Sunday, December 30, 2012

महिलांसाठी ‘युवा सेने’ची हेल्पलाइन



जगातली प्रसिद्ध तलाव


बायकल तलाव

तलाव ठिकाण खोली आकारमान


(फुट) (किमी)

बायकल तलाव सायबेरीया ५३१५ ३१४९४

लॉंग नीघ आर्यलँड - ३८१.६४

कॅस्पीयन सी आशिया ३३६३ ७८२००

टांगान्यिका टांझानिया १४७१ ३२८९३

सुपिरीअर अमेरीका २९०३ १२१००

लॉच लोमंड स्कॉटलंड - ७१.१२

व्हिक्टोरीया केनिया - ६९४८५

लॉच नेस इंग्लंड ७५५ २१.८७

ग्रेट स्लेव कॅनडा २०१५   सौजन्य :- फुलोरा, सामना २९१२१२

Tuesday, December 25, 2012

इंटरनेट सेफ्टी

इंटरनेट वापरताना अचानक मधेच एखाद्या जाहिरातीचा किंवा एखाद्या चांगल्या ऑफरचा पॉप अप आपल्यासमोर प्रकट होतो व आपण काहीएक विचार न करता थेट अशा पॉप अपवर क्लिक करतो व त्यानंतर त्यांच्या जाहिरातवजा संकेतस्थळावर आपल्या माहितीची नोंद करून जाहिरातदाराच्या फोन किंवा ईमेलची वाट बघत बसतो. परंतु सावधान! इंटरनेटवरील अशा पॉप अपरूपी प्रकटणार्‍या जाहिरातींना ऍडवेयर असे म्हणतात व अशा बहुतांशी जाहिरातींचा उद्देश हा तुमची ‘आयडेंटिटी थेफ्ट’ अर्थात तुमच्या वैयक्तिक माहितीची चोरी करणे असा असतो.
- आयडेंटिटी थेफ्ट- मोबाईल क्रमांक, ई-मेल ऍड्रेस, बँक अकाऊंट नंबर किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक ही आपली गोपनीय माहिती असते. सराईत हॅकर्स ऍडवेयरचा वापर करून सहजपणे या माहितीची चोरी करू शकतात. यालाच ‘आयडेंटिटी थेफ्ट’ असे म्हणतात. माहितीचा दुरुपयोग टाळण्यासाठी नेटवरील ‘ऍडवेयर’वर आपली वैयक्तिक माहिती शेयर करण्याचे टाळावे. चांगली वेबसाईट किंवा खात्रीवजा प्रॉडक्ट असेल तर त्या कंपनीच्या ग्राहक सेवा विभागाला फोन करून जाहिरातीची खातरजमा करून अशा संकेतस्थळावर नोंदणी करावी.
- मॅन इन द मिडल - ऍडवेयरचा वापर करून सराईतपणे तुमचा ई-मेल,ऑनलाईन बँक अकाऊंट, कोणत्याही ऑनलाईन सेवेमध्ये तुम्हाला माहीत नसताना बेमालूमपणे हॅक करण्याचा हा नवीन प्रकार आहे. मॅन इन द मिडल म्हणजे जेव्हा तुम्ही अशा कोणत्याही ऍडवेयरवर क्लिक करता तेव्हा संगणकातील इंटरनेट ब्राऊसरमधील सर्व माहिती ‘ऍडवेयरवरील’ संगणकावर नोंद होते व इंटरनेट ब्राऊसरमधील ‘कुकीज’चा वापर करून हॅकर्स थेट ऑनलाईन सेवेचा ताबा घेतात.
- स्पायवेयर/मालवेयर - इंटरनेट वापरताना आपल्यासमोर ‘मोस्ट गुड स्क्रीनसेव्हर्स’ किंवा ‘अमेझिंग वॉलपेपर्स’सारख्या सुंदर चित्रे असणार्‍या जाहिराती झळकतात व आपण चांगले स्क्रीनसेव्हर्स किंवा वॉलपेपर्स डाऊनलोड करण्यासाठी त्यावर क्लिक करतो. ते् इन्स्टॉल झाले की आपल्या संगणकात ते एक ठरावीक प्रोग्राम इन्स्टॉल करतात. हा प्रोग्राम दर ठरावीक वेळेला आपल्या संगणकात होत असलेल्या सर्व नोंदी ‘ऍडवेयरच्या’ मुख्य संगणकापर्यंत इंटरनेटवरून पाठवत राहतो. मग या माहितीचा दुरुपयोग केला जातो. त्यामुळे इंटरनेटवर जाहिरातीमधून आलेल्या स्क्रीनसेव्हर वॉल पेपर्सपासून दोन हात दूरच राहणे केव्हाही चांगले.
ऍडवेयरपासून बचाव- ऍडवेयरपासून बचाव करण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे तुमच्या इंटरनेट एक्स्प्लोररमधील ‘पॉप अप ब्लॉकर’चा वापर करणे. त्यासाठी इंटरनेट एक्स्प्लोरर - प्रॉपर्टीज - प्रायव्हसी - टर्न ऑन पॉप अप ब्लॉकरवरील टीक काढून टाकणे. यामुळे तुमच्या संगणकातून कोणत्याही संकेतस्थळावरील पॉप अप कायमच्या बंद होतील. जर तुम्हाला काही विशिष्ट संकेतस्थळावरील पॉप अप बघायच्या असतील तर याच ऑप्शनमधील ‘अलाऊ वेबसाईट’चा वापर करून त्या संकेतस्थळावरील पॉप अप बघू शकता.
- कुठल्याही संकेतस्थळावरील ‘पॉप अप’वर आपल्या वैयक्तिक माहितीची नोंद करू नये.
- इंटरनेट एक्स्प्लोररमधील स्मार्ट स्क्रीन फिल्टर व क्रॉस साईट स्क्रिप्टिंग फिल्टरचा वेळोवेळी वापर करीत रहा.
- इंटरनेट एक्स्प्लोरर तसेच विंडोज संगणकप्रणालीचे लेटेस्ट पॅचेस वेळोवेळी अपडेट करीत रहा.

सौजन्य :- फुलोरा, सामना २२१२१२

Sunday, December 23, 2012

श्री गणेश जन्म कथा


श्री विनायकाचा जन्म माता पार्वतीच्या शरीराच्या मळापासून झालेला असतो, अर्थात त्यात माता  पार्वतीचा पण स्वार्थ असतो की त्या पुत्राने सुद्धा फक्त तिचेच ऐकावे. असेच एक दिवस माता पार्वती स्नानाला जाण्यापूर्वी विनायकाला सांगून जाते की "कुणीही आले तरी आत सोडू नको, तू प्रवेश द्वारावर रक्षण कर." जेव्हा महादेव तिथे पोहचतात तेव्हा विनायक त्यांना सुद्धा प्रतिबंध करतो. गणांच्या सांगण्यानुसार तो पिता म्हणून त्यांना प्रणाम करतो. पण आईचा आदेश तो सर्वांपेक्षा उच्च मानत असतो, कारण वडील हे गुरूपेक्षा मोठे गुरु असले तरी आई हि त्या पेक्षा हि मोठी असते. थोडक्यात, असे कि विनायका चा जन्म हा स्वार्थीपण ह्या संकुचित भावनेतून झालेला असल्यामुळे त्याची विचार क्षमता पण संकुचित असते व त्यामुळे तो अहंकारी पण झालेला असतो. तर पुढे असे की, विनायक कुणालाच जुमानत नाही व तो गणापासून, ऋषी व देवतांचा अपमान करतो. जेव्हा विनायक (तो क्षण म्हणजे एका पित्याच्या मनावर झालेला आघात असतो) महादेवांवर हल्ला करतो तेव्हा मात्र,

महादेव त्याला शिक्षा देतात व शिरच्छेद करतात.


तेव्हा माता पार्वती श्रुष्टी नाश करण्यासाठी निघते. ती काहीही ऐकण्यास तयार नसते. मग महादेव गणांना आदेश देतात कि, " जो कोणी पहिला प्राणी दिसेल व जो स्वेच्छेने आपले शीर देईल, त्याचे शीर सूर्यास्तापूर्वी विनायकाला आणून लावावे." अश्या प्रकारे त्यांना एका हत्तीचे शीर मिळते. यात अशी कथा आहे कि त्या गजराजाने वरदान असे मागितलेले असते कि, मला सदैव महादेवाचे सानिध्य मिळेल व मी श्रुष्टी मधील सर्वात बुद्धिमान प्राणी होईन.



मग  महादेवांच्या आशिर्वादाने गजमुख श्री गणेशाचा जन्म होतो. नंतर पार्वती माता  तिच्या चुकीच्या शिकवणीची  महादेवांकडे क्षमा मागते. अश्या प्रकारे बुद्धिमान विनायकाचा जन्म होतो.


तात्पर्य :- चुकीच्या शिकवणी मुळे समाजाच पण  हानी होत असते. व जिथे श्रुष्टी ची हानी होईल तिथे नियती पण क्षमा नाही करत.  

कुश लव रामायण गाती

श्रीरामचंद्राच्या अश्वमेध यज्ञासाठी अयोध्येंत माणसांचा महासागर जमला होता. तापस वेष धारण केलेले दोन बटु मंडपांत आले. ते म्हणाले “आम्ही महर्षि वाल्मीकींचे शिष्य आहोंत. आम्ही रामचरित्रगायन करतो.” श्रीरामांना माहीत नव्हतें की आपल्यासमोर आपल्या चरित्राचें गायन करणारे हे बटु आपलेच पुत्र आहेत.

स्वयें श्रीरामप्रभू ऐकती
कुश लव रामायण गाती
कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतिनें तेजाची आरती
राजस मुद्रा, वेष मुनींचे
गंधर्वच ते तपोवनींचे
वाल्मीकींच्या भाव मनींचे
मानवी रूपें आकारती
ते प्रतिभेच्या आम्रवनांतील
वसंत-वैभव-गाते कोकिल
बालस्वरांनी करुनी किलबिल
गायनें ऋतुराज भारिती
फुलांपरी ते ओठ उमलती
सुगंधसे स्वर भुवनीं झुलती
कर्णभुषणें कुंडल डुलती
संगती वीणा झंकारिती
सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी
यज्ञ-मंडपीं आल्या उतरुनी
संगमी श्रोतेजन नाहती

Wednesday, December 19, 2012

चतुर व्हा

शरीर सुंदर सतेज । वस्त्रे भूषणें केलें सज्ज ॥
अंतरी नसता चातुर्य-बीज । कदापी शोभा न पावे ॥

- समर्थ रामदास

सध्याच्या जगाला लाडीलबाडी व प्रत्येक क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा , या दोन गोष्टींनी ग्रासलं आहे . भारताचे भावी आधारस्तंभ असलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो, आपल्या अंगचा सज्जनपणा न सोड्ता, जर या परिस्थितीवर मात करुन तुम्हाला आपली ध्येये साध्य करायची असतील तर, अंगी चातुर्य बाणविण्याची आत्यंनतीक गरज आहे.
परंतु 'चातुर्य' म्हणजे काय , हे ठाऊक आहे ? चातुर्य म्हणजे शहाणपणा, धोरणीपणा , मुत्सद्दीपणा, हजरजबाबी वृत्ती, धुर्तपणा, दूरदर्शीपणा, प्रसंगावधानता वगैरे गुणांच माणसाच्या डोक्यात तयार झालेलं एकजीव असं रसायन.
माणूस केवळ विद्वान असल्याने त्याचा या जगात निभाव लागत नाही. अंगी चातुर्य नसलेला विद्वान एखाद्या प्रसंगात सापडला, तर आपण या प्रसंगात का सापडलो, याची मुद्देसुद मीमांसा ही इतरांपुढे करीत बसतो, परंतु अंगी चातुर्य असलेला माणूस असे विवरण करीत न बसता, आल्या प्रसंगावर मात करतो आणि आपली यशाची वाटचाल आक्रमू लागतो; थोडक्यात सांगायचं तर, विद्वत्ता ही नुसती बोलघेवडी असते, तर चातुर्य हे कृतिशील म्हणजे प्रत्यक्ष कृती करुन दाखविणारे असते. म्हणून जोश बिलिंग्ज नावाचा पाश्चात्य विचारवंत म्हणतो,

भावार्थ - विद्वत्ता ही ग्रंथालयांतून झोपा काढत व घोरत असते, तर चातुर्य हे संभाव्य प्रसंगाला तोंड देण्यासाठी अगदी जागरुकतेनं एका पायावर उभे असते.

अंगी चातुर्य नसलेली माणसं भोवताली कितीही असली, तरी एकटा चतुर माणूस त्या सर्वांवर मात करु शकतो. आगऱ्यास औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या शिवप्रभुंनी फ़ुलादखानाच्या पहाऱ्यातून आपल्या पुत्रासह पलायन केले, ते चातुर्याच्या जोरावरच ना ? म्हणून समर्थ म्हणतात..
उदंड बाजार मिळाले । परी ते धूर्तचि आळिले ।।
धूर्तापासी काही न चाले । बाजाऱ्यांचे ।।

भावार्थ - बाजारबुणगे जरी संख्येनं बरेच असले, तरी धूर्त म्हणजे चतूर माणूस त्यांना ताब्यात ठेवतो. धूर्तापुढे त्या अलबत्या गलबत्त्यांचे काहीएक चालत नाही.

 
 सौजन्य:- http://www.marathimati.com   

Thursday, December 06, 2012

श्री. क्षेत्र खंडेराय

दि. १४-११-२०१२ या दिवशी आम्ही श्री. क्षेत्र खंडेराय इथे भेट दिली होती. बदलापूर पश्चिम इथून एस. टी. बस ची सुविधा उपलब्ध आहे. मुळगाव ला जाणारी कोणतीही बस पकडू शकता. बस मधून उतरल्यावर रस्ता गावातून डोंगराच्या पायथ्याशी घेऊन जातो. तिथून मग पायऱ्या सुरु होतात त्या तुम्हाला मंदिराकडे घेऊन जातात. पायर्या जवळ जवळ दोनशे आहेत, पण तसे बघितले तर एक पायरी दोन पायर्यांच्या अंतरेवढी आहे.    वरून मंदिराच्या परिसरातून बारावी धारण, कानोर गाव व सोनार गावाचे दर्शन घडते.