जगभरातील लोकांच्या तोंडी व्वा... असे शब्द उमटविणारी एक हायटेक नौका चीनने तयार केली असून तिची खासियत म्हणजे ती चक्क ‘आयपॅड’वर चालविता येणार आहे.
या हायटेक नौकेचे नाव ‘अदेस्त्रा’ असे ठेवण्यात आले असून तिची खरेदी हॉंगकॉंगच्या एंटो आणि एलेन मार्डन यांनी केली आहे. ही अत्याधुनिक नौका तयार करण्यास चीनला पाच वर्षे लागली. जॉन शटल यांनी या नौकेचे ‘डिझाइन’ केले आहे. ‘बोट इंटरनॅशनल’ या मासिकाने नौकेविषयी माहिती देताना सांगितले की, भविष्यात समुद्रातील लांब अंतर पार करण्यासाठी या नौकेचा विशेष फायदा होणार आहे. यात ‘इंटिग्रेटेड शिप मॉनिटरिंग सिस्टम’ बसविण्यात आली असून यातील विशेष बाब म्हणजे ५० मीटरच्या रेंजमध्ये ऍपलच्या आयपॅडने या नौकेला नियंत्रित करता येणार आहे. यात ९ लोकांबरोबरच पाच ते सहा क्रु-मेंबरच्या बसण्याचीही सोय करण्यात आली आहे.
नौकेची खासियत :
- २२.५ पेक्षा अधिक वेग
- प्रति तास ९० लिटर इंधन लागणार
- नऊ लोकांच्या बसण्याची सोय
- कैटरपिलर सी-१८-११५० हॉर्सपॉवर इंजिन
- मेन डेकमध्ये सलून, लॉंज, डायनिंग टेबल
- नेविगेशन सिस्टम
- रीअर डेकमध्ये सोफा आणि बार
सौजन्य:- सामना १८०४२०१२
No comments:
Post a Comment