....
महिनाभर काही हालचाल नव्हती. आम्ही मग १६.०२.२०१७ रोजी ३ (तिसरे) डाउन पेयमेन्ट व इतर
चार्जेस (रेजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, सेल्स टॅक्स, लीगल चार्जेस) रु. ५५,
०९६/- चा चेक पण सोबत घेऊन
निघालो. हा चेक देण्यासाठी आम्ही शेयर्स मधील सर्व गुंतवणूक विकली. वांगणी ला साधारण
दु. २ वाजता पोचलो. आता एक्सर्बिया ने स्टेशन जवळ पण पिक अप ड्रॉप ऑफिस उघडले होते.
तेव्हा जवळ जवळ २० मिनिटे एकही गाडी प्रोजेक्ट ला नेण्यासाठी उपलब्ध नव्हती.
नंतर
आम्ही प्रोजेक्ट ला पोचताना ट्रॅफिक सुद्धा लागले, तसेच रस्त्यावर च्या कडेची पण साफसफाई
सुरु असलेली दिसली. प्रोजेक्ट ला पोचल्यावर आम्ही दोन्ही चेक सुपूर्द केले व बांधकाम
सुरु असलेली सुरुवातीची इमारत पाहण्यासाठी गेलो. पण अजून पायाभरणी सुरु होती. त्यामुळे
मग आम्ही परतलो.
आणि
मग दि. २०.०२.२०१७ चे पत्रं २३.०२.२०१७ रोजी मिळाले. त्यातून अजून एक शॉक बसला. त्यात
लिहिले होते कि, डाउन पेयमेन्ट वेळेवर न भरल्यास १८% वार्षिक व्याज चार्ज केले जाईल.
आम्ही तर एव्हाना ३ महिन्याचे डाउन पेयमेन्ट वेळेवर केले होते. मग असे पत्रं कसे आले !! बघा ते पत्रं ....
अजून
एक चूक लक्षात आली ती म्हणजे वरील पत्रामध्ये एक्सर्बिया ने पत्नीचा ई-मेल पत्ता त्यांच्या
डाटाबेस मध्ये चुकीचा फीड केला होता. shilpu68@gmail.com च्या ऐवजी
shilpapv68@gmail.com असा फीड केला होता. म्हणजे आता एवढ्या लहान लहान गोष्टींकडे पण
आम्हाला लक्ष द्यावे लागत होते.
मग
०४.०३.२०१७ रोजी आम्ही शेवटचे डाउन पेयमेन्ट करण्यासाठी आशियाना प्रोजेक्ट, वांगणी
ला पोचलो. पेयमेन्ट केले व बांधकाम सुरु असलेली इमारत पाहण्यासाठी पुढे गेलो. D1 ह्या
इमारतीचे तळमजल्याचे स्ट्रक्चर उभे झाले होते. तेव्हा लक्षात आले कि, एवढा मोठा प्रोजेक्ट
असून सुद्धा इमारती रस्ता उंची पासून वर बांधण्यात आलेल्या नाहीत. रस्ता उंची प्रमाणे
बांधण्यात आलेल्या आहेत.
कारण
आम्ही सध्या राहत असलेली बदलापूरची इमारत सुद्धा १७ वर्षांपूर्वी तेव्हाच्या रस्ता
उंची प्रमाणे बांधण्यात आली होती, पण कालांतराने
रस्ता उंच होत गेला, त्यामुळे इमारत सखल झाली व आता दरवर्षी पावसाचे पाणी इमारतीत जमा
होऊन राहते.
मग
आम्ही विचार केला, जाऊ दे, हा प्रोजेक्ट डोंगर माथ्यावर आहे व आतील रस्ते हे प्रोजेक्ट
चे रस्ते असल्यामुळे ते काही उंच होणार नाही. पण मी डोंबिवली पासून अंडर कंस्ट्रक्शन
इमारती पाहत आल्यामुळे मला येथील पिल्लर (सिमेंटचे खांब) चा रंग इतर इमारती प्रमाणे
वाटला. म्हणजे ज्या "हाफिज कॉन्ट्रॅक्टर" चा नावाचा वापर करून इमारती बांधतात
त्यात काही नुसत्या बघण्याने तर फरक जाणवला नाही. बहुदा, फक्त इमारतीचा बाह्य लुक आकर्षक
करत असावेत.
परत
मग पेयमेन्ट काउंटर वर जाऊन आम्ही लोन ची व मनीष ची चौकशी केली, तेव्हा तेथील एक्सर्बिया
रेप्रेसेंटेटिव्ह ने सांगितले, मनीष मीटिंग मध्ये आहे, व PMAY ची प्रक्रिया लोन वाला
माणूस च सांगेल. मग त्याने आमची ओळख HDFC रेप्रेसेंटेटिव्ह सचिन तेलवणे शी ओळख करून
दिली. त्याने तर आणखी वेगळे सांगितले, तो म्हणाला "PMAY साठी अर्ज तुम्हालाच सायबर
कॅफे मधून ऑनलाईन करावा लागेल." हे ऐकून तर वैतागच आला.
म्हणजे
ज्या एक्सर्बिया ने सांगितले तुमचे PMAY होऊन जाईल, त्यांनी पण हात वर केले व HDFC
वाल्याने पण असे सांगितल्यामुळे आम्हाला पण वाटले व्याज सबसिडी काय आम्हाला मिळणार
नाही.
मग
परतत असताना, एक्सर्बिया ची पिक अप गाडी येई पर्यंत आम्ही वाट बघत गेट वर थांबलो होतो,
तेव्हा मनीष साईट ऑफिस मध्ये फिरताना दिसला. त्यामुळे मन अजूनच खट्टू झाले. आणि आम्ही
परतलो, आता लोन प्रक्रिया पूर्ण करायची होती...
क्रमशः....
==============================
==============================
हि लेखमालिका स्व-अनुभवावर आधारित
आहे. ह्यात कोणत्याही व्यक्ती वा संस्थेचा अपमान किंवा मानहानी किंवा जाहिरात करण्याचा
हेतू नाही. पण आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाला स्वतःचे घर घेताना येणाऱ्या प्रक्रियांचा
अनुभव व्हावा हाच उद्देश आहे. कारण, इतर कोणीही त्यांना घर घेताना काय प्रक्रिया करावी
लागली हे दुसऱ्याला सांगत नाहीत. म्हणून वाटले आपल्या सोबत घडणाऱ्या घटना आपल्यासारख्याच
इतरांना मार्गदर्शक ठरतील, म्हणून हा खटाटोप.
No comments:
Post a Comment