Sunday, April 22, 2012

पॉप अप्सची डोकेदुखी

इंटरनेटवर काम करताना सर्वात तापदायी ठरतं ते मध्ये मध्ये येणारे पॉप अप्स. हे पॉप अप्स म्हणजे ऑनलाईन जाहिरातीची डोकेदुखी. जाहिरातीचा हा प्रकार अगदी अनोखा असला तरी टेक्नोसॅव्हीज्ला तो त्रासदायक ठरतो. काय असतात हे पॉप अप्स? जाणून घेऊया आजच्या टेकअड्डामध्ये.


कोणत्याही वेबसाइटवरून काम करताना त्या युजरचा इमेल आयडी कॅप्चर करण्यासाठी हे पॉप अप्स असतात. जेणेकरून त्या युजरपर्यंत आपलं प्रोडक्ट पोहचू शकेल हा त्यामागचा उद्देश असतो. पॉप अप्स येण्याला कोणत्याही मर्यादा नसतात. त्यामुळे दिवसभरातून कितीही युजर्सला हे पॉप अप्स कॅप्चर करतात.

- पॉप अप्स शक्यतो फ्री म्युझिकल साइट्स, सोशल नेटवर्कींग साइट्स, फोटो सर्च करताना येतात.

- या पॉप अप्सवर क्लिक केल्यास काही साइट्सद्वारे व्हायरसेस येण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पॉप अप्स क्लोज केलेलेच बरे.

- काम करताना पॉप अप्सची वेगळी विंडो ओपन होते. त्यातील कोणतेही ऑप्शन ट्राय न करता ती विंडो बंद करावी. व्हायरस येण्याचा जास्त धोका पॉर्न साइट्सला असतो.

- पॉप अप्स एखाद्या प्रोडक्टसच्या स्किम्स जाणून माहिती घेण्यासाठी योग्य असतात. पण शक्यतो ती माहिती त्या प्रोडक्टच्या अधिकृत साइटवरून घेणंच योग्य.

- आपल्याला नको असलेले पॉप अप्स आपण त्यावर असलेल्या ऑप्शन मधून ब्लॉक करू शकतो. ब्लॉक केलेल्या जाहिरातींचे अपडेट्स कधीही पुन्हा येत नाहीत.

- पॉप अप्सला आळा घालण्यासाठी मॅकफी चे सॉफ्टवेअर कम्प्युटरमध्ये असणं गरजेचं आहे.
(किंवा इतर कोणतेही चांगले सॉफ्टवेअर चालू शकेल)

सौजन्य:- फुलोरा, सामना २१०४२०१२

कॉर्पोरेट मंत्र - थँक्स डियर

चांगले झाले की आपल्यामुळे आणि वाईट झाले की दुसर्‍यामुळे हे सर्वांनाच वाटते. दुसर्‍याकडे बोट दाखविणे सोपे असते. स्वत: आपल्या जीवनाची जबाबदारी झेलणे कठीण. एक मुलगी होती. अनाथआश्रमात लहानपण घालवून तिने स्वत:ला उभे केले. समोर येईल तो दिवस हसत घालविण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ती रडत बसली. शिक्षण पूर्ण केले. नाव कमावले. लोकांना ती आवडू लागली. स्वत:साठी तिने समाजात एक स्थान निर्माण केले. पुढे तिच्या मनात कुठेतरी अन्यायाची भावना दरवळत होती. तिला सतत वाटत होते की, आपल्या आई-वडिलांनी, समाजाने, देवाने अन्याय केला आहे. याच दु:खात ती सतत जळत. एकेदिवशी तिला तिची एक जुनी मैत्रीण भेटली. श्रीमंत आई-वडिलांची ही पोरगी शिकली नाही व काहीच करत नव्हती. तिची ही अवस्था आश्‍चर्यजनक होती. सगळं काही हाताशी मिळाल्यामुळे आपली मैत्रीण वाया गेली हे तिच्या लक्षात आले. आपण स्वत:च्या पायावर उभे असल्याचा तिला अभिमान वाटला. प्रत्येक मोठा झालेला माणूस फार मोठ्या अन्यायाचा मालक असतो. तुम्ही नीट विचार करा. जगात झालेले सर्व चांगले बदल, क्रांती व मोठी माणसं ही अन्यायातून जन्माला आली. आपल्यावर अन्याय होत आहे. या विचाराने दबून जाऊ नका. उलट आपण यशाच्या महामार्गावर आहोत हे समजून जा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गांधीजी, सावरकर, टिळक, जीजस यांच्या आयुष्यात अन्याय नसता तर ते कुणीच झाले नसते. कॉर्पोरेट जगतात रोज अन्यायाचा पाऊस पडतो. कधी बॉसकडून, कधी सहकार्‍यांकडून, कधी कधी घरचेही अन्याय करण्यात कसर ठेवत नाहीत. अशावेळी निराश होऊ नका. त्यातून तुम्ही काय शिकू शकता ते पाहा. एकाने सुंदर लिहिले आहे :


‘‘तूमने सुली पे लटकते जीसे देखा होगा

वक्त आएगा वही शक्स मसीहा होगा।’’

तुमच्यावर अन्याय करणार्‍यांचे मन:पूर्वक आभार माना. तुम्हाला मोठं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असेल. अन्याय करू नका, पण तुमच्यावर कुणी केला तर म्हणा थँक्स डियर!!

सौजन्य:- सामना २२०४२०१२

Thursday, April 19, 2012

‘आयपॅड’वर चालणार हायटेक चिनी नौका


जगभरातील लोकांच्या तोंडी व्वा... असे शब्द उमटविणारी एक हायटेक नौका चीनने तयार केली असून तिची खासियत म्हणजे ती चक्क ‘आयपॅड’वर चालविता येणार आहे.


या हायटेक नौकेचे नाव ‘अदेस्त्रा’ असे ठेवण्यात आले असून तिची खरेदी हॉंगकॉंगच्या एंटो आणि एलेन मार्डन यांनी केली आहे. ही अत्याधुनिक नौका तयार करण्यास चीनला पाच वर्षे लागली. जॉन शटल यांनी या नौकेचे ‘डिझाइन’ केले आहे. ‘बोट इंटरनॅशनल’ या मासिकाने नौकेविषयी माहिती देताना सांगितले की, भविष्यात समुद्रातील लांब अंतर पार करण्यासाठी या नौकेचा विशेष फायदा होणार आहे. यात ‘इंटिग्रेटेड शिप मॉनिटरिंग सिस्टम’ बसविण्यात आली असून यातील विशेष बाब म्हणजे ५० मीटरच्या रेंजमध्ये ऍपलच्या आयपॅडने या नौकेला नियंत्रित करता येणार आहे. यात ९ लोकांबरोबरच पाच ते सहा क्रु-मेंबरच्या बसण्याचीही सोय करण्यात आली आहे.



नौकेची खासियत :


- २२.५ पेक्षा अधिक वेग

- प्रति तास ९० लिटर इंधन लागणार

- नऊ लोकांच्या बसण्याची सोय

- कैटरपिलर सी-१८-११५० हॉर्सपॉवर इंजिन

- मेन डेकमध्ये सलून, लॉंज, डायनिंग टेबल

- नेविगेशन सिस्टम

- रीअर डेकमध्ये सोफा आणि बार

सौजन्य:- सामना १८०४२०१२

प्रिंटर घेताय?

नवीन लेजर प्रिंटर खरेदी करण्याच्या विचारात आहात तर खाली दिलेल्या गोष्टी विचारात घेणे महत्त्वाचे आहे.


जर प्रिंटर जरी आज आपल्याला महाग वाटत असले तरी ते दिसता क्षणी तुम्ही त्याच्याकडे आकर्षित व्हाल. इंकजेट प्रिंटर किंमतीवरून जरी परवडण्यासारखे असले तरी लेजर प्रिंटरच्या प्रिंटची क्वालिटी, स्पीड आदी त्याच्यापेक्षा किती तरी पटीने चांगली आहे.

- सगळ्यात आधी हे निश्चित करा की, तुम्हाला कुठल्या प्रकारचे डॉक्युमेन्ट जास्त करून प्रिंट करावे लागतात. जसे की, ग्राफिक्स, टेक्स्ट किंवा वेगवेगळ्या पेपरवर प्रिंटिंग.

- प्रिंटरमध्ये कोणते फीचर्स पाहिजेत, त्यांची एक यादी बनवा. तुमच्या जागेत बसू शकेल का, याचा आधी विचार करणे आवश्यक आहे.

- वेगवेगळ्या प्रिंटरच्या प्रिंट क्वालिटी पाहूनच निश्चित करा की कुठल्या प्रिंटरची क्वालिटी सुबक आहे.

- जर तुम्ही लिफाफा, लेबल आदींवर प्रिंटिंग करण्यासाठी प्रिंटर खरेदी करत आहात तर हे लक्षात ठेवा की, पेपर पाथ (ज्या ठिकाणाहून पेपर प्रिंटिंगसाठी जातो) ९० डिग्रीपेक्षा जास्त रुंद नको.

प्रिंटरचे सध्या ३ भाग प्रचलित आहेत.

डॉट मेट्रिक्स प्रिंटर

डॉट मेट्रिक्स प्रिंटर हे कमी खर्चाचे असतात. पण प्रिंटिंगच्या वेळी खूप मोठा आवाज करत प्रिंटिंग करतात.

इंक जेट प्रिंटर

नोझल्सच्या मदतीने योग्य प्रमाणात चार प्राथमिक रंग मिसळून रंगीत प्रिंट काढता येते .

लेझर प्रिंटर

हे प्रिंटर छापाईसाठी लेझर किरणांचा वापर करतात. सध्या ऑल इन वन प्रिंटरला जास्त मागणी आहे. झेरॉक्स, स्कॅनर, प्रिंटर, फॅक्स अशा सर्व गोष्टी यात मिळतात.

सौ. - फुलोरा, सामना 14042012

Saturday, April 14, 2012

सुपरफास्ट आयपॅड

सध्या आयपॅडचा बोलबाला आहे. याला स्पर्धात्मक आकाश, टॅबलेट अशी टेक्नॉलॉजी आली असली तरीही आयपॅडची क्रेज कायम आहे. आज जाणून घेऊया आयपॅड विषयीची अधिक माहिती.


- आयपॅड हा वजनाने सर्वात हलका आणि स्लिम मोबाईल आहे.

- आयपॅडच्या टेक्नॉलॉजीत ड्युअल कोर A-5 ही चीप वापरतात यामुळे इंटरनेट स्पीड अगदी फास्ट मिळतो.

- आयपॅडमध्ये सुपरफास्ट ग्राफीक कार्ड असल्याने गेमिंग साईट्स डाऊनलोडींग आणि आयपॅडवर गेम ऍप्लिकेशन फास्ट होते.

- आयपॅडचं महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये फोटे लायब्ररी, व्हिडीओ एडीटींग आणि आय मुव्हीज् अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे दिसतं.

- आयपॅडची बॅटरी लाइफ सुमारे १० तासांची असते.

- आयपॅडमध्ये दोन कॅमेरे असतात. यामध्ये समोर असलेला फेस रिडर कॅमेरा आणि बॅक रिडर कॅमेरा हाय डेफिनिशन आहे.

- आयपॅडमध्ये एलईडी बॅकलाईट डिस्प्ले आहे. यामुळे फोटो, फिल्मस आणि वेबपेज हायडिफाईन दिसते.

- आयपॅड हा पोर्ट्रेट आणि लँडस्केप अशा दोन्ही स्क्रीनमध्ये उपलब्ध होते.

- ही मल्टीटच सिस्टम असल्याने टचस्क्रिन आणि किपॅड दोन्हीही प्रकारात उपलब्ध आहे.

- आयपॅडमध्ये OS4 हे ऍप्लीकेशन वापरण्यात येत असल्याने हा अधिक जलदरित्या ऑपरेट होतो.

सौजन्य:- saamana.phulora@gmail.com

‘रोबो’ने केली मिठी मोकळी झटपट... यांत्रिक सफाईने सार्‍यांनाच थक्क केले



शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नालेसफाई करणार्‍या रोबोचे प्रात्यक्षिक गुरुवारी पाहिले. सोबत महापौर सुनील प्रभू आणि स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे.


मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) - संपूर्ण मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहचविणार्‍या रोबोने आज मिठी नदीची सफाईदारपणे सफाई केली. कोणत्याही दिशेला फिरत नदीतील कानाकोपर्‍यातील गाळ चुटकीसरशी उचलण्याचे प्रात्यक्षिक रोबोने दाखविल्याने सर्वच जण थक्क झाले. ३० कर्मचार्‍यांचे बळ असलेल्या रोबोने अवघ्या एका कर्मचार्‍याच्या मदतीने मिठी नदीतील गाळ उपसून काढला.

एल ऍण्ड टी, पवई पाइपलाइन, पवई यार्ड येथे आज शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या अत्याधुनिक रोबो मशीनचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मिठी नदीतील गाळ काढण्याचे प्रात्यक्षिक रोबोद्वारे दाखविण्यात आले. यावेळी महापौर सुनील प्रभू, शिवसेना विभागप्रमुख ऍड. अनिल परब, सुधीर मोरे, पालिका सभागृहनेते यशोधर फणसे, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, उपविभागप्रमुख सुधाकर पेडणेकर, शाखाप्रमुख अरविंद शिंदे, नगरसेविका अश्‍विनी मते आणि अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता उपस्थित होते. रोबो नदीत उतरल्याबरोबर रोबो ऑपरेट करणार्‍या कर्मचार्‍याने वेगवेगळी बटणे दाबत संपूर्ण नदीत रोबोला फिरवत गाळ उचलायला सुरुवात केली. रोबोच्या दोन्ही बाजूंना असलेल्या बकेटमध्ये कचरा जमा करून टेलिस्कोपिक बुम लांबपर्यंत नेऊन गाळ नदीबाहेर फेकण्यात आला. रोबोचे बुम, अंडर कॅरेज, लेग व व्हील्स हवे तिकडे वळविता येत असल्याने मिठी नदीतील गाळ सपासप बाहेर फेकला जात होता.

रोबो कुठे गाळ काढणार

या रोबोद्वारे पवई मिठी नदीतील धारावी-दादर नाला, ऍन्टॉप हिल येथील खास क्रीक नाला, टेक्स्टाइल नाला आणि जे. के. केमिकल्स नाल्यासह ज्या नाल्यांच्या सफाईचे काम कंत्राटदारांकडे नाही त्या नाल्यातील गाळ काढण्यात येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात किमान १० ते १२ नाल्यांची रोबोच्या सहाय्याने सफाई करण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

- यंदा नालेसफाईसाठी ७५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. ह गेल्या वर्षी ३ लाख ९८ हजार मेट्रिक टन गाळ काढण्यात आला. यंदा साडेचार लाख क्युबिक गाळ काढण्यात येणार आहे. ह पावसाळ्यापूर्वी ७० टक्के, पावसाळ्यात २० आणि पावसाळ्यानंतर १० टक्के नालेसफाई करण्यात येणार. ह नाल्यात रोबो उतरविणे, बाहेर काढणे सोयिस्कर आणि कमी खर्चाचे. त्यासाठी क्रेन येण्याची गरज नाही. ह रोबो नाल्यात नेण्यासाठी पाथवे, रॅम तयार करण्याची गरज नाही.

भ्रष्टाचारात महाराष्ट्र अव्वल!

राज्य सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही, अशी प्रतिक्रिया मिलिंद देवरा यांनी व्यक्त केली आहे. त्यावर प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारता महाराष्ट्रात कुणाचे सरकार आहे? २६ जुलैचा हल्ला याच देवरांच्या मतदारसंघात झाला होता. त्यानंतर या खासदाराने काय केले, असा सवाल करतानाच केवळ मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला आणि मुख्यमंत्री बदलले गेले. या पलीकडे काहीच झाले नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. सरकार प्रत्येक पातळीवर अपयशी ठरले आहे. कारभारात हे सरकार संवेदनशून्य झाले असून घोटाळ्यात हे सरकार अव्वल नंबरवर असल्याची टीकाही त्यांनी केली. घोटाळ्यांमध्ये हे सरकार महाराष्ट्रात नंबर एक झाले की काय? असे दुर्दैवाने म्हणावे लागते, असे सांगतानाच ‘कॅग’च्या अहवालावर काही कारवाई करणार की नाही, असा खरमरीत सवालही त्यांनी केला.

...तर आणखी रोबो घेऊ

नदी आणि नाल्यांवर असलेल्या पुलांमुळे जिथे एखादी मशीन वा कामगार गाळ काढण्यासाठी पोहोचू शकत नाही. तिथे हा रोबो पोहोचून गाळ काढणार आहे. आज झालेल्या रोबोच्या प्रात्यक्षिकामुळे मी समाधानी आहे असे सांगून गरज पडल्यास आणखी रोबो मशीन घेतल्या जातील असे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुंबईकरांच्या सेवेसाठी आम्ही बांधिल आहोत असे सांगतानाच आधुनिक तंत्रज्ञान घेणारे मुंबई हे पहिलेच शहर ठरले आहे, असेही त्यांनी सांगितले.

आठ तासांत २४० घनमीटर गाळ

प्रचंड क्षमतेच्या या रोबोद्वारे आठ तासांत २४० घनमीटर गाळ काढता येणार आहे. या रोबोचा आठ तासांचा दर २४,१४५ रुपये आहे. मात्र एका महिन्याचे काम एका दिवसात करण्याची रोबोची क्षमता असल्याने पालिकेच्या महिनाभराच्या व इतर खर्चात बचतच होणार आहे.

सौ. सामना १४०४२०१२