पृथ्वीच्या अगदी जवळ असणारा ग्रह म्हणजे शुक्र. संध्याकाळी किंवा सकाळी अतिशय तेजस्वी तार्याप्रमाणे दिसणारा हा ग्रह जरा विचित्रच आहे. या ग्रहावर सूर्य चक्क पश्चिमेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो. याला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी २४३ दिवस लागतात, पण सूर्याभोवती मात्र हा २२५ दिवसात एक फेरी पूर्ण करतो. म्हणजेच शुक्रावरचा दिवस त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे. याच्या अभ्यासासाठी ESA ने व्हीनस एक्सप्रेस नावाचे यान ९ नोव्हेंबर २००५ ला सोडले. हे यान शुक्रावर एप्रिल २००६ ला पोहोचले. चंद्र किंवा बुध ग्रहावर आढळणारे विवर शुक्रावर कमी आढळतात कारण शुक्रावर अजूनही जागृत ज्वालामुखी आहेत यामुळे त्याच्या पृष्ठभागाची सतत जडणघडण होत असते. व्हीनस एक्सप्रेसच्या अभ्यासातून असेही लक्षात आले की त्याच्यावरील वातावरण अतिशय वेगाने फक्त ४ दिवसात शुक्राभोवती फेरी पूर्ण करते. त्याच्या वातावरणात पृथ्वीच्या तुलनेत लक्षावधीपट सल्फर डायऑक्साईड आहे.
सौजन्य:- फुलोरा, सामना १३०७१३
सौजन्य:- फुलोरा, सामना १३०७१३
No comments:
Post a Comment