Saturday, October 07, 2017

स्वप्नातील घर - भाग ६ : डिमांड १




आता कर्ज प्रक्रिया पण आम्ही पूर्ण केली होती व वांगणी साईट वरून जसे सांगण्यात आले होते कि, रजिस्ट्रेशन साठी सानपाडा कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल, त्या प्रमाणे मग आम्ही १८ मार्च रोजी ई-मेल करून त्यांच्या कडून रजिस्ट्रेशन प्रक्रिये साठी लागणारे सर्व डिटेल्स मागितले व त्यांना हेही सांगितले कि दर महिन्याच्या १ ते १५ तारखे दरम्यानच आम्ही येऊ शकतो. बघा हा ई-मेल.



आणि.. २१ मार्च २०१७ रोजी दि. ११-०३-१७ चे एक डिमांड लेटर आले रु ३,४३,८६०/-. त्यात असे म्हटले होते कि, "पहिल्या C5 पहिल्या स्लॅबचे काम ह्या महिन्यात पूर्ण होईल." म्हणजे याचा अर्थ तळ मजला पूर्ण होऊन जेव्हा त्यावर स्लॅब घातली जाईल, म्हणजे पहिल्या मजल्याची जमीन बनेल, त्याचे पैसे देणे. पण गम्मत बघा, एक्सर्बिया चेच एप्रिल २०१७ चे यु-ट्युब काय दाखवते ते. अजून प्लिंथ चेच काम सुरु आहे.



म्हणजे उघडपणे ग्राहकाची दिशाभूल केली जाते. का ? तर फक्त रक्कम मिळण्यासाठी. अर्थात ह्यात जनसामान्यांची पण चूक आहे. एवढे इंटरनेट वापरत असतात, पण जे आपल्याला उपयोगी पडेल ते शोधूया याचा कोणी विचारच करत नाही.
बरं. आमच्या अजून एक गोष्ट लक्षात आली ती कि, कर्ज कंपनी व बिल्डर मध्ये कॉ-ऑर्डिनेशन असते. २१ मार्च ला डिमांड लेटर मिळाले व नंतर लक्षात आले कि HDFC ने २३ मार्च ला कर्ज मान्य केले होते.


मग ३ एप्रिल २०१७ रोजी आम्हाला HDFC चे २४ मार्च २०१७ कर्ज मान्यतेचे पत्रं  मिळाले. पण त्यात लक्षात आले कि, व्याज दर हा ८.५०% टक्क्या प्रमाणेच लावण्यात आला होता, PMAY चा अर्ज देऊन सुद्धा. मग आम्हाला पुन्हा विचार करण्याची वेळ आली कि, जर सबसिडी मिळणार नसेल तर मग काय उपयोग ! पण आता कर्ज पण मान्य झाले आहे, त्यामुळे आम्ही चांगलेच कात्रीत सापडले गेलो. मग काय पुन्हा पत्रं लिहिण्याशिवाय पर्याय नव्हता. एका सरळ ग्राहकाप्रमाणे मग आम्ही कर्ज मान्य पत्राची कॉपी पुढील फॉरवर्डिंग लेटर सोबत पाठवली.





क्रमशः
==================================
 हि लेखमालिका स्व-अनुभवावर आधारित आहे. ह्यात कोणत्याही व्यक्ती वा संस्थेचा अपमान किंवा मानहानी किंवा जाहिरात करण्याचा हेतू नाही. पण आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाला स्वतःचे घर घेताना येणाऱ्या प्रक्रियांचा अनुभव व्हावा हाच उद्देश आहे. आता पुढे घडणाऱ्या घटना आपल्याला बरेच काही शिकवतील हि आशा आहे.

No comments: