मी अकाउंटंट म्हणून काम केलेले
असल्याने कर्ज घेण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात त्याची कल्पना होती. त्या नुसार आम्ही
आधी पासूनच जमवाजमव सुरु केली होती. आणि मग HDFC च्या सचिन ने यादी लिहून दिली होती,
ती पहा....
पण वरील यादी देताना सचिन आर्थिक
वर्ष व इनकम टॅक्स नुसार अससेसमेंट वर्ष ह्या मध्ये गोंधळलेला दिसला. तो आर्थिक वर्ष
२०१६-१७ चा पण फॉर्म १६ मागत होता, तेव्हा मी सांगितले तो फॉर्म जून २०१७ मध्ये मिळतो.
आम्ही तुम्हाला अससेसमेंट वर्ष २०१५-१६ व २०१६-१७
चा फॉर्म १६ देऊ शकतो. पण सचिन बोलला, आर्थिक वर्ष २०१६-१७ चा फॉर्म १६ तुम्ही
मार्च २०१७ मध्ये घेऊ शकता, तेव्हा पत्नी HR विभागात काम करत असल्यामुळे तिच्या लक्षात
आले कि हा टॅक्स एस्टिमेशन ची कॉपी मागतो आहे. तेव्हा तिने सांगितले आम्ही तुम्हाला
फॉर्म १६ ची कॉपी आर्थिक वर्ष २०१४-१५ व २०१५-१६ ची देऊ व टॅक्स अनुमान २०१६-१७ करिता
देऊ, तेव्हा तो "हो" म्हणाला.
वरील यादी नुसार फक्त FD,
RD, LIC यादी व प्रोसेससिंग फी चा चेक त्याला बनवून द्यायची होता. पण आम्ही सोबत सिबिल
रिपोर्ट पण विकत घेऊन त्याची कॉपी व HDFC (सचिन) ने सांगितल्या प्रमाणे PMAY अर्ज ऑनलाईन
भरून त्याची कॉपी पण पूर्ण सेट बरोबर जोडली. आणि मग सचिन ला फोन करून यायला सांगितले.
पण त्याने सांगितले, आधी तो फॉर्म
देईल, तो फॉर्म पूर्ण भरून द्यायचा व जिथे सही आहे तिथे सही व फोटो चिकटवण्यास सांगितले.
बदलापूर स्टेशन ला भेटून त्याने फॉर्म दिला. मग मी हि सोबत नेलेला सर्व कागदपत्रांचा
सेट दाखवला व विचारले ह्यात अजून काही गरज आहे का ! तर तो बोलला "ठीक आहे."
मग ९/३/२०१७ रोजी सचिन घरी आला.
सर्व फॉर्म त्याने चेक केला. मी त्याला लोन डिटेल्स व प्रोजेक्ट डिटेल्स भरायला सांगितले.
त्याने विचारले, एकच अर्जदार डिटेल्स भरले आहेत. मी म्हटले "हो, लोन पत्नीच्या
नावे ठेवायचे आहे." बाकी फॉर्म मीच पूर्ण भरला होता. मग त्याला यादी प्रमाणे सर्व
कागदपत्रे एक एक करून दाखवली. आणि सोबत जोडलेले PMAY अर्ज व सिबिल रिपोर्ट पण दाखवला.
सिबिल ह्या शब्दावर पण तो गोंधळला दिसला. मी त्याला सांगितलं, तो लोन पास होण्यासाठी
क्रेडिट स्कोर लागतो, त्याचा रिपोर्ट, तेव्हा त्याच्या लक्षात आलं.
आणि अजून फॉर्म १६ व टॅक्स एस्टिमेशन
ज्या ज्या वर्षाचे हवे होते, तेही त्याला समजावून सांगितले. आणि मग मी भरलेल्या फॉर्म
ची एक झेरॉक्स काढून ठेवली. हि सर्व कागदपत्रे एक फॉरवर्डिंग लेटर सोबत लावून त्याला
ते लेटर अकनौलेज करायला सांगितले. पण तो बोलला, "त्याची काही गरज नाही, सर्व कागदपत्रे
आहेत." मग त्याच्या समोरच सर्व कागदपत्रे एका प्लास्टिक फोल्डर मध्ये टाकून मी
त्याला फोल्डर सकट हस्तांतरित केली. पण मी त्या फॉरवर्डिंग लेटर मध्ये PMAY अर्ज जोडल्याचा
पॉईंट टाकायला विसरलो.
आणि HDFC ने आमचा कर्ज अर्ज १६/०३/२०१७
ला प्रोससिंग ला घेतला. आणि लक्षात आले कि, HDFC त काम करणारे सुद्धा हलगर्जी पणा करू
शकतात. त्या मानाने आम्ही तरी बरे आहोत. त्यात त्यांना पत्नीच्या HR हेड ची माहिती
हवी होती व पुन्हा त्यांनी फॉर्म १६ असेसमेंट वर्ष २०१६-१७ ची मागणी पुन्हा केली होती,
व वर असेही म्हटले होते कि, सर्व कागदपत्रे सेल्फ सर्टिफाइड असावी लागतात. बघा तो ई-मेल.
म्हणजे HDFC च्या स्टाफ ला समोरच्या
ग्राहक ला काही समजत नाही असे वाटले. त्यात त्यांनी एच आर हेड चे डिटेल्स मागितले ते
ठीक होते पण पुन्हा फॉर्म १६ मागितला होता. त्या मुळे मग माझी सटकली. मग मात्र वाटले
ह्यांना पण थोडा झणझणीत पणा दाखवला पाहिजे. मी सुद्धा मग उत्तर दिले...
पण एवढ्याने त्यांचे समाधान झाले
नाही. मी फॉर्म १६ परत ई-मेल केलेला असून देखील सचिन तेलवणे १० - १० मिनिटाने पत्नीला
ऑफिस मध्ये फोन करून सांगत राहिला, फॉर्म १६ त्या सेट मध्ये नाही, परत ई-मेल केला.
पत्नीने हि वस्तुस्थिती मला सांगितली व मी परत सचिन ला फोन केला व म्हणालो तेव्हा दोन्ही
वर्षांचे फॉर्म १६ व चालू वर्षाचे प्रोजेकशन दिले आहे, तुम्ही सुद्धा बघितले आहे. तेव्हा
तो म्हणाला, "आता लोन प्रोसेस करत आहेत, म्हणून परत पाठवा."
म्हणजेच याचा अर्थ एवढ्या सेपरेट
फोल्डर मध्ये कागदपत्रे देऊन सुद्धा HDFC ने घोळ घातला होता, फॉर्म १६ कदाचित गहाळ
केला होता. मग पत्नीनेच वैतागून पुन्हा फॉर्म १६ पुन्हा पाठवला. पहा हा ई-मेल...
त्यानंतर मात्र तो दिवस शांततेत
गेला. पुन्हा १७/३/१७ रोजी सकाळीच HDFC चा परत ई-मेल आला. तुमचे कर्ज मान्य होणार आहे,
त्यासाठी तुम्ही भरून दिलेला अर्ज सोबत जोडला आहे, त्यात जर काही फेर बदल असेल तर कळवावे
किंवा कर्ज मान्यतेसाठी मान्यता द्यावी. हा पहा ई-मेल....
आणि एवढ्या खटाटोपी नंतर २३ मार्च
२०१७ रोजी आमचे कर्ज मान्य झाल्याचा ई-मेल आला. सोबत आम्ही सांगितल्या प्रमाणे लॉगिन
डिटेल्स पण पाठवले होते. म्हणजे कर्ज घेण्यासाठी पण एवढ्या खटाटोपी कराव्या लागतात,
तेव्हा कर्ज मिळते हे आता आमच्या चांगले लक्षात आले होते. म्हणजे ९ मार्च ते २३ मार्च
जवळ जवळ १४ दिवस लागले होते. तेही आम्ही ई-मेल वर सर्व केले म्हणून व सिबिल रिपोर्ट
८३२ चा स्कोर असताना देखील.
नाहीतर, विचार करा शेतकऱ्यांना
किती फेऱ्या माराव्या लागत असतील कर्ज मान्य करून घेण्यासाठी !!
क्रमशः....
==============================
हि लेखमालिका स्व-अनुभवावर आधारित
आहे. ह्यात कोणत्याही व्यक्ती वा संस्थेचा अपमान किंवा मानहानी किंवा जाहिरात करण्याचा
हेतू नाही. पण आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाला स्वतःचे घर घेताना येणाऱ्या प्रक्रियांचा
अनुभव व्हावा हाच उद्देश आहे. कारण, इतर कोणीही त्यांना घर घेताना काय प्रक्रिया करावी
लागली हे दुसऱ्याला सांगत नाहीत. म्हणून वाटले आपल्या सोबत घडणाऱ्या घटना आपल्यासारख्याच
इतरांना मार्गदर्शक ठरतील, म्हणून हा खटाटोप.
No comments:
Post a Comment