Saturday, December 31, 2016

Abstract of Speech of PM dtd. 31/12/16.




1.    To make Country powerful citizens can sacrifice anything.
2.    India power has been seen again
3.    Only 24 lakh people accepted their Income above Rs. 10/- Lacs. Is it possible.
4.    Laws will take actions strictly.
5.    Govt. officials are more responsible to protect rights of loyal citizens.
6.    Bank staff, Post office staff done good job.
7.    But those officials found guilty during demonitisation process will be punished strictly.
8.    Banks has got large funds in the history of India. Bank should form policies for middle class & lower class policies.
9.    Buying house is gone from the coverage of middle class & lower class families. Two schemes
10.  1. for Construction  loan upto Rs. 9 lakhs, interest subsidy of 4% will be given
11.  2. For construction loan upto Rs. 12 lakhs, interest subsidy of 3% will be given.
12.  33% more homes will be constructed in villages.
13.  Extension of homes loan upto Rs. 2 lakhs eligible for interest subsidy of 3%.
14.  Working capital loan limit increased based on digitized operations of an organization.
15.  Loans given by NBFC are also covered under Credit guarantee scheme.
16.  Pregnancy women will be given help of Rs. 6000/- directly credited to their Bank a/c
17.  Interest rate for Senior Citizens will be 8% for deposit upto Rs. 7.5 lakhs for 10 years deposit.
18.  Kisan Credit card will be converted in Rupay Card.
19.  Turnover above 2% will be taxed @ 6%.
20.  Thinking to hold simultaneously Elections of State & Central Assembly.
21.  All parties shall fight against corruption.

Please refer newspapers for detailed speech.

Thursday, December 15, 2016

ट्री हाऊस एडुकेशन च्या ११३ शाखा बंद

ट्री हाऊस 🏨हि एक मोठा ब्रँड असलेली इंग्लिश नर्सरी शाळा आहे. ह्या शाळेच्या व्यवस्थापनाने पूर्ण भारतातील जवळ जवळ ११३ शाखा अचानक काल पासून बंद केल्या, कोणतीही आगाऊ सूचना न देता. आता बघा हि कंपनी शेयर मार्केट मध्ये लिस्टेड आहे. म्हणजे हि पब्लिक कंपनी आहे. आणि एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी शेयर धारकांची मंजुरी घेऊन तशी सूचना कंपनी रजिस्ट्रार म्हणजेच ROC ला पण द्यायची असते. ऑक्टोबर २०१४ मध्ये रु ५००/- बाजार भाव असलेला शेयर आज रु ३०/- वर आहे. म्हणजे शेयर खरेदी केलेल्यांचे पैसे पण बुडाले.

असो. ट्री हाऊस कंपनीने कॅश शॉर्टेज चे कारण पुढे करत एवढ्या शाखा बंद केल्या. मग कॅश गेली कुठे ? हा एक घोटाळा देखील असू शकतो. आणि आपले ऑडिटर मात्र ट्रू आणि फेअर मत नावाखाली बॅलन्स शीट सर्टिफाय करतात.    ह्या   वरून ठळकपणे एक गोष्ट अधोरेखित होते कि, इंग्लिश शाळा ह्या फक्त कमाई करण्याच्या दृष्टीनेच उघडलेल्या असतात. त्यांना देशाच्या पुढच्या पिढी बद्दल काही काळजी तर सोडा, जबाबदारी सुद्धा वाटत नाही. तरी पण पालक हजारो रुपये डोनेशन व लाखो रुपये फी कॅश मधेच ह्या शाळांना देत असतात. वृत्तपत्रातील बातमी नुसार तर काही पालकांनी ऍडव्हान्स फी पण भरली आहे. आणि अश्या शाळां ची निवड करणारे पालक हे मोठं मोठ्या हुद्द्यावर जसे एक्जकूंटिव्ह, मॅनेजर, डायरेक्टर ह्या पदांवर असून देखील कुणीही चेक पेयमेन्ट करताना दिसत नाही.
जर समजा आता ह्या शाळेचे डोनेशन व फी (पुस्तक खरेदी नाही) हि जर १००% पालक १००%  चेक द्वारे भरणा करत असते तर ह्या शाळेची अशी हिम्मत झाली नसती. 

आम्ही तर स्वतःला बंधन च घालून घेतले आहे कि कोणत्याही संस्थेला पेयमेन्ट करताना चेक नेच करू. एवढेच नव्हे तर गावी घर बांधताना सुद्धा आम्ही सर्व पेयमेन्ट त्या कंत्राटदाराच्या बँक खात्यात neft द्वारे च केले होते. आणि हे आम्ही फार पूर्वी पासून करत आहोत. अजून किती समजवायचं तुम्हाला भारत वासियांनो ?

पण जाऊ दे आपल्या शाळे बद्दल असं घडलं नाही ना मग सोडून दे !

छायाचित्र सौजन्य :- http://indiatoday.intoday.in/story/treehouse-nursery-mumbai-parents-kids/1/834735.html

Wednesday, December 14, 2016

बदलापूर ते कोल्हापूर बस सेवा

बदलापूर मधील लोकांची एक तक्रार नेहमी ऐकायला मिळायची बाहेर गावच्या बसेस सुटत नाही. तसं बघितलं तर MSRTC ला मोठा बस डेपो कुर्ला ने न प्रमाणे उभारायचा होता, ज्यात कल्याण व विठ्ठलवाडी चा बस दुरुस्ती कारखाना हलवून बदलापूरला आणायचा होता व वेग वेगळ्या गावां करिता बस सुटण्याचा डेपो शिरगाव, बदलापूर पूर्व ला करायचा होता. पण अजूनही ९९ लीज ची सरकारी जागा रिकामी न झाल्यामुळे हि योजना बारगळली आहे. पण आम्ही देत असलेल्या वेग वेगळ्या वेब साईट वर देत असलेल्या फीडबॅक मुळे आता गांधी चौक, बदलापूर पूर्व मधून कोल्हापूर करिता AC Seater v Sleeper बस सेवा, स्वस्तात मस्त सेवा देणाऱ्या घाटगे पाटील ट्रॅव्हल तर्फे सुरु करण्यात आल्या आहेत. 






 त्या सोबत आता नीता ट्रॅव्हल्स च्या लकी ट्रॅव्हल्स ने पण सेवा सुरु केली आहे. त्या मुळे बदलापूरकरांची तक्रार काही अंशी दूर होईल. ह्या बस सेवा www.redbus.inwww.bookonspot.com वर उपलबध आहेत. सोबत उदाहरणाकरिता छायाचित्र जोडले आहे. त्या मुळे ह्या बसेस ना एवढा प्रतिसाद द्या कि गोवा बसेस पण सुरु झाल्या पाहिजेत. 


छायाचित्र सौजन्य :- गुगळ

Friday, December 09, 2016

काळ्या धनावर मात, सुशिक्षितपणे व प्रामाणिकपणे



पुढील लेख हा स्व अनुभवावर आधारित आहे. त्यामुळे कोणत्याही संस्थेचे दिलेले नाव म्हणजे त्यांची जाहिरात समजू नये. एक भारतीय नागरिक म्हणून कॅश लेस अर्थ व्यवस्थे बद्दल जे वाटत ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
============================================

तारीख ८ नोव्हेंबर २०१६ रात्री ८ वाजताची वेळ. सर्व टीव्ही, रेडिओ चॅनेल्स वर मा. पंतप्रधानांचे भाषण सुरु होणार होते, सर्व देश आतुरतेने व उत्सुकतेने वाट बघत होता कि पाकिस्तान विरुद्ध काहीतरी ऍक्शन घेतली जाईल. भाषण सुरु झाल्यावर आतंकवाद सारखे शब्द आल्यावर तर उत्सुकता अजून वाढली, पण पुढचेच शब्द ऐकून सर्व देशवासी एकदम स्तब्ध झाले. "आज ८ नोव्हेंबर रात्री १२ वाजल्यानंतर रु ५००/- व रु १०००/- च्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत." ह्या वाक्यानंतर मात्र पुढे पंतप्रधान काय बोलले याच्याकडे मला वाटत कुणाचाच लक्ष नव्हतं. त्या नंतर पंतप्रधानांनी व्यवस्थित पणे ह्या जुन्या नोटा कशा प्रकारे ३० डिसेंबर पर्यंत बदलता येतील ते हि सांगितलं होत. पण जेव्हा १० नोव्हेंबर पासून बँक उघडण्या पूर्वी असलेल्या रांगा पाहून व बँक उघडल्यानंतर झालेला गोंधळ पाहून असं वाटलं कि लोकांकडे फक्त रु ५००/- व रु १०००/- च्याच नोटा घरात असतात. लोक रु १००/-, रु ५०/-, रु २०/- रु १०/-, रु ५/-, रु २/- व रु १/- च्या नोटा विसरले असावेत. 


बरं आणखी एक स्तिथी बघण्यासारखी म्हणजे सर्व लोक व्यवस्थित पणे बँक कर्मचाऱ्यांना सहकार्य करत होते, कुठे हि कायदा सुव्यवस्थेची अफरातफर झाली नव्हती. याचाच अर्थ ज्या सामान्य लोकांना वाटलं कि खरंच काळा पैसे विरुद्ध हे चांगले पाऊल आहे.  हे पाहून मात्र विरोधक आक्रमक झाले, त्यांनी काही ना काही कारणे काढून लोकांमध्ये संभ्रम, पॅनिक पसरवण्याचा प्रयत्न केला.

विरोधकांचं म्हणणं कि सरकारने पूर्व तयारी केली नाही, लोकांना रांगेत उभं केलं. पण इथे एक सांगावस वाटत कि जर सरकारची पूर्व तयारी नसती तर १० नोव्हेंबरपासून काळा पैसे सफेद करण्याचे धंदे ज्या देश द्रोह्यांनी सुरु केले होते त्या वर अंकुश घालण्यासाठी सरकार ने पटापट वेग वेगळे निर्णय घेतले,, ह्यावरून हेच दिसते कि सरकारने आपल्या मनाची तयारी केली होती.

असो. तर आता जुन्या ५०० व १००० च्या नोटा बंद केल्यावर सामाजिक स्तिथी मधील त्रुटी व नोटा विरहित व्यवहार ह्याचे थोडे विश्लेषण करूयात.

पूर्वी व आज हि देखील  जेष्ठ नागरिकांना वीज बिल, पाणी बिल भरण्याच्या रांगेत उभे असलेले बघितलं कि वाटत कि ह्यांची मुलं हे सर्व ऑनलाईन का नाही भरत ? ह्याच उत्तर तर मी जेवढ्या ठिकाणी काम केलं आहे, तिथल्या सहकाऱ्यांशी बोलताना मिळत जे कि कंपन्यांमध्ये एक्झकुटिव्ह लेवल वर काम करणारे आहेत,   ते असं येत कि हि मुलं आज हि ऑनलाईन पेयमेन्ट करताना घाबरतात, बर्याचश्या जणांनी तर इंटरनेट बँकिंग तर जाऊ देत, साधी बँकांची sms अलर्ट सुविधा पण कुणासाठीच घेतली नाही, ना स्वतःसाठी, ना आपल्या घरातील जेष्ठ नागरिकांसाठी.

असो. तर आता जुन्या ५०० व १००० च्या नोटा बंद केल्यावर सामाजिक स्तिथी मधील त्रुटी व नोटा विरहित व्यवहार ह्याचे थोडे विश्लेषण करूयात.

Ø  बरं नोटा विरहित व्यवहार चा अर्थ फक्त ऑनलाईन पेयमेन्ट हा होत नाही. प्रत्येक वीज बिल, पाणी बिल भरण्याच्या ठिकाणी एक ड्रॉप बॉक्स ठेवलेला असतो. त्यात आपण आपल्या वीज बिल, पाणी बिलाचा भरणा cheque द्वारे पण करू शकतो. पण इथेही लोक कारण देतात कि ड्रॉप बॉक्स मध्ये टाकल्यावर आम्हाला पावती मिळत नाही. आणि काही लोक तर cheque बिला सोबत जोडून अक्खा बिल त्या ड्रॉप बॉक्स मध्ये टाकतात. तर हे चुकीचं आहे. प्रत्येक वीज बिल, पाणी बिल च्या खाली एक कात्री दाखवलेला भाग असतो तेवढाच भाग फाडून त्या सोबत आपण cheque जोडून तो ड्रॉप बॉक्स मध्ये टाकायचा असतो. आणखी असं कि ड्रॉप बॉक्स मध्ये टाकल्यावर आपल्याला दोन पावती मिळतात. एक पुढच्या महिन्यात आलेल्या बिलामध्ये मागील बिल भरल्याची तारीख असते व दुसरी म्हणजे cheque भरणा केल्यामुळे आपल्या पासबुक मध्ये एन्ट्री येते.  हां पण अश्या प्रकारे cheque भरणा करताना cheque च्या मागे आपला ग्राहक नाव, ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक नक्की लिहा, म्हणजे cheque च्या मागील पावती हरवली तरी तो cheque तुमच्याच ग्राहक क्रमांकावर जमा होईल. पण जर तुम्ही कॅश मध्ये बिल भरली तर मात्र तुम्हाला एकाच पावती मिळते,, हा फरक आहे.
तुम्ही तुमचे वीज बिल व पाणी बिल तर तुमच्या इंटरनेट बँकिंग मध्ये पण रजिस्टर करून ठेवू शकता. तसेच एअरटेल मनी सारखे विकल्प सुद्धा तुम्ही बिल पेयमेन्टस साठी पण वापरू शकतो. एअरटेल मनी ने बिल भरल्यावर तर तुम्हाला १% सूट पण पुढील बिलात मिळते. 

Ø  अजून एक रांग दिसण्याचे ठिकाण म्हणजे रेल्वे आरक्षण. ह्याबाबतीत देखील लोकां मध्ये बरेच गैर समज आहेत. असं म्हणणं असत कि काउंटर ला आरक्षण केल्यावर हवे ते बर्थ मिळतात. पण इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि, पूर्ण देशात रेल्वे आरक्षणाची एकाच प्रणाली आहे आणि आरक्षण मध्ये सीट ऑलॉटमेंट हे आपोआप होत असते. पूर्वी जेष्ठ नागरिकांसाठी असलेला कोटा मध्यंतरी बंद करण्यात आला होता पण श्री सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाल्यावर हा कोटा पुन्हा सुरु करण्यात आला आहे, त्यामुळे जरी जनरल प्रतीक्षा यादी असली व ह्या कोट्यात सीट असल्या तर जेष्ठ नागरिकांना आरक्षण मिळते.  आता तर प्रत्येक बँकेच्या वेबसाईट वर रेल्वे आरक्षण्याच्या वेबसाइट ची लिंक पण देण्यात आली आहे. कोणत्याही वेबसाईट वर इंटरनेट बँकिंग किंवा डेबिट / क्रेडिट कार्ड द्वारे पेयमेन्ट करताना ती वेबसाईट https:// असणे गरजेचे आहे.  आता प्रत्येक पब्लिक सेवेचे मोबाईल अँप पण आहेत.

आम्ही तर नातेवाईकांना / शेजार्यांना रेल्वेचे इ-तिकीट सुद्धा आरक्षित करून देत असतो, फक्त जेवढे चार्ज बँक अकाउंट मधून डेबिट होतात तेवढीच कॅश घेऊन आमच्या अकाउंट ला जमा करत असू. पण आता नातेवाईकांनी / शेजाऱ्यांनी आम्ही काढून दिलेल्या इ-तिकीट च्या भरपाई साठी कॅश न देता चेक देण्यास सुरुवात केली आहे, त्या मुळे आमचा पण अकाउंट ला कॅश जमा करण्याचा वेळ वाचत आहे. लोकांनी असा विचार करण्यास सुरुवात करणं म्हणजेच नोटा विरहित अर्थ व्यवस्थे करिता पहिले पाऊल पडत आहे.


Ø  तर आता एका मध्यम वर्गीय कुटुंबाला जे मासिक / वार्षिक सामान्यतः  कायमचे खर्च आहेत व त्यातील कोणते खर्च ऑनलाईन / चेक द्वारे भरू शकतो त्याचे एक उदाहरण घेऊन विश्लेषण करूया. ह्यात मोठे खर्च जसे लग्न, मोठे आजारपण गृहीत धरलेले नाहीत. ह्या उदाहरणात ५ सदस्य असलेले कुटुंब बदलापूर, जि. ठाणे, महाराष्ट्र ज्यांचा सर्व सदस्यांचे मिळून मासिक उत्पन्न  रु ३०,०००/- म्हणजेच वार्षिक उत्पन्न रु ३,६०,०००/- आहे असे गृहीत धरण्यात आले आहे व ते पेयमेन्ट करण्यासाठी वापरत असलेल्या पद्धती.


अनु क्र.
खर्चाचे स्वरूप
अंदाजे मासिक खर्च रु. 
अंदाजे वार्षिक खर्च रु.
पेयमेन्ट करण्याची पद्धत
१.
रोजचा भाजीपाला , अंडी रु. ५०/-
१५००
१८०००
कॅश
२.
कधीतरी मासे, चिकन ४ वेळा
६००
७२००
कॅश
३.
रोजचे दूध १/२ लिटर, दही, ज्येष्ठांची औषधें
६३०+ ९०
७६००+ १०६०
कॅश, आता दूध ऑनलाईन बुक करण्याची पण सुविधा उपलब्ध आहे
४.
वीज बिल (ए सी विरहित)
५००
६०००
ऑनलाईन http://www.mahadiscom.in/ ह्या वेबसाईट द्वारे.
५.
सोसायटी मेंटेनन्स
५००
६०००
चेक द्वारे / बँक ट्रान्सफर द्वारे
६.
प्रॉपर्टी टॅक्स (१ बीएचके टेरेस फ्लॅट)     
-------
२०००
ऑनलाईन http://kbmc.gov.in/EIPPROD/singleIndex.jsp  ह्या वेबसाईट द्वारे..
७.
पाणी बिल
१००
१२००
ऑनलाईन https://mjp.maharashtra.gov.in/en/water-bill-payment   ह्या वेबसाईट द्वारे..
८.
तांदूळ, गहू, कडधान्ये, चहा पावडर, साखर, तेल, दळण, स्नॅक्स, कांदे ,बटाटे
८०००
९६०००
डी मार्ट मध्ये कार्ड पेयमेन्ट द्वारे
९.
गॅस (भारत गॅस)
५००
६०००
ऑनलाईन http://ebharatgas.com/ebharat/forHome/forHome.html  ह्या वेबसाईट द्वारे..
१०.
रेल्वे पास त्रै मासिक
८६५
३४६०
ऑनलाईन https://www.irctc.co.in  ह्या वेबसाईट द्वारे.
११.
मुंबई मेट्रो
१०४०
१२४८०
ऑनलाईन http://www.reliancemumbaimetro.com/metroinstacharge/entry.do   ह्या वेबसाईट द्वारे.
१२.
स्कूल फी व बस
२०००
२४०००
चेक द्वारे
१३.
स्कूल ड्रेस, पुस्तके, क्लास
-----
१००००
कार्ड पेयमेन्ट व चेक द्वारे
१४.
खरेदी (कपडे, इतर घरगुती उपकरणे)
------
८०००
वेग वेगळ्या वेबसाईट वर ऑनलाईन पेयमेन्ट किंवा दुकानातून कार्ड पेयमेन्ट द्वारे
१५.
गाव भेट, गाव वीज बिल, पाणी बिल, ग्रामपंचायत कर, काही डागडुजी
------
२००००
रु ५०००/- बस आरक्षण https://public.msrtcors.com/ticket_booking/  व रेल्वे आरक्षण https://www.irctc.co.in  ह्या वेबसाईट द्वारे व रु १००००/- गावी कॅश द्वारे.  रु ५०००/- वीज बिल, पाणी बिल ऑनलाईन, डागडुजी कॅश द्वारे
१६.
कॅश बॅलन्स कोणत्याही क्षणी
------
३६०००
सहसा वार्षिक उत्पनाच्या १०% हा कॅश बॅलन्स म्हणून गृहीत धरला जातो.
१७.
इंटरनेट  (बीएसएनएल)
२५०
३०००
ऑनलाईन पेयमेन्ट www.bsnl.in  ह्या वेबसाईट द्वारे.
१८.
डिजिटल टी वि / केबल
२५०
३०००
ऑनलाईन पेयमेन्ट www.airtel.in   ह्या वेबसाईट द्वारे.
एकूण अंदाजे वार्षिक खर्च
२७१०००
म्हणजेच उर्वरित वार्षिक उत्पन्न  :- रु ८९०००/-




आता वरील विश्लेषणानुसार एक वस्तुस्तिथी तुमच्या लक्षात आली असेलच,, आपल्या मासिक खर्च मधील बरेचसे पेयमेन्ट हे आपण नोटा विरहित करू शकतो. म्हणजेच ऑनलाईन / कार्ड द्वारे / चेक द्वारे करू शकतो.  आता चेक द्वारे पेयमेन्ट करण्यामध्ये लोक कारण देतात कि चेक बुक येण्यासाठी पण वेळ लागतो. इथे असा सांगावस वाटत कि जेव्हा सरकारी यंत्रणा आपल्याला सोयी प्रमाणे सेवा देण्यात सज्ज आहे तर आपण का मागे राहावं !  IDBI Bank ची तर अशी व्यवस्था आहे कि जेव्हा तुमच्या चेक बुक मध्ये ५ पेक्षा कमी चेक राहिल्यावर लगेच चेक बुक घरी येते. 
 

आज डिसेंबर ८ रोजी तर सरकारने जाहीर केले आहे कि आपण कोणत्याही सरकारी सेवांचे ऑनलाईन पेयमेन्ट केल्यावर वेगवेगळ्या पर्सेंटेज मध्ये सूट मिळणार आहे.              

Ø  आता रिअल इस्टेट क्षेत्र म्हणजेच घर खरेदी विक्रीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर असंघटित दलाल / एजेंट्स  आहेत.  सामान्य पणे आपण घर खरेदी करताना किंवा विकताना अश्या एकमेकांच्या ओळखीच्या एजेंट्स द्वारे व्यवहार करतो व अश्या एजेंट्स ना त्यांचा मोबदला म्हणजे कमिशन कॅश मध्ये देत असतो, व असे एजेंट्स दोन्ही पार्टी  कडून कमिशन घेतात. म्हणजे आपणच एक प्रकारे आपल्या पैशाला ब्लॅक मनी बनवतो, आणि फायदा मात्र दुसराच घेतो. त्या मुळे अश्या मोठ्या व्यवहारात चेक चाच उपयोग करत चला.
उदा. समजा व्यवहार रु ३०/- लाखाचे घर खरेदी चा झाला तर अश्या एजेन्टस ना एकूण १% म्हणजे ३०००० + ३०००० = रु ६००००/- कमिशन कॅश मध्ये मिळते. 

Ø  अजून एक असंच एक असंघटित क्षेत्र म्हणजे अकाउंट्स लिहिणे, पॅन कार्ड बनवून देणे, रिटर्न फाईल करून देणे असे काम करून देणारा वर्ग.  अश्या वेळी पण आपण त्यांना त्यांच्या सेवेसाठी सरसकट चेक ने पेयमेन्ट केले तर अति उत्तम.

Ø  मजूर किंवा ज्यांना आपण अनस्किलड लेबर म्हणतो तो वर्ग, मग ते कोणीही असो सोसायटीचा वॉचमन, सुरक्षा रक्षक, घर काम करणारे, बांधकाम करणारे ह्या सर्वाना आपण कॅश मधेच पेयमेन्ट करत असतो. ठीक आहे त्यांना पण कॅश ची गरज असते, पण आपण त्यांना बँकिंग सिस्टिम पासून वंचित ठेवत असतो. ह्यावर आमच्या सोसायटी ने मस्त उपाय केला... वॉचमन ला त्याच्या नावाने बेअरर चेक द्यायला सुरुवात केली, त्यामुळे त्याला सुद्धा बँक सिस्टिम ची सवय झाली व सोसायटी च्या पासबुक मध्ये पण त्याच्या नावाने एन्ट्री येत असल्यामुळे ऑडिटर पण खुश झाले.
आम्ही तर लग्नासाठी जो हॉल घेतला होता त्याच संपूर्ण भाडे चेक द्वारे च भरले होते. 


ह्या संपूर्ण लेखाचे तात्पर्य हेच कि, जेव्हा प्रत्येक भारतीय स्वतःहून विचार करायला लागेल, कि मी दिलेला पैसे (कॅश) हि पुढे ब्लॅक मनी म्हणून तर जमा खोरी केली जाणार नाही ना !, आणि मग जिथे शक्य होईल तिथे नोटा विरहित व्यवहार करण्यास प्रत्येक भारतीय नागरिक सुरुवात करेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने  आपण नोटा विरहित म्हणजेच कॅश लेस अर्थव्यवस्थे ची बांधणी करण्यास सुरुवात केली आहे असे म्हणता येईल.

छायाचित्र सौजन्य :- गूगल