श्री. क्षेत्र खंडेराय
दि. १४-११-२०१२ या दिवशी आम्ही श्री. क्षेत्र खंडेराय इथे भेट दिली होती. बदलापूर पश्चिम इथून एस. टी. बस ची सुविधा उपलब्ध आहे. मुळगाव ला जाणारी कोणतीही बस पकडू शकता. बस मधून उतरल्यावर रस्ता गावातून डोंगराच्या पायथ्याशी घेऊन जातो. तिथून मग पायऱ्या सुरु होतात त्या तुम्हाला मंदिराकडे घेऊन जातात. पायर्या जवळ जवळ दोनशे आहेत, पण तसे बघितले तर एक पायरी दोन पायर्यांच्या अंतरेवढी आहे. वरून मंदिराच्या परिसरातून बारावी धारण, कानोर गाव व सोनार गावाचे दर्शन घडते.
No comments:
Post a Comment