अनेक वर्षापूर्वी धर्मेंद्रचा ‘’जीवनमृत्यू’’ नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात
शेअर बाजारात अतिशय कमी किमतीचे शेअर विकत घेऊन त्यांचे भाव वाढवून दाखवले जात असत
आणि नंतर ते विकले जात असत. नंतर ज्यांनी जास्त भावात ते शेअर विकत घेतले असत
त्यांना नंतर कळत असे की आपण अतिशय खराब शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे जे कधीच परत
त्या किमतीला विकले जाऊ शकणार नाही; हा झाला चित्रपटाचा भाग. पुढे या विषयवार अनेक
पुस्तके देखील आली. जगातील अनेक शेअर बाजारात अनेक प्रकारचे वेगळे फसवणुकीचे आणि
गैरव्यवहारचे गुन्हे घडले आहेत त्यात भर पडली ती कमी किमतीचे शेअर जास्त भावात
विकून पैसे कमावायच्या योजनेची. ज्याला पुढे हॅक पंप ऍण्ड डंप असे नाव
पडले.
क्रिस्टोफर रॅड आणि जेम्स बॅ्रग नावाच्या दोन हॅकर्स च्या डोक्यात हॅक पंप ऍण्ड डंपची पैसे कमवायची योजना आली. बरेच दिवस त्यांनी यातून कशा प्रकारे पैसे कमावता येतील याचा अभ्यास केला आणि एक पध्दतशीर योजना बनवली. प्रथम त्यांनी कोणत्या कंपन्यांचे शेअर अतिशय कमी किमतीचे आहेत त्याची एक यादी बनवली आणि अशा कंपन्यांचे लाखो शेअर अतिशय स्वस्तात विकत घेतले. हे करत असताना त्यांना माहीत होत की या कंपन्यांचे शेअर कधीच वाढणार नाहीत. मग हळूहळू त्यांनी इंटरनेटवर खोट्या जाहिराती देऊन या कंपन्या कशा चांगल्या आहेत आणि काही दिवसात या कंपन्यांचे शेअर कसे वाढणार आहेत याच्या चर्चा सुरू केल्या. हे करत असताना त्यांनी लाखो लोकांना ईमेल द्वारे देखील या कंपनीच्या शेअरबद्दल खोटी माहिती पाठवली. याच ईमेलमध्ये त्यांनी मग व्हायरस टाकला होता जो समोरच्या माणसाच्या संगणकातील गोपनीय माहिती त्यांना पाठवत असे. अगदी जर कोणी संगणकात काही टाईप देखील केले तरी त्यांना ते कळत असे.
पुढे मग याच माहितीचा वापर करून त्यांनी लाखो लोकांचे शेअर खाते हॅक केले आणि त्या खात्यात स्वत:च कमी भावाच्या कंपन्यांचे शेअर जास्त भावात विकत घ्यायचा सपाटा लावला. या सर्वांमुळे अचानक कमी भावातल्या शेअरची किमत अचानक वाढू लागली आणि अनेक लोक मग ते शेअर्स विकत घेऊ लागले, जसजशी शेअर्सची किमत वाढू लागली तसतसे मग क्रिस्टोफर रॅड आणि जेम्स बॅ्रग यांनी स्वत:कडे असणारे त्याच कंपन्यांचे शेअर्स जे त्यांनी अगदी स्वस्तात विकत घेतले होते ते विकायला सुरुवात केली आणि काही दिवसातच त्यांनी तब्बल ४० कोटीहून अधिक पैसे कमावले. काही दिवसातच ते फरारी झाले. पुढे अनेक गुंतवणूकदारांनी तक्रार केल्यावर अमेरिकन शेअर बाजार खडबडून जागा झाला. पुढे कित्येक वर्ष या फसवणुकीचा तपास सुरू होता. अखेर २ वर्षानंतर क्रिस्टोफर रॅड आणि जेम्स बॅ्रग यांना जगाच्या दुसर्या टोकावरून अटक करण्यात आली आणि जागतिक शेअर बाजारात गुंतवणूक करणार्या लाखो लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

amitghodekar@hotmail.com
सौजन्य :- फुलोरा, सामना ०३१०१४
No comments:
Post a Comment