ट्री हाऊस 🏨हि एक मोठा ब्रँड असलेली इंग्लिश नर्सरी शाळा आहे. ह्या शाळेच्या व्यवस्थापनाने पूर्ण भारतातील जवळ जवळ ११३ शाखा अचानक काल पासून बंद केल्या, कोणतीही आगाऊ सूचना न देता. आता बघा हि कंपनी शेयर मार्केट मध्ये लिस्टेड आहे. म्हणजे हि पब्लिक कंपनी आहे. आणि एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी शेयर धारकांची मंजुरी घेऊन तशी सूचना कंपनी रजिस्ट्रार म्हणजेच ROC ला पण द्यायची असते. ऑक्टोबर २०१४ मध्ये रु ५००/- बाजार भाव असलेला शेयर आज रु ३०/- वर आहे. म्हणजे शेयर खरेदी केलेल्यांचे पैसे पण बुडाले.
असो. ट्री हाऊस कंपनीने कॅश शॉर्टेज चे कारण पुढे करत एवढ्या शाखा बंद केल्या. मग कॅश गेली कुठे ? हा एक घोटाळा देखील असू शकतो. आणि आपले ऑडिटर मात्र ट्रू आणि फेअर मत नावाखाली बॅलन्स शीट सर्टिफाय करतात. ह्या वरून ठळकपणे एक गोष्ट अधोरेखित होते कि, इंग्लिश शाळा ह्या फक्त कमाई करण्याच्या दृष्टीनेच उघडलेल्या असतात. त्यांना देशाच्या पुढच्या पिढी बद्दल काही काळजी तर सोडा, जबाबदारी सुद्धा वाटत नाही. तरी पण पालक हजारो रुपये डोनेशन व लाखो रुपये फी कॅश मधेच ह्या शाळांना देत असतात. वृत्तपत्रातील बातमी नुसार तर काही पालकांनी ऍडव्हान्स फी पण भरली आहे. आणि अश्या शाळां ची निवड करणारे पालक हे मोठं मोठ्या हुद्द्यावर जसे एक्जकूंटिव्ह, मॅनेजर, डायरेक्टर ह्या पदांवर असून देखील कुणीही चेक पेयमेन्ट करताना दिसत नाही.
जर समजा आता ह्या शाळेचे डोनेशन व फी (पुस्तक खरेदी नाही) हि जर १००% पालक १००% चेक द्वारे भरणा करत असते तर ह्या शाळेची अशी हिम्मत झाली नसती.
आम्ही तर स्वतःला बंधन च घालून घेतले आहे कि कोणत्याही संस्थेला पेयमेन्ट करताना चेक नेच करू. एवढेच नव्हे तर गावी घर बांधताना सुद्धा आम्ही सर्व पेयमेन्ट त्या कंत्राटदाराच्या बँक खात्यात neft द्वारे च केले होते. आणि हे आम्ही फार पूर्वी पासून करत आहोत. अजून किती समजवायचं तुम्हाला भारत वासियांनो ?
पण जाऊ दे आपल्या शाळे बद्दल असं घडलं नाही ना मग सोडून दे !
छायाचित्र सौजन्य :- http://indiatoday.intoday.in/story/treehouse-nursery-mumbai-parents-kids/1/834735.html
No comments:
Post a Comment