चंगूमंगू वडापाव म्हणजे झणझणीत आणि ढासू खाण्याची आवड असणार्या खवय्यांचा कट्टाच. सकाळचा नाश्ता असो की दुपारचा लंच नाहीतर संध्याकाळचा स्नॅक्स दहिसर पूर्वेला पोलीस ठाण्याला लागूनच असलेल्या सिग्नलजवळचा चंगूमंगू ऑल टाइम हीट...
झणझणीत वड्यासाठी हिरव्या मिरच्याच्या ठेच्यात बनवलेली मराठमोळी पिवळ्या बटाट्याची भाजी आणि तिचा तिखटसर भूक चाळवणारा सुगंध पार काशिमिरा अन् बोरिवलीकरांना दहिसरला खेचून आणतो. यामुळे इथे कधीही जा तोबा गर्दी मिळणारच, पण अच्छा और टेस्टी खानेका है तो वेट करनाच पडेगा ना..असे सांगत अनेक भुकाळू जिभेवर कंट्रोल करत रांगेत शांतपणे उभे असतात. हे विशेष.. चंगूमंगूचा वडा जेवढा हीट तेवढीच मिसळ, उसळ, कांदा भजी, बटाटा भजी आणि ब्रेड कटलेटही.. लालबुंद तिखटात तयार केलेल्या मिसळवर येणारी केशरी तर्री बघताच भूक नसतानाही भूक लागेल हे त्या मिसळचे वैशिष्ट्य. कुरकुरीत कांदा भजी तर अफलातून. आंबटगोड चटणीबरोबर तिची टेस्टही दुप्पट वाढते.
सकाळी दुपारी इथे जशी पुरुषांची, स्टुडंटस्ची गर्दी असते तशीच संध्याकाळी ऑफिसहून घराकडे परतणार्या महिलांची ब्रेड कटलेटससाठी चंगूमंगू स्टॉलवर गर्दी होते तर काहीजणी पार्सलची ऑडर ऑफिसमधूनच देतात.
गेल्या २१ वर्षांपासून चंगूमंगूने आपल्या खास ठेवणीतल्या टेस्टमधून खवय्यांना बांधून ठेवलंय. यामुळे चंगूमंगू नुसतच खाण्यासाठी प्रसिध्द नाही तर लॅण्डमार्क म्हणूनही रिक्षावाल्यांपासून बेस्टच्या कंडक्टरपर्यत सगळेचजण चंगूमंगूला ओळखतात. अलका वाईकर आणि मंगेश विचारे यांच्या कल्पनेतून साकारलेला चंगूमंगू वडापाव स्टॉल आधी साध्या फुटपाथवर लागायचा आता त्याच दुकानात रूपांतर झालंय. हे सगळे आमच्या गिर्हाईकांमुळे शक्य झाल्याचे मालक मंगेश विचारे कृतज्ञतापूर्वक सांगतात.
सौजन्य :- fulsaam123@gmail.com

No comments:
Post a Comment