धुमाळवाडी गावातून गड चढताना डावीकडे पाण्याचे एक खांबटाके आहे. गावातून
तासाभरात आपण गडाच्या भक्कम दरवाजात येऊन पोहोचतो. गडाच्या दरवाज्यापर्यंत
येणारा रस्तासुद्धा आपल्याला इथेच येऊन मिळतो. गडाच्या दरवाजाला सध्या
गडावर मुक्कामास असलेल्या साधुबाबांनी लोखंडी गेट बसवले आहे. दरवाजातून आत
गेल्यावर आपल्याला खालच्या बाजूला उतरत गेलेल्या पायर्या दिसताच. कल्याणगड
किल्ल्यावर हे भुयारवंजा मंदिर असून सुमारे शंभर फुट आत गेल्यावर समोर
दत्तात्रेय,पार्श्वनाथ व पद्मावती देवीची मूर्ती आहे. हे भुयारी मंदिर हेच
कल्याणगड किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे. पूर्वी ह्या भुयारात गुडघाभर
पाण्यातून जावं लागत असे पण आता भुयारातील पाणी उपसून काढण्यात आले आहे.
भुयार बघून बाहेर आल्यावर पुढे आपण बालेकिल्ल्याच्या भक्कम दरवाजातून
बालेकिल्ल्यात प्रवेश करतो. समोरच मारुतीचे मंदिर आहे. बालेकिल्ल्यावर
पाण्याची टाकी,वाडयाचे अवशेष,कोरीव दगड,चुन्याचा घाणा,सदरेचे अवशेष,एक
पीर,भग्न तटबंदी,धान्यकोठार व एक तलाव असून समर्थ रामदासांचे शिष्य
असलेल्या कल्याणस्वामींची समाधी आहे. त्यांच्या नावावरूनच गड कल्याणगड
नावाने ओळखला जातो. गडावर प्रचंड मोठा नांदुरकी नावाचा वृक्ष असून तो
सातारा परिसरातून कुठूनही सहज नजरेस पडतो. ह्या नांदुरकीच्या झाडामुळेच
कल्याणगडाला नांदगिरी असेही एक नाव आहे. गडमाथ्यावरून चंदन-वंदन
किल्ले,जरंडेश्वर,अजिंक्यतारा किल्ला, वर्धनगड व सातारा शहराचं अतिशय
सुंदर दृश्य दिसतं. कल्याणगडावर आता गाडी जात असल्याने तसेच भरपूर अवशेष व
विस्मयकारक असे जलमंदिर अतिशय प्रेक्षणीय असल्याने एका दिवसात नांदगिरी
ऊर्फ कल्याणगडाचा हा ट्रेक धम्माल आणतो.
विशेष सूचना
– भुयाराच्या आत जाताना त्याच्या कड्यावर मधमाशांची पोळी असल्याने अजिबात गोंधळ करू नये तसेच कोणत्याही प्रकारचा धूर करू नये.
– कल्याणगड किल्ल्याला जोडून जवळपास बघण्यासारखी भरपूर ठिकाणे असून त्यात सातार्याचा अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड, जरंडेश्वर डोंगर, पाटेश्वर, यवतेश्वर, वर्धनगड- महिमानगड, लिंब खिंड गावाजवळच्या शेरी गावातील बारा मोटेची विहीर ही अतिशय प्रेक्षणीय व चुकवू नये अशी ठिकाणे आहेत.
जायचं कसं
पुणे-बंगलोर महामार्गावर सातारा रोड गावाकडे जाणारा फाटा आहे. तिथून पुढे सुमारे वीस किलोमीटर्सवर असलेले सातारा रोड स्टेशन गाठावे. सातारा रोड स्टेशन वरून किन्हई गावाकडे जाणार्या रस्त्यावर धुमाळवाडी गाव आहे. तिथून तासाभरात किल्ल्यावर जाता येते. तसेच किल्ल्याच्या शेजारच्या डोंगरावर सध्या पवनचक्क्या झाल्याने गडाच्या दरवाजापर्यंत मोठा लाल मातीचा रस्ता तयार करण्यात आला आहे ज्यामुळे आता चारचाकी वाहनाने सुद्धा गडाच्या वरपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे.
जेवणाची सोय : गडावर जाताना जेवण सोबत घेऊन जावे किंवा पुणे- बंगलोर महामार्गावर जेवणासाठी हॉटेल्स आहेत तसेच कल्याणगडाच्या पायथ्यालाही जेवणासाठी हॉटेल आहे.
पाण्याची सोय : गडावर पाणी उपलब्ध आहे.
ओंकार ओक
सौजन्य :- फुलोरा, सामना २६०२१६

No comments:
Post a Comment