Saturday, July 20, 2013

मसुर्‍याच्या प्रसादाची सोलकडी

  






‘‘आजयेच्या हाताची चव आईशीच्या हाताला नाय आणि आईशीच्या हाताची चव बायकोच्या हाताला नाय... आजयेने केलेला धनगरी मटण...’’ असं म्हणून मालवणी माणूस नोस्टॅलजिक झाला की, समजायचं चाकरमान्याला गावचे वेध लागलेत... हीच मेख हेरून मसुर्‍याच्या प्रसाद परबने घोडबंदर रोडवर ‘सोलकढी’ नावाची एक कार्पोरेट एसी ‘पडवी’ उभी केली... स्ट्रक्चर आणि लुक कार्पोरेट असला तरी फील मात्र ‘पडवी’तल्या त्या जेवणाचा... आणि साबणाने हात धुतले तरी वास राहील अशा कालवणाचा...!









एन्ट्रीलाच मसुर्‍याच्या देवस्थानचे गार्‍हाणे... बाय माझे आवशी सातेरी, भराडी... त्यामुळे खवय्या थेट मालवणी मुलखात. काचेच्या पार्टीशनने झाकलेले किचन. आतमध्ये शामसुंदर धुरी हा मालवणी शेफ त्याच्या कामात मग्न... किचनचा दरवाजा उघडताच गंध दरवळतो. भूक चाळवते...


मसुर्‍यातून त्याला त्याच्या काकांनी इथं आणलं... काही तरी काम कर म्हणून हॉटेलमध्ये म्हणजे ‘रेनासन्स’सारख्या स्टार हॉटेलमध्ये लावले... हाच त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट. तो या हॉटेलमध्ये काम करता करता ‘शेफ’ कधी झाला हे त्यालाही कळले नाही... रेनासन्स मग लीला नंतर परदेशातही तो जाऊन आला... हॉटेल क्षेत्रातले बारकावे त्याने जाणले आणि स्वत: हॉटेलिंगमध्ये पाऊल टाकताना मसुर्‍याच्या मातीशी नाळ कायम ठेवत मालवणी सोलकढीला त्याने कॉर्पोरेट मसाल्यात मिक्स करून टाकले.

आजीच्या हाताची चव ही आठवण त्याने जपली म्हणूनच त्याच्या हॉटेलमधील मसाले थेट मालवणातून येतात. अगदी खोबर्‍यापासून सर्व काही.. इथली प्रत्येक ‘डिश’ प्रसादनेच त्याचा ‘कॉर्पोरेट लुक’नुसार डिझाईन केली आहे. त्याचे म्हणणे एकच ‘आजयेच्या हातची चव’ चाकरमान्यालाच नव्हे तर कोणालाही केव्हाही घेता आली पाहिजे...

स्पेशल डिशेस

हळदीच्या पानातले सुळे, केळीच्या पानातले सौंदाळे, चुलीवरची कलेजी, तुडतुडी कोंबडी, चिंगळाची भजी तर शाकाहारीत भटाचे वरण, आळूवडीची आमटी, टोमॅटोचा सार, पीठी भात, शेंगाची डाळ, डेझर्टस्मध्ये खापरोळ्या, खरवस... खास मालवणी मुलखातल्या आंबोळ्या, घावने आणि नेहमीचे कोंबडी वडे किंवा भाकर्‍या आहेतच... प्रत्येक पदार्थ तोंडाला पाणी आणणारा... थेट मालवणात पोचवणारा...!

माझ्या मालवणी मुलखातली ‘चव’ इंटरनॅशनल झाली पाहिजे... बास.... म्हणूनच ‘सोलकढी’ला कॉर्पोरेट लूक दिलाय...

- प्रसाद परब
सौजन्य:- फुलोरा, सामना १३०७१३

विलक्षण शुक्र

पृथ्वीच्या अगदी जवळ असणारा ग्रह म्हणजे शुक्र. संध्याकाळी किंवा सकाळी अतिशय तेजस्वी तार्‍याप्रमाणे दिसणारा हा ग्रह जरा विचित्रच आहे. या ग्रहावर सूर्य चक्क पश्चिमेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो. याला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी २४३ दिवस लागतात, पण सूर्याभोवती मात्र हा २२५ दिवसात एक फेरी पूर्ण करतो. म्हणजेच शुक्रावरचा दिवस त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे. याच्या अभ्यासासाठी ESA ने व्हीनस एक्सप्रेस नावाचे यान ९ नोव्हेंबर २००५ ला सोडले. हे यान शुक्रावर एप्रिल २००६ ला पोहोचले. चंद्र किंवा बुध ग्रहावर आढळणारे विवर शुक्रावर कमी आढळतात कारण शुक्रावर अजूनही जागृत ज्वालामुखी आहेत यामुळे त्याच्या पृष्ठभागाची सतत जडणघडण होत असते. व्हीनस एक्सप्रेसच्या अभ्यासातून असेही लक्षात आले की त्याच्यावरील वातावरण अतिशय वेगाने फक्त ४ दिवसात शुक्राभोवती फेरी पूर्ण करते. त्याच्या वातावरणात पृथ्वीच्या तुलनेत लक्षावधीपट सल्फर डायऑक्साईड आहे.


सौजन्य:- फुलोरा, सामना १३०७१३

हिंदुस्थानचे पहिले

- हिंदुस्थानास भेट देणारा पहिला रशियन पंतप्रधान - निकोलाय बुल्गानिन
- हिंदुस्थानास भेट देणारा पहिला ब्रिटिश पंतप्रधान - हॅरॉल्ड मॅकमिलन

- हिंदुस्थानास भेट देणारा पहिला चिनी नेता - माओत्से तुंग

- हिंदुस्थानातील पहिले हिंदी वृत्तपत्र - उदंत मार्तंड

- हिंदुस्थानचे पहिले संरक्षणमंत्री - एन. गोपालस्वामी अय्यंगार

- हिंदुस्थानाचे पर्यटन विकास महामंडळ स्थापन - १ ऑक्टोंबर १९६६

- पर्यटन विभागास स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा - २३ मे १९९८

- ब्रिटिश हिंदुस्थानचे व्हॉईसरॉय - लॉर्ड कॅनिंग

- हिंदुस्थानचे पहिले उपपंतप्रधान - सरदार वल्लभभाई पटेल

- अँटार्क्टिकावर पदार्पन करणारा प्रथम हिंदुस्थानी - ले. रामचरण

- आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले सहन्यायाधीश - दॉ. नागेश सिंग

- निवडणूक आयोगाचे पहिले निवडणूक - आयुक्त सुकुमार सेन

- पहिला हिंदुस्थानी आकाशवीर - राकेश शर्मा

- नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले हिंदुस्थानी - रवींद्रनाथ टागोर

- रिझर्व बँकेचे पहिले हिंदुस्थानी गव्हर्नर - चिंतामणराव देशमुख

- उच्च न्यायालयाच्या महिला न्यायाधीश - न्या. लैला शेठ

- पहिली महिला सभापती - सुशीला नायर

- सर्वोच्च न्यायालयाच्या महिला न्यायाधीश - मिरासाहीब फातिमाबीबी (१९८९)

- पहिली महिला महापौर - अरुणा आसफअली

- पहिली महिला राष्ट्रपती - प्रतिभाताई पाटील

- पहिली महिला एअर व्हाईस मार्शल - पद्मा बंडोपाध्याय

- आय.सी.एस. पास होणारे - सुरेंद्रनाथ बॅनर्जी

- हिंदुस्थानचे उपपंतप्रधान - गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल

- स्वतंत्र हिंदुस्थानचे गव्हर्नर जनरल लॉंर्ड माउंट बॅटन

- उच्च न्यायालयाच्या महिला न्यायाधीश - न्या. लैला शेठ

- उच्च न्यायालयाचे न्यायाधीश - शंभूनाथ पंडीत
सौजन्य:- फुलोरा, सामना १३०७१३

किमयागार कमल पक्षी

डॉ. सतीश पांडे


सेंट पीटर नावाचा ख्रिश्‍चन संत पाण्याच्या पृष्ठभागावरून चालत गेला अशी एक आख्यायिका आहे. आध्यात्मिक बळाने या महात्म्यास अशी विलक्षण शक्ती प्राप्त झाली असावी असे पापभिरू लोक समजतात. हल्लीच्या जगात पाप इतके वाढले आहे की, पाण्यावर चालण्याची शक्यता जवळजवळ नाहीच असे म्हणता येईल.

पण पुण्यलोकातील एक पक्षी मात्र अशी जादू कलियुगातदेखील करून दाखवतो. हा पुण्यलोक म्हणजे अद्वितीय असा ‘कमल पक्षी’. कमळाच्या पसरट व पाण्यावर तरंगणार्‍या पातळ पानांवर लीलया चालणारा म्हणून त्याला ‘कमल पक्षी’ म्हणतात. इंग्रजीतदेखील याच अर्थाचे नाव या पक्ष्याला मिळाले आहे - ते म्हणजे ‘लिली ट्रॉटर’. जगात विविध ठिकाणी राहणारे लोक साहजिकच अशा पक्ष्याच्या विलक्षण सवयींमुळे भारावून जातात व त्या अर्थाची नावे देतात.

‘कमल पक्षी’ काही संतमहात्मा नाही. त्याने आध्यात्मिक उंची गाठली असली तरी त्याचे अनुमान आपण कसे लावणार? असो, पण कमल पक्षी एका अर्थाने पाण्यावर चालतो यामागे एक साधे शास्त्रीय कारण मात्र आहे. जेव्हा कमल पक्षी कमळाच्या नाजूक व पाण्यावर तंरगणार्‍या पानावर उभा राहतो तेव्हा त्याचे वजन त्या पानावर एका ठिकाणी पडत नाही. त्याचे कारण असे आहे की, कमल पक्ष्याच्या पायांची सगळी बोटे अतिशय लांबलचक असतात. त्याच्या चोचीपासून शेवटीच्या टोकापर्यंतची लांबी जेवढी असते त्यापेक्षा थोडी अधिक लांबी त्याच्या बोटांची असते. म्हणजेच आधीच वजनाने कमी असणारा कमल पक्षी जेव्हा उभा राहतो, तेव्हा कोणत्याही एका ठिकाणी त्याच्या एकूण वजनाचा फारच थोडासा भाग पडतो. म्हणूनच कमळाचे पान त्याच्या वजनाने बुडत नाही. कमल पक्षी पानावरून चालताना पटपट चालतो म्हणून वजनाचा सर्व भार पानावर येण्याच्या आधीच त्याने मागचा पाय पुढे टाकलेला असतो. कमल पक्षी किमयागार आहे!

साधारणपणे याच शास्त्रीय माहितीचा उपयोग करून माणूसदेखील ‘वॉटर स्की’ व ‘स्नो स्की’ हे खेळ यशस्वीपणे उपभोगतो. वरकरणी जादूचे प्रयोग वाटणारे अनेक आविष्कार शास्त्रीय सिद्धांतांवर आधारित असतात. आपला कुशल ‘कमल पक्षी’ पाण्यावरून चालण्याची किमया करतो, पण त्याला त्यामागचे शास्त्रीय कारण कळत असेल का? विचार करा...

(इला फाऊंडेशन)

सौजन्य:- फुलोरा, सामना १ ९ ० ७ १ ३

तांबड्या मंगळ

आकाशात लालबुंद दिसणारा मंगळ ग्रहाबद्दल मानवाला आदी काळापासूनच आकर्षण आहे. त्याला हा रंग त्याच्या पृष्ठभागावरील लोहयुक्त मातीमुळे प्राप्त झाला आहे. पृथ्वीसारखाच असला तरी मंगळाचा आकार पृथ्वीच्या जवळपास अर्धाच आहे. मंगळावरील वर्ष पृथ्वीच्या ६८७ दिवसांएवढे आहे. त्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखीचे पर्वत मंगळावर आढळतात. त्यावरील ऑलिंपस मॉन या सर्वात उंच पर्वताची उंची फक्त २७ किमी आहे. आपल्या माऊंट एव्हरेस्टची उंची साधारण ९ किमी आहे. ज्याप्रमाणे उंच पर्वत आहेत त्याच्याच उलट प्रचंड अशी न्न्त्ते श्ग्हीग्े म्हब्दहदरी आहे. जिची लांबी ४००० किमी आहे तर खोली अंदाजे ७ किमी आहे.


सौजन्य :- फुलोरा, सामना १ ९ ० ७ १ ३

जी जनरल के नॉलेज

हिंदुस्थानचे पहिले


- पहिले हिंदुस्थानी वैमानिक - जे. आर. डी. टाटा (१९२९)

- दक्षिण ध्रुवावर जाणारा कर्नल जे. के. बजाज (१९८९)

- पहिली हिंदुस्थानी जगत् विश्वसुंदरी रीटा फारिया (१९६०)

- पहिली हिंदुस्थानी विश्वसुंदरी सुश्मिता सेन

- पहिली नोबेल मिळविणारी महिला मदर तेरेसा

- ऑलिंपिकमध्ये पदक मिळविणारी महिला कर्नाम महेश्वरी

- हिंदुस्थानची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला

- एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारी प्रा. बचेंद्री पाल

- दुसरी व दोन वेळा एव्हरेस्ट पार केला कु. संतोष यादव

- पहिली हिंदुस्थानी महिला राजदूत सी. बी. मुथम्मा

- पहिली महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलाना

- पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू

- पहिली महिला कॅबिनेट मंत्री राजकुमारी अमृतकौर

- आमसभेच्या पहिल्या हिंदुस्थानी अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडीत

- इंग्लिश खाडी पोहून जाणारा मिहीर सेन

- इंग्लिश खाडी पोहून जाणारी आरती सहा गुप्ता.

सौजन्य:- फुलोरा, सामना १ ९ ० ७ १ ३

मुंबई होणार वायफाय

मोबाईल आणि संगणकावर कोठूनही ऍक्सेस



तांत्रिक चाचणी सुरु

तरुण पिढी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात क्रेझ असणारे ‘वायफाय’ लवकरच मुंबईकरांना मुंबईत कोठूनही आपल्या मोबाईल तसेच संगणकावर ‘ऍक्सेस’ करता येणार आहे. मुंबई शहर ‘वायफाय’ करण्याची घोषणा शिवसेनेने आपल्या वचननाम्यात केली होती. त्यादृष्टीने महापालिकेने पावले उचलली असून ‘वायफाय’साठी आवश्यक असलेली ‘वेब सुरक्षा’ तसेच हॅकिंगपासूनचे संरक्षण या तांत्रिक बाबींची तपासणी सुरू असल्याची माहिती महापौर सुनील प्रभू यांनी दिली.

इंटरनेट, मेलिंग सहज शक्य

मुंबईभर वायफाय यंत्रणा राबविण्यात आल्यास इंटरनेट तसेच ई-मेल करणे सहज शक्य होणार आहे. एरवी मोबाईल तसेच कॉम्प्युटरला इंटरनेटसाठी लावण्यात येणार्‍या डेटाकार्डला नेटवर्कच्या मर्यादा असतात, मात्र मुंबईतील नाक्यानाक्यावर वायफाय उपलब्ध झाल्यास तरुण पिढी तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचार्‍यांना कोठूनही इंटरनेट पाहणे तसेच मेल करणे शक्य होणार आहे. यासाठी फक्त आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून वायफाय सर्च करावे लागणार आहे.

‘वायफाय’ यंत्रणा मुंबईकर उभारण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात अशी यंत्रणा उभारणे अत्यावश्यक आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून निविदा मागविण्यात येणार आहे. महापालिकेची मुख्य इमारत आणि विभाग कार्यालयात लवकरच वायफाय यंत्रणा सुरू केली जाईल.

सौजन्य:- सामना १ ९  ० ७ १ ३