महिन्यांमागून महिने जातात तसे निरनिराळे ऋतुसोहळे निसर्गाच्या अंगणात रंगतात. फुलपाखरे स्वच्छंदीपणाने उडताना-बागडताना दिसू लागतात, तेव्हा आपले मनही आनंदभराने नाचू लागतं. ऑक्टोबर टू डिसेंबर हे दिवस फुलपाखरांचेच. सध्या हवेवर स्वार होऊन भिरभिरणार्या नाजूक-कोमल फुलपाखरांमुळे सृष्टीचे सौंदर्य अधिकाधिक खुललेय. वेस्टर्न घाटात हे फन्टॅस्टिक ‘ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ बटरफ्लाईज्’ दिसू लागलेय! अगदी नॅचरल ब्युटी!
वास्तविक हा कीटक प्रदेशनिष्ठ आहे. विशिष्ट ठिकाणीच तो सापडतो. कलर, आकार यात व्हरायटी दिसते. वेस्टर्न घाटात नैसर्गिक सहजीवन अजून बर्यापैकी शाबूत असल्याने फुलपाखरांची संख्या येथे बर्यापैकी दिसते. वाइल्ड फ्लॉवर्सच्या जोडीने सह्याद्रीच्या कुशीत कलरफुल्ल बटरफ्लाईज दिसू लागलीत. म्हणूनच निसर्गवेड्यांचे आणि अभ्यासकांचे पाय आता त्या दिशेने पडताहेत. अंडी-अळी-कोष-फुलपाखरू...आणि पुन्हा अंडी...असे त्यांचे लाइफ सायकल सुरूच राहते. फुलपाखरे ‘स्ट्रॉ’सारख्या लवचिक सोंडेने निरनिराळ्या फुलांतील मधुरस शोषून घेतात. चार पंख असलेल्या फुलपाखरांच्या डोक्यावर स्पर्श सूत्रांची जोडी असते. त्याला गमतीने ‘अँटिना’ही म्हणतात. या ‘अँटिना’मुळेच त्यांना गंध, स्पर्श आणि दिशा याची माहिती कळते. जगभर फुलपाखरांच्या पंचवीस हजारांवर जाती आहेत. ग्रास ज्यूवेल हे हिंदुस्थानातील सर्वात लहान फुलपाखरू असून, ते हाताच्या करंगळीच्या बोटाच्या नखाएवढे असते. सदर्न बर्डविंग हे देशातील सर्वात मोठे फुलपाखरू मोठ्या माणसाच्या हाताच्या पंजाएवढे असते.
ब्लू ऑफ लीफ, सदर्न बर्डविंग, मलबार ट्री निम्फ, तामिळ योहमन ही फक्त वेस्टर्न घाटात आढळणारी फुलपाखरे आहेत. गंधार किंवा घाणेरीजवळ फुलपाखरे पिंगा घालताना दिसताहेत. त्यांच्यासोबत पतंग, मधमाश्या, पाकोळ्या आहेत. तालिमखाना, रुई, वाघाटी, कडीपत्ता, चित्रक, सोनचाफा, बेल, बहावा, एरंड, बांडगूळ, पितवेल, लिंबू, माकड लिंबू, संत्री या झाडांवर निरनिराळी पाखरे उतरलीत. यातली काही पॅरट, पिकॉक, आऊल अशा पक्ष्यांच्या नावाने ओळखली जातात. त्यातली कॉमनक्रो, इनिग्रंट ही वर्षभर नजरेस पडणारी. लहान फुलपाखरे निळ्या रंगाची असतात. पांढर्या-पिवळ्यासोबत नारिंगी रंगाची फुलपाखरे सूर्यपूजक मानली जातात. सकाळी पंख पसरून ती खुशाल उन्हाला बसतात. सकाळी आठपर्यंत आणि सायंकाळी पाचनंतर फुलपाखरे पाहायची योग्य वेळ असते. हा पर्यावरणातील अत्यंत संवेदनशील घटक आहे. परागीकरणात फुलपाखरांबरोबरच मधमाश्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. एका कवीने फुलपाखरांना देवाची मुले म्हटलेय. देवाच्या या सुंदर मुलांकडे कवी किती तरलतेने, संवेदनशीलतेने पाहतोय. आणि आपण? डोळ्यांना सुखावणारी देखणी लगबग भविष्यातही दिसायची तर यांच्या जतन-संवर्धनासाठी जागरुकता हवीये.
सौजन्य:- भाऊसाहेब चासकर, फुलोरा, सामना २४०८१३

No comments:
Post a Comment