदरी केवळ निराशाच आली. विशेष म्हणजे ज्या किल्लेदाराच्या नेतृत्वाखाली हा गड लढला त्या किल्लेदाराचे नाव मात्र इतिहासाला ठाऊक नाही. या अज्ञात शूरवीराच्या जोरावर हा किल्ला अजिंक्यच राहिला. सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा हा रामशेजचा इतिहास जसा साहित्यात शब्दांनी उतरवला गेला तसाच तो आमच्यासारख्या दुर्गभक्तांनी कपाळाला लावला तर त्यात ‘नवल’ ते काय!
आम्ही नेहमीच तिथे जात असतो तिथला इतिहास, भूगोल आणि धार्मिकतेचा संदर्भ हे विचारतच फिरत असतो. त्यामुळे आमच्या ज्ञानात नेहमीच भर पडत असते. या ठिकाणाचा दुसरा पौराणिक संदर्भ कवी प्रभूरामचंद्र वनवासात असताना या किल्ल्यावर त्यांनी काही दिवस मुक्काम केला होता. या ठिकाणी प्रभूरामाची शेज (शय्या) म्हणूनच या किल्ल्याचं नामकरण हे ‘रामशेज’ असं झालेलं.
आम्ही नाशिक पार करून आशेवार्ड गावात आलो समोरच रामशेज मध्यम आकाराचा, पण भक्कम असा चहुबाजूंनी ताशीव कडे असलेला हा किल्ला आम्हाला आता खुणावू लागला होता. पायथ्यापासून तासाभरातच आम्ही राममंदिरासमोर उभे राहिलो. या मंदिरातली मूर्ती आणि गुहा या खरोखरीच डोळ्यांचे पारणे फेडणार्‍या. गडावर असं काही अधिष्ठान असलं की, गडाचं पावित्र्यही आपोआप राखलं जातं 
दर्शनानंतर आम्ही मोर्चा वळवला तो थेट गडावरच. उद्ध्वस्त दरवाजातून आम्ही बरोबर गडाच्या मध्यभागी दाखल झालो. संपूर्ण गडमाथा फिरण्यास दोन तास पुरले. यादरम्यान देवीचे एक मंदिर, पाण्याचे टाके, गडाचा मुख्य दरवाजा, गुहा पाहता आल्या. गडावर सुस्थितीतील वास्तू अशा नाहीच, परंतु तरीही या गडाच्या अंगाखांद्यावरून फिरताना जर इतिहासाचा चष्मा लावला तर हा गड बरेच काही सांगतो. त्या आठवणींना सोबत घेऊनच आम्ही परतलो

- ओंकार वर्तले
सौजन्य :- फुलोरा, सामना २९१२१३

आपली बारा त्याचे एक...



गुरूची घनता सरासरीने पृथ्वीच्या चतुर्थांश आहे. पृथ्वीच्या दोन अक्षप्रदक्षिणा जेवढ्या काळात होतात तेवढ्या काळात गुरूच्या पाच अक्षप्रदक्षिणा होतात. यामुळे गुरूवरील दिवस आपल्या ९ तास साडेपच्चावन्न मिनिटांएवढा आहे, परंतु त्याचे वर्ष फार मोठे आहे. आपली बारा वर्षे होतात तेव्हा त्याचे कुठे एक वर्ष होते. सूर्यापासून पृथ्वीच्या पाचपट अंतरावर गुरू आहे. त्याचा दक्षिणोत्तर व्यास पूर्वपश्‍चिम व्यासापेक्षा सुमारे ५ हजार मैल कमी आहे. त्यामुळे याचा आकार ध्रुवाकडे किंचित चपट आहे. गुरूवर विषुववृत्ताशी समांतर असे काही पट्टे आहेत की ते चकचकीत दिसतात. विषुववृत्तावरच एक चकचकीत पट्टा दिसतो. त्याचा रंग तांबूस दिसतो. काही वेळा त्यात जांभळ्या रंगाची झळाळी मारते. हे पट्टे त्याच्या ध्रुवापर्यंत गेले आहेत.

सौजन्य :- फुलोरा, सामना २९१२१३

महाराष्ट्राची भूमी

महाराष्ट्राची भूमी- महाराष्ट्र राज्याच्या अगोदर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना- १ नोव्हेंबर १९५६.
- महाराष्ट्र राज्याची स्थापना - १ मे १९६०.
- महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात- १ मे १९६२.
- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री- यशवंतराव चव्हाण 
- राज्यपाल- श्री प्रकाश
- महाराष्ट्राचे क्षेत्रफळ- ३,०७,७१३ चौ.कि.मी.
- महाराष्ट्राचा विस्तार- अक्षांश १५ अंश ८’ उत्तर ते २२ अंश १’ उत्तर. रेखांश ७२ अंश ६’ पूर्व ते ८० अंश ९’ पूर्व.
- महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार- ८०० कि.मी., उत्तर- दक्षिण विस्तार- ७०० कि.मी.
- महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनार्‍याची लांबी- ७२० कि.मी. (सर्वात जास्त- रत्नागिरी)
- महाराष्ट्राची राजधानी- मुंबई, उपराजधानी- नागपूर
- प्रशासकीय विभाग- सात (कोकण, नाशिक, पुणे, संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर).
- महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने वसई-विरार उपविभागासाठी सर्वप्रथम १३ सप्टेंबर २००६ रोजी महानगरपालिका घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता
- महाराष्ट्र राज्याचा वृक्ष- आंबा,
- महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी- शेकरू, 
- महाराष्ट्र राज्याचा राज्य फूल- मोठा बोंडारा/ तामन,
- महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी- हरावत, 
- महाराष्ट्र राज्याची राज्य भाषा- मराठी.
- महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील राज्य- वायव्य- गुजरात व दादरा नगर-हवेली (संघराज्य), उत्तर- मध्य प्रदेश, दक्षिण- गोवा व कर्नाटक, आग्नेय- आंध्र प्रदेश. पूर्वेस- छत्तीसगड.

सौजन्य :- फुलोरा, सामना २९१२१३

Tuesday, December 17, 2013

Is your stock broker cheating you?



Is your stock broker cheating you? Here's how you can avoid being duped

By Sanjay Kumar Singh, ET Bureau | 16 Dec, 2013, 08.00AM IST
When Delhi-based Shyam Sundar was hospitalised this year, his wife received several calls from the relationship manager of his stock broker. He wasn't calling to ask how her husband was doing, but for permission to transact in the futures and options (F&O) segment on Sundar's behalf. Though she told him to wait till her husband had recovered, the relationship manager went ahead and executed the transactions. When Sundar got home from hospital, he discovered that the unauthorised transactions .. 

This horror story has a somewhat happy ending. Sundar complained to the broking house, but they claimed he had authorised the transactions. An adamant Sundar demanded proof and threatened to complain to the Securities and Exchange Board of India (Sebi). That's when the broking house gave in and made good the loss he had incurred due to the rogue deals. 

Sundar won because he had an airtight case. The broker had no evidence that the deals had been authorised. Sebi rules make it mandatory for brokers to maintain records of telephone calls with clients. However, not all investors are so lucky. Brokers manage to get away by exploiting loopholes in the law. They are able to do so because few investors are aware of the rules or their rights. In our cover story this week, we look at the tricks that brokers deploy to take investors for a ride, and how .. 

DON'T SIGN AWAY YOUR RIGHTS

The first pitfall comes at the time of opening a trading account with a broker. You are given a lengthy application form and a voluminous agreement booklet with clauses in small print. Very few investors have the patience to go through the fine print or the ability to decipher the legalese. The relationship manager helpfully puts crosses at the places you need to sign on the agreement. Do so without reading the clauses and you could be headed .. 

What should you do?

Take time to go through the form and the agreement. In particular, pay attention to the power of attorney (PoA) section. The PoA allows the broker to transact on your behalf. When you sign on the dotted line on the PoA pages, you basically sign your rights away. In 2010, Sebi issued new guidelines for PoA to intermediaries following large-scale complaints of misuse.

These new rules curtailed some of the actions that a broker could take on your behalf. Even so, a broker can transfer shares sold by you to the stock exchange, pledge stocks to meet your margin requirements, and apply for mutual funds, IPOs, rights, and offer of shares based on your instructions. He can also transfer funds from your bank account for your settlement obligations and margin requirements, as well as recover dues of your trading activity or other charges. 

Some investors blindly sign on the form with a brokerage firm and give PoA for moving funds from their bank accounts, whenever required. They do so because it is very convenient. When they place orders on phone, the money automatically moves from their savings accounts to their trading accounts. However, this convenience can cost them dearly if their brokerage firm executes unauthorised trades from their accounts. Ideally, the investor should transfer money from his savings account to the brokerage account whenever needed. 

The broker cannot execute trades without the client's consent or transfer funds from his bank account to conduct transactions with another broker. He cannot also transfer stocks for off market trades or merge the balance from other accounts to nullify debit in any other trading account. 

DON'T CHURN AND BURN

Once you sign up as a customer, the stock broker will start bombarding you with phone calls, stock recommendations and SMSes, all of which will urge you to buy this stock or sell that one. The tempo rises when the markets are on the upswing. "If you don't buy now, you could miss out on a multi-bagger opportunity," your broker will tell you. 

Before you fall for the bait, remember that the broker makes money every time you transact. His goal is to get you to buy and sell at a furious pace. When you do so too often, it's certain that your costs will go up. What is not so certain is whether you will make profits. However, your broker may not care. Whether you make or lose money, he will earn his brokerage fee. 

What should you do?

When you buy a mutual fund, your money is invested across a basket of well-chosen stocks. You can be sure the fund manager and his team have researched the stocks threadbare before including them in the portfolio. Investing on the basis of tips from your broker is a different ball game. The risk is considerably higher and avoidable. Do not blindly accept the broker's recommendations. Instead, for each suggestion, conduct your own checks. Are the company's fundamentals sound? Is the valuation attractive?


Similarly, when the broker recommends a sale, find out whether the company's fundamentals have been irreparably damaged. Or has the stock become over-valued? Don't let your broker force you to take buy and sell decisions. 

It's often said that if your stock portfolio can beat a mutual fund or the broader market, you are in the wrong profession. Check the returns from your stock investment. "If, after a year or so, you find that your direct investment portfolio has underperformed a broader index, such as the Sensex or the Nifty, quit direct investing and put your money in actively managed funds or low-cost index funds," suggests Vishal Dhawan, head of Mumbaibased financial planning firm Plan Ahead Wealth Advisors .. 

DON'T BE LURED INTO THE F&O TRAP

Warren Buffett calls them the financial weapons of mass destruction. Though derivatives have their uses, these leveraged instruments can become very dangerous in the hands of retail investors. Still, the F&O segment has a very high retail participation. This is also the area where the maximum cases of unauthorised trading take place.

It's easy to lure clients into this financial equivalent of a minefield. Relationship managers of brokerage houses tell stories of how they have made fabulous sums of money for clients by trading in F&O. Customers often give consent to the relationship manager to trade on their behalf. More often than not, losses follow and the customer is left holding the can. 


What should you do?

Derivatives are essentially meant for hedging and should have no place in the small investor's portfolio. Nip the problem in the bud and don't opt for trading in the derivative segment when you fill up the account opening form. Says Kunal Pawaskar, head of Capital Orbit, a Mumbai-based investor education firm: "Novice investors who don't understand derivatives should not opt for this segment at all." 

If you have already signed up for investing in the F&O segment, avoid the temptation to trade in it. While you can indeed make lots of money in this space, you can also incur steep losses. Don't get swayed by the relationship manager's promises to earn big money. Under no circumstance should you give him the authorisation to trade in F&Os on your behalf. Keep a close eye on all the SMSes and e-mails from your broker (alerts to customers after every transaction have become mandatory). 

Besides the brokerage commissions, another source from which brokers make money is by getting you to engage in margin trading. Under this arrangement, the broker lends you money to trade against the stocks lying in your account. Like F&O, margin trading is also a leveraged position and should be avoided by retail investors. If the stock drops, you lose on two counts: on the value and the interest that you will have to pay. 

DON'T BELIEVE ALL BROKERAGE REPORTS

Brokerage houses regularly come out with reports on stocks. Before you base your decision on these reports, keep in mind that the financial services industry is facing a crunch. 

With commission rates on the decline, most brokerage firms are not making much money from this source. The larger slice of their earnings comes from investment banking: helping companies raise capital through public issues of shares and bonds. A firm that wants to get the investment banking mandate from a company would hardly issue a negative report on it. Not surprisingly, the number of 'buy' reports exceeds 'sell' reports. 

What should you do?

Should you then rely on brokerage house reports? Yes, but with a few caveats. Gathering information on a company is difficult. You may read its annual reports and track reports on it in the business media. Nonetheless, you may miss out on crucial information because the management only reveals such information to analysts. 

Read brokerage reports, but not from just one brokerage house. See what different analysts have to say about a company's fundamentals. When it comes to assessment of forward earnings, valuation and target price, make your own judgement. 

Dhawan says one should not consider only the firm's growth prospects highlighted in the report. "Pay equal attention to the risk factors," he adds. Many reports also carry a history of past recommendations. See how you would have fared if you had acted upon them. 

Do not blindly follow the broking house's buy and sell calls. In fact, if you decide to be a buyand-hold investor, who holds stocks for at least three years, you will cut out much of the noise that emanates from brokerages. 

Investment analyst R Balakrishnan says your only chance of getting unbiased reports is from independent research firms that make their money by selling their research reports and don't have investment banking arms. 

"There are very few such firms because research is costly and most investors are reluctant to pay for it," he adds. Canadabased Veritas is one example of an independent research firm. 

ENSURE TRADING AND BROKING ARE SEPARATE

Brokerage houses employ traders, who use the firm's capital to trade in the stock markets. This is called proprietary trading. Firms also trade on their clients' behalf. Typically, brokerage firms are required to maintain separate books for their proprietary trades and the ones they conduct on their clients' behalf. Sometimes, however, the firewall breaks down. Traders use clients' money to trade. When they sustain losses, only does their firm suffer, but the clients, who never authorised these trades, also take a hit. 

What should you do?

You may make enquiries at the brokerage house. In all likelihood, the firm will fob you off with replies to the effect that the separation of proprietary trading and client trading is treated as sacrosanct at their firm. 

A better way of avoiding falling prey to this misuse is not to keep excess money in your brokerage account. Transfer money from your savings account to your brokerage account just before a purchase. If you have sold stocks and don't intend to use the money to buy another set, don't leave the money lying in the account. Have it transferred to your savings account. 

Guarding against misuse of your trading account

Step 1: You place order to buy or sell stocks.

Step 2: Order executed. 

Step 3: Stocks or cash credited to trading account. (Could be misused by broker for unauthorised trading.) 

Step 4: Transfer from trading account to demat or bank account.

How to seek redressal

Stock exchanges offer a grievance redressal mechanism. An Investment Protection Committee looks into complaints from investors, and if the charges are proved correct, investors are reimbursed from an Investment Protection Fund. There may also be disgorging of profits. 

However, you need to be aware of a few things. "Investors often lose out because ignorance is not really protected under the law. If you have signed off your rights, and subsequently get cheated, you may not get protection. Only if you can establish that there has been a fraud or malpractice will you get protection," says Uma Shashikant, managing director, Centre for Investment Education and Learning. 

Find out who the grievance redressal authority at the stock exchange is. Meet the person and explain your case. Submit all the documentary evidence you have. If he thinks that prima facie there is a case, he will admit it. 

On the flip side, the adjudication and grievance redressal process can be long drawn. If the stock exchange does not give you redressal, you can escalate the matter to Sebi. 

Do you have a complaint against a broker?

Visit Sebi's Scores (Sebi Complaints Redress System) website to file your complaint online.

1) Apprise your broker of your grievance. 

2) If the response is not satisfactory, tell him you will complain to Sebi.

3) The Sebi threat usually works. If he doesn't agree, lodge a complaint online on the Scores at www. scores.gov.in. 

4) Scan the relevant documents and upload them on this website.

5) Sebi forwards your complaint to the concerned brokerage firm.

6) The firm must reply to your complaint within 30 days. 

7) You can track the progress on your complaint on the website (click on 'View Complaint Status' button on the main page). 
8) If the brokerage firm does not reply to your complaint within 30 days, the matter gets passed on to a dealing officer at Sebi. 


9) Scores also has a helpline: 18002667575. 

Sunday, December 15, 2013

आग्रहातले मालवणी चैतन्य

‘आमची कुठेही शाखा नाही’ला मोडून काढताना सुरेखा वाळके या अस्सल ‘मालवणी’ आईने मालवणमधल्या फॉर्मात चालणार्‍या ‘हॉटेल चैतन्य’ची एक शाखा तीन वर्षांपूर्वी दादरनजीकच्या आगरबाजार मार्केटसमोर उघडली... आणि अस्सल मालवणीपणा जपत मुंबईकर खवय्यांना मालवणी आग्रहाने वाढून तृप्त केले... त्यामुळे खवय्यांच्या लिस्टमध्ये सध्या ‘हॉटेल चैतन्य’ टॉपवर आहे म्हटल्यास हरकत नाही...

‘हॉटेल चैतन्य’ची सुरमई म्हणा किंवा कालवं म्हणा, येतात थेट मालवणहून. शेवटी पाण्याची म्हणून एक चव असतेच. फक्त मालवणी मसाले वापरले म्हणजे ‘मालवणी’ चव आली असे होत नाही... त्यासाठी पाण्यालाही त्या मातीची, तिथल्या मौसमाची चव असावी लागते... सुरेखा वाळके यांनी हे लक्षात घेऊनच त्यांची स्वत:ची रेसिपी तयार केली... मासेच नव्हे तर मालवणी जेवणात प्रामुख्याने वापरला जाणारा नारळही थेट मालवणातून आणतात. त्यामुळे इथली मालवणी नारळाच्या दुधात बनवलेली सोलकढी असो किंवा स्वीटमधली खीर, नाचणी हलवा, मोदक, पातोळ्या, काकडीचे धोंडस...कितीही भरपेट खाऊन घेतले तरी मन भरत नाही.


साधारण फिशची थाळी दीडशेपासून माशाच्या आकाराप्रमाणे ३०० पर्यंत जाते, पण एकदा का थाळीची ऑर्डर गेली की खवय्याने पोट भरेपर्यंत खात राहायचे. मच्छी किंवा सागुती सोडल्यास सर्व काही अनलिमिटेड... आणि या ‘अन्लिमिटेड’पणाला मालवणी आग्रहाची जोड. स्वत: सुरेखा वाळके वाढताना, ‘अहो घ्या हो...पहिलाच भात आहे...’ कधी ‘अरे जेव रे...काय तडस लागूची नाय...’ तर कधी ‘शेवटचो भात कडयेबरोबर...’ असा आग्रह चालूच. एकीकडे गिर्‍हाईकांशी आपुलकीच्या गप्पा आणि दुसरीकडे खवय्याला तृप्त करण्याची धावपळ... त्याचवेळी किचनमध्येही रेसिपीकडे, चवीकडे आणि दर्जाकडे लक्ष...एकावेळी तीन आघाड्यांवर त्यांची कसरत...
मांसाहारीमध्ये ‘कोळंबी भात’ ही स्पेशल डिश... बिर्याणी नव्हे... चिकण सागुती कशी अगदी मराठी - मालवणी... म्हणजे छोटे छोटे पीस... आणि खोबर्‍यात बनलेली ग्रेव्ही... खेकडा फ्राय... जवळा कोशिंबीर ही वेगळीच डिश... टिपीकल कालवं मसाला. एकापेक्षा एक...सरस. नुसत्या यादीनेच तोंडाला पाणी...

व्हेजसाठीही तेवढाच चांगला मेनू... पक्वान्नाचे जेवणच... थाळीमध्ये दोन भाज्या, डाळ-वरण, आमटी भात, पापड, लोणचे, चपाती असणारच. पण रोज बदलणारी कडधान्याची उसळ आणि पालेभाजी हमखास... व्हेजबरोबर स्वीटही खास आणि बदलते... तेही नारळ दुधातले... मोसमाप्रमाणे पेरू सरबत... फणस आइस्क्रीम जोडीला.शाकाहारी किंवा मांसाहारी...किती खाऊ किंवा नको असं होऊन जाते ते त्या माऊलीच्या आग्रहापुढे. प्रेमाने, आग्रहाने ते वाढणे... 
‘‘हयसरल्या जेवणाची खासियत सांगूची म्हणशाल तर...म्हणजे मालवणी हाताची, मसाल्याची स्पेशल चव, मालवणी आग्रह, जिव्हाळो, आपुलकी व ऋतुमानातलो कोकणी मेवो आणि दर्जा. एकदा इलेलो रसिक खवय्यो हयसून चवीबरोबरच ‘चैतन्य’ घेऊन जाव्कच व्हयो..’’
- सुरेखा वाळके

सौजन्य :- फुलोरा, सामना १५१२१३

मंगळ

मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह. तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असेसुद्धा म्हणतात. हा तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साईडमुळे मिळाला आहे. यावरील वातावरण विरळ आहे. याचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे अनेक विवरे तसेच पृथ्वीप्रमाणे अनेक ज्वालामुखी, दर्‍या, वाळवंट व धु्रवीय बर्फ यांचा बनला आहे. सूर्यमालेतील सर्वात उंच पर्वत ऑलिंपस मॉन्स तसेच सर्वात मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळावरच आहे. इतर ग्रहांच्या तुलनेत तो बराचसा पृथ्वीसारखा आहे. मंगळ पृथ्वीवरून डोळ्यांनी दिसू शकतो. याला फोबोस व डिमॉस हे दोन अनियमित आकाराचे नैसर्गिक उपग्रह आहेत. यापैकी फोबोस मंगळापासून ५,८८० मैल तर डिमॉस १४,६०० मैल अंतरावरून मंगळाभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतो.

सौजन्य :- फुलोरा, सामना १५१२१३

हिंदुस्थानातील सर्वात पहिली महिला

- प्रथम महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील
- महिला राज्यपाल- सरोजिनी नायडू
- महिला मुख्यमंत्री- सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)
- पंतप्रधान- इंदिरा गांधी
- महिला राजदूत- विजयालक्ष्मी पंडित
- मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी
- दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती- रझिया सुलतान
- युनोच्या आमसभेच्या पहिल्या हिंदुस्थानी महिला अध्यक्ष- विजयालक्ष्मी पंडित
- हिंदुस्थानातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला- आरती शहा
- पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२)
- पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख.
- हिंदुस्थानातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी
- उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी

सौजन्य :- फुलोरा, सामना १५१२१३

Saturday, December 07, 2013

शुक्रग्रह



आपल्या सूर्यमालेतील ‘शुक्र’ हा अंतग्रह सूर्याभोवती साधारण वर्तुळाकार १.०८ दशलक्ष किलोमीटर त्रिज्येच्या कक्षेत भ्रमण करतो. त्याचे पृथ्वीपासून अंतर जास्तीत जास्त ५० दशलक्ष किलोमीटर तर कमीत कमी ४२ दशलक्ष किलोमीटर एवढं असतं. यामुळे शुक्राचा दृश्य आकार ९ सेकंदांपासून ६८ सेकंदांपर्यंत बदलत असल्याचे लक्षात येते. ग्रहाभोवती साधारण ८० किलोमीटर जाडीचे वातावरण असल्याने त्याच्या पृष्ठभागावरील हवेचा दाब पृथ्वीवरील हवेच्या दाबापेक्षा ९० पट जास्त असतो. अशा जड वातावरणामुळे ग्रहाचा पृष्ठभाग प्रकाशकीय दुर्बिणीने दिसत नाही. शुक्रावर पडणार्‍या सूर्यप्रकाशाचा ७६ टक्के भाग वातावरणाने परावर्तीत होत असल्याने शुक्राची चांदणी तेजस्वी दिसते. हा ग्रह सूर्याच्या जवळ असल्याने आणि वातावरणातील मोठ्या प्रमाणातील कार्बनडाय ऑक्साईडमुळे तेथे हरितगृह परिणाम फारच प्रभावी आहे. 

सौजन्य :- फुलोरा सामना ०७१२१३

भारतरत्न

भारतरत्न
नाव वर्ष
खान अब्दुल गफार खान (१८९०-१९८८) १९८७
एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) (१९१७-१९८७) १९८८
भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) (१८९१-१९५६) १९९०
नेल्सन मंडेला (जन्म १९१८) १९९०
राजीव गांधी (मरणोत्तर) (१९४४-१९९१) १९९१
सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर) (१८७५-१९५०) १९९१
मोरारजी देसाई (१८९६-१९९५) १९९१
मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) (१८८८-१९५८) १९९२
जे. आर. डी. टाटा (१९०४-१९९३) १९९२
सत्यजित रे (१९२२-१९९२) १९९२
सुभाषचंद्र बोस (१८९७-१९४५) (नंतर परत घेतले) १९९२
ए. पी. जे. अब्दुल कलाम (जन्म १९३१) १९९७
गुलझारीलाल नंदा (१८९८-१९९८) १९९७
अरुणा आसफ अली (मरणोत्तर)(१९०६-१९९५) १९९७
एम.एस. सुब्बुलक्ष्मी (१९१६-२००४) १९९८
चिदंबरम् सुब्रमण्यम् (१९१०-२०००) १९९८
जयप्रकाश नारायण (१९०२-१९७९) १९९८
रवि शंकर (जन्म १९२०-२०१२) १९९९
अमर्त्य सेन (जन्म १९३३) १९९९

सौजन्य:- फुलोरा, सामना ०७१२१३

Sunday, November 24, 2013

तुळशीचे लग्न

   तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणा त आहे. ती अशी, की जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योध्दा राक्षस होऊन गेला. त्याने आपल्या पराक्रमाने देवांना जिंकून वैभव प्राप्त केले आणि आपल्या भाईबंद दैत्यांस सुखी केले. त्याची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. तिच्या पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरला होता. त्याने इंद्रपुरीवर चाल करून इंद्राची खोड मोडण्यासाठी कडेकोट तयारी चालवली होती. पुढे, देव व दैत्य यांच्यांत युध्द होऊन अनेक देवांस गतायू व्हावे लागले. तेव्हा विष्णूने जालंधरास युद्धात हरवण्यासाठी कपटकारस्थान रचले. त्याने जालंधराची पत्नी वृंदा हिच्या जाज्वल्य पातिव्रत्यामुळेच जालंधरास सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे जाणून, ते नष्ट करण्यासाठी युक्ती योजली.
तुलसी स्तोत्र
तुलसी सर्व प्रतांना महापातक नाशिनी |
अपवर्ग प्रदे देवी वैष्णवाना प्रिय सम ||
सत्ये सत्यवतीचैव त्रेतया मानवी तथा |
द्वापारे चावतीर्णासि वृंदात्व तुलसी क्ली: ||
विष्णूने दोन वानरांकडून जालंधर हा रणभूमीवर मारला गेला आहे अशी बतावणी करून, आपले शीर व धड तंतोतंत जालंधराप्रमाणे बनवून ते दोन अवयव वृंदेपुढे टाकले. तेव्हा वृंदा शोक करू लागली. इतक्यात, एका कपटी साधूने संजीवनी मंत्राने कपटवेषधारी जालंधरास म्हणजेच विष्णूस जिवंत केले! वृंदेने आपला पती जिवंत झालेला पाहून आनंदातिशयाने त्याला मिठी मारली. अशा प्रकारे, विष्णूने वृंदेसमवेत राहून तिचे पातिव्रत्य भंग केले. अज्ञानात का होईना पण वृंदेच्या पातिव्रत्यभंगामुळे जालंधर बलहीन होऊन लढाईत मारला गेला. काही काळानंतर, वृंदेस खरा प्रकार कळताच तिने क्रोधित होऊन विष्णूस शाप दिला, की त्याला पत्नीचा वियोग घडून दोन मर्कटांचे सहाय्य घेण्याची पाळी त्याच्यावर येईल. त्याप्रमाणे पुढे रामावतारी तसे घडले!
त्यानंतर लगेच वृंदेने अविकाष्ठ भक्षण केले. विष्णूलाही आपण कपटाने एका महासाध्वीचा नाहक नाश केला हे पाहून वाईट वाटले; इतकेच नव्हे तर तो वृंदेच्या रक्षेजवळ वेड्यासारखा बसून राहिला. विष्णूचे वेड घालवण्यासाठी पार्वतीने तेथे, वृंदेच्या रक्षेवर तुळस, आवळा व मालती यांचे बी पेरले. त्यातून तेथे तीन झाडे उत्पन्न झाली. त्यांतील तुळस ही आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे वाटून विष्णूस ती प्रिय झाली. श्रीविष्णूस तुळस अतिप्रिय म्हणून तिला हरिप्रिया म्हणतात. पुढे वृंदा हिनेही द्वापार युगात रुक्मिणीच्या रूपाने अवतरून विष्णूचा अवतार जो श्रीकृष्ण त्यास कार्तिक शुध्द द्वादशीच्या दिवशी वरले. अशा प्रकारे, हिंदू लोक रुक्मिणी-कृष्ण विवाह तुळशी विवाहविधीच्या रूपाने त्या दिवशी दरसाल साजरा करतात. त्यात तुळस ही वधू, बाळकृष्‍ण हा वर, तर ऊस हा मामा समजला जातो. सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सारवून, सुशोभित केले जाते. तुळशीभोवती रांगोळी काढली जाते. वृंदावनात ऊस पुरून आवळे व चिंचा टाकतात. तुळशीच्‍या चारी बाजूंनी ऊसाचा मंडप उभारला जातो. मग विष्णुस्वरूप श्रीबाळकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते. बाळकृष्णाला आवाहन करून त्‍यास स्नान, अभिषेक, नवीन वस्त्र, नवीन साज, तसेच नैवेद्य अर्पण करून त्याची आळवणी करतात. त्यानंतर तुळशीमातेचीही षोडशोपचारांनी पूजा करून, तिला सौभाग्यलेणे, नवीन साज, नवीन वस्त्र देऊन सालंकृत सजवतात. तुळस आणि श्रीकृष्‍ण विवाहासमयी चौरंगाच्‍या एका बाजूस श्रीकृष्‍ण तर दुसर्‍या बाजूस तुळशीचे रोप ठेवून दोघांमध्‍ये अंतरपाट धरला जातो. मग सर्वांना अक्षता वाटल्‍या जातात. त्यानंतर मंगलाष्‍टके म्‍हटली जातात आणि गोरज मुहूर्तावर श्रीकृष्‍ण-तुळशीचा विवाह सोहळा पार पडतो.प्रहर रात्रीच्या आत पूजा आटोपल्यावर मांडवाभोवती (जो वृंदावनाभोवती ऊस रचून केलेला असतो) आरती, दीपाराधना, उरकण्यात येऊन जमलेल्या लोकांस लाह्या, कुरमुरे, ऊसाच्या गंडेर्‍या देण्यात येतात.
त्या दिवसापासून हिंदू लोकांच्या विवाहासंबंधी कार्यास सुरूवात होते. ‘वधुपिते घराबाहेर पडतात व मुलीचे लग्न जुळवण्यासाठी चपला झिजवू लागतात’ असे पूर्वी म्हणत.
हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते. तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके तुळशीला महत्त्व आहे.
 "तुळसीचे पान. एक त्रैलोक्य समान |
उठोनिया प्रातःकाळी, वंदी तुळसी माऊली |
नाही आणिक साधन, एक पूजन तुळसीचे
न लगे तीर्थाधना जाणे, नित्य पूजने तुळसीसी
योगायोग न लगे काही, तुळसीवाचुनी देव नाही"
अशा शब्‍दांत संत एकनाथां नी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. तुळशीमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त असल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास तिचा उपयोग होतो. दारात वा घरात तुळशीचे झाड असल्यास घरात पिसवा, हिवतापाचे जंतू शिरकाव करत नाहीत. तुळस प्रदूषणनाशक आहे. ताप, सर्दी, खोकला दूर करणे, हवा शुद्ध करणे हे तिचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत.
हिंदूंच्या अंत:करणात तुळशीसंबंधात पूज्यभाव आहेच; पण इतर धर्मीयदेखील तुळशीबद्दल आदर दाखवतात. इंग्रजी शब्दकोशात तुळशीला ‘पवित्र झाड’ असे म्हटले आहे. ग्रीक भाषेतील बेंझिलिकॉन हा तुळशीसंबंधीचा शब्द राजयोग या अर्थाचा आहे. तुळशीला फ्रेंच व जर्मन भाषांतही ग्रीक शब्दांप्रमाणे बहुमानाचे अर्थ लाभलेले आहेत. इटाली व ग्रीस देशांत प्राचीन काळी तुळशीच्या अंगी विशिष्ट शक्ती आहे असे मानत असत.
सुरेश वाघे- दूरध्वनी:(022) 28752675
संदर्भ: आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास- लेखक ऋग्वेदी, प्रथमावृती 1916
(ऋग्वेदी : वामन मंगेश दुभाषी यांनी हे टोपणनाव धारण केलेले होते. पु.ल.देशपांडे हे त्यांचे नातू होते.)
सौजन्य :- http://thinkmaharashtra.com/