बदलापूर मधील लोकांची एक तक्रार नेहमी ऐकायला मिळायची बाहेर गावच्या बसेस
सुटत नाही. तसं बघितलं तर MSRTC ला मोठा बस डेपो कुर्ला ने न प्रमाणे
उभारायचा होता, ज्यात कल्याण व विठ्ठलवाडी चा बस दुरुस्ती कारखाना हलवून
बदलापूरला आणायचा होता व वेग वेगळ्या गावां करिता बस सुटण्याचा डेपो
शिरगाव, बदलापूर पूर्व ला करायचा होता. पण अजूनही ९९ लीज ची सरकारी जागा
रिकामी न झाल्यामुळे हि योजना बारगळली आहे. पण आम्ही देत असलेल्या वेग
वेगळ्या वेब साईट वर देत असलेल्या फीडबॅक मुळे आता गांधी चौक, बदलापूर
पूर्व मधून कोल्हापूर करिता AC Seater v Sleeper बस सेवा, स्वस्तात मस्त
सेवा देणाऱ्या घाटगे पाटील ट्रॅव्हल तर्फे सुरु करण्यात आल्या आहेत.
त्या
सोबत आता नीता ट्रॅव्हल्स च्या लकी ट्रॅव्हल्स ने पण सेवा सुरु केली आहे.
त्या मुळे बदलापूरकरांची तक्रार काही अंशी दूर होईल. ह्या बस सेवा www.redbus.in व www.bookonspot.com
वर उपलबध आहेत. सोबत उदाहरणाकरिता छायाचित्र जोडले आहे. त्या मुळे ह्या
बसेस ना एवढा प्रतिसाद द्या कि गोवा बसेस पण सुरु झाल्या पाहिजेत.
छायाचित्र सौजन्य :- गुगळ
No comments:
Post a Comment