Sunday, December 23, 2012

श्री गणेश जन्म कथा


श्री विनायकाचा जन्म माता पार्वतीच्या शरीराच्या मळापासून झालेला असतो, अर्थात त्यात माता  पार्वतीचा पण स्वार्थ असतो की त्या पुत्राने सुद्धा फक्त तिचेच ऐकावे. असेच एक दिवस माता पार्वती स्नानाला जाण्यापूर्वी विनायकाला सांगून जाते की "कुणीही आले तरी आत सोडू नको, तू प्रवेश द्वारावर रक्षण कर." जेव्हा महादेव तिथे पोहचतात तेव्हा विनायक त्यांना सुद्धा प्रतिबंध करतो. गणांच्या सांगण्यानुसार तो पिता म्हणून त्यांना प्रणाम करतो. पण आईचा आदेश तो सर्वांपेक्षा उच्च मानत असतो, कारण वडील हे गुरूपेक्षा मोठे गुरु असले तरी आई हि त्या पेक्षा हि मोठी असते. थोडक्यात, असे कि विनायका चा जन्म हा स्वार्थीपण ह्या संकुचित भावनेतून झालेला असल्यामुळे त्याची विचार क्षमता पण संकुचित असते व त्यामुळे तो अहंकारी पण झालेला असतो. तर पुढे असे की, विनायक कुणालाच जुमानत नाही व तो गणापासून, ऋषी व देवतांचा अपमान करतो. जेव्हा विनायक (तो क्षण म्हणजे एका पित्याच्या मनावर झालेला आघात असतो) महादेवांवर हल्ला करतो तेव्हा मात्र,

महादेव त्याला शिक्षा देतात व शिरच्छेद करतात.


तेव्हा माता पार्वती श्रुष्टी नाश करण्यासाठी निघते. ती काहीही ऐकण्यास तयार नसते. मग महादेव गणांना आदेश देतात कि, " जो कोणी पहिला प्राणी दिसेल व जो स्वेच्छेने आपले शीर देईल, त्याचे शीर सूर्यास्तापूर्वी विनायकाला आणून लावावे." अश्या प्रकारे त्यांना एका हत्तीचे शीर मिळते. यात अशी कथा आहे कि त्या गजराजाने वरदान असे मागितलेले असते कि, मला सदैव महादेवाचे सानिध्य मिळेल व मी श्रुष्टी मधील सर्वात बुद्धिमान प्राणी होईन.



मग  महादेवांच्या आशिर्वादाने गजमुख श्री गणेशाचा जन्म होतो. नंतर पार्वती माता  तिच्या चुकीच्या शिकवणीची  महादेवांकडे क्षमा मागते. अश्या प्रकारे बुद्धिमान विनायकाचा जन्म होतो.


तात्पर्य :- चुकीच्या शिकवणी मुळे समाजाच पण  हानी होत असते. व जिथे श्रुष्टी ची हानी होईल तिथे नियती पण क्षमा नाही करत.  

No comments: