गणेश उत्सवानंतर येणारा मोठा सण म्हणजे नवरात्री. देवीचा घट स्थापून या पूजेचा आरंभ होतो. महाराष्ट्राबरोबरच गुजरात व कोलकात्यामध्ये नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आदिशक्तीची या दिवसांत करुणा भाकली जाते.
- नवरात्री म्हणजे देवीच्या चरणी वाहिलेले नऊ दिवस-रात्र.
- नवरात्री वर्षातून दोनदा येते.
- एक उन्हाळा सुरू होताच तर दुसरी थंडीच्या मोसमात.
- पौराणिक कथेनुसार या काळात देवीची शक्ती वाढलेली असते.
- दुर्जनांचा, दुष्टांचा संहार करण्यासाठी देवी प्रत्यक्ष भूतलावर येते.
- नऊ दिवस चालणार्या या उत्सवाचे पहिले तीन दिवस माता दुर्गेसाठी असतात.
- नंतरचे तीन दिवस लक्ष्मीसाठी असतात.
- शेवटचे तीन दिवस सरस्वतीची उपासना करण्यासाठी असतात.
- या दिवसांत अनेक भक्त नऊ दिवस कडक उपवास करतात.
- मंदिरांमध्ये नऊ दिवस मोठ्या उत्साहात गरबा खेळून नवरात्रोत्सव साजरी केली जाते.
सौजन्य :- फुलोरा, सामना २००९१४
No comments:
Post a Comment