Tuesday, November 01, 2016

मराठीकाका

 मुलांना इंग्रजी माध्यम शाळेतून काढून मराठी या प्रगत माध्यमात शिकवण्यासाठी मराठी माध्यमात प्रवेश घेऊन देण्याची इच्छा असलेल्या पालकांचा मेळावा दिवाळीनंतर घ्यायचा आहे.
.
.
.
. मराठी माध्यमात शिकलेल्या हजारो पालकांनी फार मोठ्या अपेक्षेने मुले इंग्रजी माध्यमात घातली. अशा अनेक पालकांना अपेक्षेच्या विपरीत अनुभव येतात. आपण स्वत: मराठी माध्यम शाळेत चौथीत असताना आपल्याला अभ्यासातील आणि सर्वसामान्य दैनंदिन व्यवहारातील जितकी समज होती तितकी समज आपल्या चौथीतील मुलामुलींना नाही हे अनेक पालकांना स्पष्ट जाणवते. ही जाणीव हा धोक्याचा संदेश आहे. आपली मुले यापुढेही अशा न कळत्या अवस्थेत अशीच ठेवायची की त्यांची त्यातून सुटका करून पूर्ण मराठी माध्यम शाळेत घालून त्यांना कळत्या स्थितीत आणायचे हा निर्णय अशा पालकांनी घेण्याची वेळ आली आहे.
.
.
.
. हा निर्णय मागील वर्षी ५४००० मुलांच्या पालकांनी घेतला. या पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढले आणि मराठी माध्यम शाळेत घातले. इंग्रजी माध्यमातून काढलेली ही मुले मराठी शाळेत जाताना अशा पहिल्या दिवशी मुलांना आणि पालकांना काहीसे अवघडल्यासारखे झाले. दुसरया दिवसापासून अवघडलेपण कमी कमी होत गेले.
.
.
. काही काळाने मात्र या निर्णयाचे अनेक लाभ मुलांना आणि पालकांना जाणवले. मुलांना शाळेतील सर्वच विषय नीट समजू लागले. सर्वात महत्वाचा फायदा हा झाला की या मुलांचे इंग्रजी व्याकरण खूपच सुधारले. मराठी आणि इंग्रजी दोन्ही प्रकारच्या पुस्तकांचे वाचन वाढले. is. of. on. are, in, a, an, the, at या शब्दांची अनावश्यक गर्दी पुस्तक आणि वहीतून हटल्याने शाळेतला आणि घरचा अभ्यास लवकर होऊ लागला. मुलांना अभ्यास संपवून खेळायला, छंद जोपासायला वेळ मिळू लागला. इंग्रजी माध्यमात असताना सर्व विषयांची शिकवणी लावावी लागत होती ती गरज संपली. शाळेचे शुल्कही कमी असल्याने, सहली, स्पर्धा, खेळाचे प्रशिक्षण या गोष्टींसाठी खर्च करायला पैसे हाताशी राहू लागले.
.
.
. " माध्यम बदला, मुलांचे विश्वच बदलेल. नुसते बदलणार नाही तर मुलांचे विश्व अधिक सुंदर, अधिक आत्मविश्वासपूर्ण होईल, पालकांच्या मनावरील आणि खिशावरील अनावश्यक ताण कमी होईल "
.
.
. हे मी आणि माझे सहकारी गेली पाच वर्षे सांगत होतो. आमचे ऐकणारे दरवर्षी थोडे थोडे वाढून मागील वर्षी ५४००० पालकांनी आमचे ऐकून मुलांचे कोमेजलेले, खुरटलेले विश्व बदलले.
ज्यांना आपली इंग्रजी माध्यमातील मुले पुढच्या वर्षी मराठी माध्यमात घालावयाची आहेत त्यांचा एक मेळावा दिवाळीनंतर आयोजित करायचा आहे. पहिला मेळावा पुणे शहरात होईल कारण इंग्रजी माध्यमामुळे नुकसान झालेली सर्वाधिक मुले पुणे शहरात आहेत.
.
. इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यम स्वीकारण्याची इच्छा असलेल्या पुणे शहरातील पालकांनी कृपया नाव नोंदणीसाठी अनिल गोरे ९४२२००१६७१ या क्रमांकावर संपर्क साधून आपले  नाव, पत्ता  संपर्क  क्र.  सोयीचा  वार  आणि  वेळ  हा  तपशील  कळवावा . असा माध्यम बदल का आवश्यक आहे याची माहिती या मेळाव्यात दिली जाईल. मागील वर्षी माध्यम बदललेल्या विद्यार्थ्यांचे तसेच त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे अनुभव या मेळाव्यात सादर केले जातील.
- प्रा. अनिल गोरे, मराठीकाका

सौजन्य :- वॉट्सअँप फॉरवर्ड

No comments: