अलदेबरान रोबोटिक्स्
रोबोटला माणसाप्रमाणे प्रेम, राग, भीती, दु:ख इ. भावना व्यक्त करता येऊ शकतात का? याचे उत्तर अलदेबरान रोबोटिक्स्चे रोबोट देतात. त्याला (एन.ए.ओ.) हा रोबोट माणसाप्रमाणेच सर्व प्रकारच्या भावना व्यक्त करू शकतो. सध्या जगभरात दोन हजारहून अधिक (एन.ए.ओ.) रोबोट शोधकार्य तसेच संधोशनासाठी वापरले जात आहेत. भविष्यातील मानवाचा खरा मित्र रोबोट होऊ शकतो व मानवी आयुष्यात तो कसा बदल करू शकतो यावर अलदेबरान रोबोटिक्स् काम करीत आहे.
‘माय नेम इज चिट्टी...स्पीड १ टेराबाईट, मेमरी १ झेटाबाईट...’ दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतच्या ‘रोबोट’ या चित्रपटातील ‘चिट्टी’ या ऍण्ड्रो ह्युमनाईड रोबोटला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. (त्यानंतर सर्वांना असा प्रश्न पडला की, खरंच रोबोट कधी माणसाची जागा घेऊ शकेल का?) गेल्या कित्येक वर्षांपासून लहान मुलांच्या कार्टूनपासून शेकडो स्काय फाय चित्रपटात आपल्या समोर अशा हजारो रोबोटिक व्यक्तिरेखा आल्या. त्यांनी कधी दुष्ट खलनायकापासून पृथ्वीवरील जीवसृष्टीचे रक्षण केले तर कधी रोबोटच खलनायक झाला आणि मानवाचा विध्वंस करू लागला. या सर्व रोबोटिक व्यक्तिरेखा आपल्या मनात कायम घर करून राहिल्या व सर्वजण कुतूहलाने का होईना हा विचार करू लागले की खरंच रोबोट कधी माणसाची जागा घेऊ शकेल का? व त्याचा माणसाला काय उपयोग होईल?
खरं तर रोबोट या संकल्पनेवर गेल्या शतकापासून जगातील अनेक शास्त्रज्ञ काम करीत आहेत व स्काय फाय चित्रपटातील रोबोटच्या करामती आता प्रत्यक्ष जगातील रोबोटदेखील करू लागले आहेत. आजचे रोबोट मेडिकल सायन्सपासून अगदी युद्धभूमीपर्यंत सर्वत्र वापरले जातात व अशी असंख्य कामे जी आपण करू शकत नाही. तेथे रोबोटची मदत घेतली जाते. यंदाच्या आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलोजी)च्या टेक फेस्टिव्हलमध्ये रोबोट आणि रोबोटिक्सच्या जगातील अनेक नवीन स्वप्नवत संकल्पना सादर केल्या जाणार आहेत.
रोबोटिक्सचे सायन्स विस्तारत आहे. मनुष्य सतत रोबोटचा वापर कसा व कुठे करता येईल, याकरिता या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शोधकार्य करीत आहे. रोबोटिक्सच्या या विस्तारलेल्या क्षेत्रातील अनेक गोष्टींची माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर आयआयटी मुंबईच्या टेक फेस्टिव्हलला जरूर भेट द्या. या संदर्भात अधिक माहिती www.techfest.org या संकेतस्थळावर मिळू शकेल.
क्रेझी कॉप्टर
३ इडीयट’ या चित्रपटात आपण सर्वांनी आमीर खानला छोटे कॉप्टर उडवताना बघितले आहे. हे कॉप्टर म्हणजे खरं तर मोठ्या हेलिकॉप्टरचे छोटे रूप पण याचं काम मात्र रोबोटिक्सप्रमाणे चालते. रिमोट
कंट्रोलचा वापर करून हे क्रेझी कॉप्टर उडवता येते. यात कॅमेरा व इ. अनेक हायटेक गॅजेटस् लावता येतात व याचा वापर सैन्यदलापासून ते अगदी बिल्डिंगच्या पाण्याच्या पाइपलाइन इन्स्पेक्शनसारख्या कोणत्याही गोष्टीसाठी करता येते.
टी.एन.टी. रोबोटिक्स्
जोनास टीएनटी आणि बेनो टीमरसन या दोन मित्रांनी त्यांच्या घराच्या बेसमेंटमध्ये ३८हून अधिक रोबोट बनवले आहेत व या रोबोटना ‘सॉकर रोबोट’ असे म्हणतात. ‘सॉकर रोबोट’ फुटबॉलही खेळतात. रोबोटस्साठी खास वर्ल्ड सॉकर चॅम्पियनशिप ही फुटबॉल स्पर्धादेखील आयोजित केली जाते. टीएनटी रोबोटस्नी २०१० चा रोबो कपदेखील जिंकला आहे.
इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ प्लायमाऊथ व मर्लिन सिस्टीमने तयार केलेला हा रोबोट संपूर्णत: स्वयंचलित आहे व तो अनेक प्रकारचे वेगवेगळे कामे करू शकतो. टीएनटी रोबोट प्रमाणेच हा रोबोटदेखील फुटबॉल खेळू शकतो. फुटबॉलशिवाय हा रोबोट स्प्रींट व मॅरेथॉनसारख्या इतर स्पर्धादेखील खेळू शकतो. पण हे कमी की काय या रोबोटने एफआयआरएची २०११ ची चॅम्पियनशिपदेखील जिंकली आहे.
आयडी माइंड टेली ऑपरेटेड रोबोट
जगाच्या कोणत्याही कोपर्यात बसून तुम्ही रोबोटला कोणतीही सूचना किंवा ऑपरेट करायचं तंत्रज्ञान आयडी माईडच्या टेली ऑपरेटेड रोबोटमध्ये आहे. या रोबोटमध्ये आपल्या संगणकाप्रमाणेच एक छोटा संगणक आहे. ज्याच्यासोबत तुम्ही टेली नेटवर्किंगच्या कोणत्याही सेवेचा वापर करून सदैव कनेक्टेड राहू शकता व रोबोटला हवी ती आज्ञा देऊ शकता.
सौजन्य:- फुलोरा, सामना ३११२२०११

‘माय नेम इज चिट्टी...स्पीड १ टेराबाईट, मेमरी १ झेटाबाईट...’ दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतच्या ‘रोबोट’ या चित्रपटातील ‘चिट्टी’ या ऍण्ड्रो ह्युमनाईड रोबोटला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. (त्यानंतर सर्वांना असा प्रश्न पडला की, खरंच रोबोट कधी माणसाची जागा घेऊ शकेल का?) गेल्या कित्येक वर्षांपासून लहान मुलांच्या कार्टूनपासून शेकडो स्काय फाय चित्रपटात आपल्या समोर अशा हजारो रोबोटिक व्यक्तिरेखा आल्या. त्यांनी कधी दुष्ट खलनायकापासून पृथ्वीवरील जीवसृष्टीचे रक्षण केले तर कधी रोबोटच खलनायक झाला आणि मानवाचा विध्वंस करू लागला. या सर्व रोबोटिक व्यक्तिरेखा आपल्या मनात कायम घर करून राहिल्या व सर्वजण कुतूहलाने का होईना हा विचार करू लागले की खरंच रोबोट कधी माणसाची जागा घेऊ शकेल का? व त्याचा माणसाला काय उपयोग होईल?
खरं तर रोबोट या संकल्पनेवर गेल्या शतकापासून जगातील अनेक शास्त्रज्ञ काम करीत आहेत व स्काय फाय चित्रपटातील रोबोटच्या करामती आता प्रत्यक्ष जगातील रोबोटदेखील करू लागले आहेत. आजचे रोबोट मेडिकल सायन्सपासून अगदी युद्धभूमीपर्यंत सर्वत्र वापरले जातात व अशी असंख्य कामे जी आपण करू शकत नाही. तेथे रोबोटची मदत घेतली जाते. यंदाच्या आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलोजी)च्या टेक फेस्टिव्हलमध्ये रोबोट आणि रोबोटिक्सच्या जगातील अनेक नवीन स्वप्नवत संकल्पना सादर केल्या जाणार आहेत.
रोबोटिक्सचे सायन्स विस्तारत आहे. मनुष्य सतत रोबोटचा वापर कसा व कुठे करता येईल, याकरिता या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शोधकार्य करीत आहे. रोबोटिक्सच्या या विस्तारलेल्या क्षेत्रातील अनेक गोष्टींची माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर आयआयटी मुंबईच्या टेक फेस्टिव्हलला जरूर भेट द्या. या संदर्भात अधिक माहिती www.techfest.org या संकेतस्थळावर मिळू शकेल.
क्रेझी कॉप्टर
३ इडीयट’ या चित्रपटात आपण सर्वांनी आमीर खानला छोटे कॉप्टर उडवताना बघितले आहे. हे कॉप्टर म्हणजे खरं तर मोठ्या हेलिकॉप्टरचे छोटे रूप पण याचं काम मात्र रोबोटिक्सप्रमाणे चालते. रिमोट

टी.एन.टी. रोबोटिक्स्

अटोनोमस रोबोट

आयडी माइंड टेली ऑपरेटेड रोबोट

सौजन्य:- फुलोरा, सामना ३११२२०११
No comments:
Post a Comment