Tuesday, January 10, 2012

टेक केअर

जकाल सर्वच कामे घरबसल्या कम्प्युटरवरून करण्याचा ट्रेण्ड वाढलाय. त्यामुळे कम्प्युटर म्हणजे ऑफिस ही संकल्पना केव्हाच मागे पडली. कम्प्युटर आला म्हणजेच त्याची काळजी घेणंही आलंच. ऑफिसमध्ये इंजिनीअर ही जबाबदारी पार पाडतात. पण घरी याची काळजी आपणच घेतली पाहिजे यासाठी कम्प्युटर हाताळताना काय करावे याची माहिती करून घेऊन.


- ऍण्टी वायरस : कोणतेही काम करताना मधेच फ्लॅश होणार्‍या जाहिरातींमुळे कम्प्युटरमध्ये वायरस येण्याची शक्यता असते. यामुळे एखाद्या चांगल्या कंपनीचा ऍण्टी वायरस असणे गरजेचे आहे. यामुळे कितीही क्षमतेच्या वायरसला रोखता येईल. मात्र हा ऍण्टी वायरस नेहमी अपडेट असला पाहिजे. यामुळे वायरस साईट्स आपोआप लॉक होतात.

- आऊटलूक एक्सप्रेस : आऊटलूक एक्सप्रेस शक्यतो वापरू नये. पण यावर काम करणे गरजेचे असल्यास ऍण्टी वायरस तपासून घ्यावा. कारण या सॉफ्टवेअरमधून काम करताना वायरस येण्याची शक्यता अधिक असते. शिवाय काम करणारी फाईल यामुळे करप्ट होते.

- पॉप - ब्लॉकर : ब्राऊजरवर एखादी वेबसाईट मग ती जाहीरातींची असो किंवा फुकट देण्यात येणार्‍या गिफ्ट्सची. या जाहिरातींना ब्लॉक करण्यासाठी पॉप ब्लॉकरचा उपयोग करावा. म्हणजे जर या जाहिराती आपण आधीही पाहिल्या असतील तर त्याच्या लिंकवर जाऊन ब्लॉक ऑप्शनला क्लिक करावा.

- स्पायवेअर : कम्प्युटरवर असलेले काही प्रोग्राम हे युजरची माहिती अन्य साईट्सला नकळत पुरवीत असतात. किंवा काही वेळा अन्य साइट्सच्या रिक्वेस्ट आपल्या नावाने येतात. याला पायबंद घालण्यासाठी स्पायवेअरचा वापर केला जातो. त्यामुळे कम्प्युटरमध्ये नेहमीच स्पायवेअर अपडेटेड असल्याची खात्री करून घ्या.

- फायरवॉल : फायरवॉल हा कम्प्युटर आणि इंटरनेटमधला सेफ्टी दुवा आहे. यामुळे कम्प्युटरवरील कोणताही प्रोग्राम युजरच्या परवानगीशिवाय स्क्रीनवर चालू होत नाही.

कम्प्युटरवर काम करताना सॉफ्टवेअरची घेतली जाणारी ही काळजी. पण बाह्य स्वरूपानेही कम्प्युटर नीट ऑपरेट व्हावा यासाठी वेगळी काळजी घेणे गरजेचे आहे.

- पावसाळयात आणि हिवाळ्यात सीपीयुच्या आतल्या भागात मॉइश्‍चरायजर जमण्याची फारच शक्यता असते. यामुळे कम्प्युटर सुरू केला तरीही स्क्रीनवर काहीही दिसत नाही. यासाठी सीपीयुचा आतला भाग सुक्या पेंटींग ब्रश किंवा कपड्याने साफ करावा.

- कम्प्युटर जास्त वापरात नसला तरीही त्याची नियमित स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.

- की-बोर्ड हा बर्‍याचदा वापरताना हार्ड झालेला दिसून येतो. यासाठी क्लिनर किंवा ब्रशने स्वच्छ करून घ्यावा.

- पेन ड्राइव्ह किंवा कोणतेही युएसबी वापरताना किंवा वापरून झाल्यावर स्कॅन करून घ्यावा. यामुळे वायरस प्रॉब्लेम उद्भवणार नाही.

- सीडी किंवा डिव्हीडी वापरताना ती क्रॅक झाली नाही ना हे पाहा.

- कम्प्युटरमध्ये युपीएस बॅटरी असणे गरजेचे आहे. जेणेकरून जर इलेक्ट्रिसिटी गेल्यास काही काळ पीसी चालू राहील. अन्यथा रॅम उडण्याची शक्यता असते.

- राजन सावंत
सौजन्य :- फुलोरा, सामना

No comments: