Sunday, November 24, 2013

तुळशीचे लग्न

   तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणा त आहे. ती अशी, की जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योध्दा राक्षस होऊन गेला. त्याने आपल्या पराक्रमाने देवांना जिंकून वैभव प्राप्त केले आणि आपल्या भाईबंद दैत्यांस सुखी केले. त्याची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. तिच्या पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरला होता. त्याने इंद्रपुरीवर चाल करून इंद्राची खोड मोडण्यासाठी कडेकोट तयारी चालवली होती. पुढे, देव व दैत्य यांच्यांत युध्द होऊन अनेक देवांस गतायू व्हावे लागले. तेव्हा विष्णूने जालंधरास युद्धात हरवण्यासाठी कपटकारस्थान रचले. त्याने जालंधराची पत्नी वृंदा हिच्या जाज्वल्य पातिव्रत्यामुळेच जालंधरास सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे जाणून, ते नष्ट करण्यासाठी युक्ती योजली.
तुलसी स्तोत्र
तुलसी सर्व प्रतांना महापातक नाशिनी |
अपवर्ग प्रदे देवी वैष्णवाना प्रिय सम ||
सत्ये सत्यवतीचैव त्रेतया मानवी तथा |
द्वापारे चावतीर्णासि वृंदात्व तुलसी क्ली: ||
विष्णूने दोन वानरांकडून जालंधर हा रणभूमीवर मारला गेला आहे अशी बतावणी करून, आपले शीर व धड तंतोतंत जालंधराप्रमाणे बनवून ते दोन अवयव वृंदेपुढे टाकले. तेव्हा वृंदा शोक करू लागली. इतक्यात, एका कपटी साधूने संजीवनी मंत्राने कपटवेषधारी जालंधरास म्हणजेच विष्णूस जिवंत केले! वृंदेने आपला पती जिवंत झालेला पाहून आनंदातिशयाने त्याला मिठी मारली. अशा प्रकारे, विष्णूने वृंदेसमवेत राहून तिचे पातिव्रत्य भंग केले. अज्ञानात का होईना पण वृंदेच्या पातिव्रत्यभंगामुळे जालंधर बलहीन होऊन लढाईत मारला गेला. काही काळानंतर, वृंदेस खरा प्रकार कळताच तिने क्रोधित होऊन विष्णूस शाप दिला, की त्याला पत्नीचा वियोग घडून दोन मर्कटांचे सहाय्य घेण्याची पाळी त्याच्यावर येईल. त्याप्रमाणे पुढे रामावतारी तसे घडले!
त्यानंतर लगेच वृंदेने अविकाष्ठ भक्षण केले. विष्णूलाही आपण कपटाने एका महासाध्वीचा नाहक नाश केला हे पाहून वाईट वाटले; इतकेच नव्हे तर तो वृंदेच्या रक्षेजवळ वेड्यासारखा बसून राहिला. विष्णूचे वेड घालवण्यासाठी पार्वतीने तेथे, वृंदेच्या रक्षेवर तुळस, आवळा व मालती यांचे बी पेरले. त्यातून तेथे तीन झाडे उत्पन्न झाली. त्यांतील तुळस ही आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे वाटून विष्णूस ती प्रिय झाली. श्रीविष्णूस तुळस अतिप्रिय म्हणून तिला हरिप्रिया म्हणतात. पुढे वृंदा हिनेही द्वापार युगात रुक्मिणीच्या रूपाने अवतरून विष्णूचा अवतार जो श्रीकृष्ण त्यास कार्तिक शुध्द द्वादशीच्या दिवशी वरले. अशा प्रकारे, हिंदू लोक रुक्मिणी-कृष्ण विवाह तुळशी विवाहविधीच्या रूपाने त्या दिवशी दरसाल साजरा करतात. त्यात तुळस ही वधू, बाळकृष्‍ण हा वर, तर ऊस हा मामा समजला जातो. सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सारवून, सुशोभित केले जाते. तुळशीभोवती रांगोळी काढली जाते. वृंदावनात ऊस पुरून आवळे व चिंचा टाकतात. तुळशीच्‍या चारी बाजूंनी ऊसाचा मंडप उभारला जातो. मग विष्णुस्वरूप श्रीबाळकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते. बाळकृष्णाला आवाहन करून त्‍यास स्नान, अभिषेक, नवीन वस्त्र, नवीन साज, तसेच नैवेद्य अर्पण करून त्याची आळवणी करतात. त्यानंतर तुळशीमातेचीही षोडशोपचारांनी पूजा करून, तिला सौभाग्यलेणे, नवीन साज, नवीन वस्त्र देऊन सालंकृत सजवतात. तुळस आणि श्रीकृष्‍ण विवाहासमयी चौरंगाच्‍या एका बाजूस श्रीकृष्‍ण तर दुसर्‍या बाजूस तुळशीचे रोप ठेवून दोघांमध्‍ये अंतरपाट धरला जातो. मग सर्वांना अक्षता वाटल्‍या जातात. त्यानंतर मंगलाष्‍टके म्‍हटली जातात आणि गोरज मुहूर्तावर श्रीकृष्‍ण-तुळशीचा विवाह सोहळा पार पडतो.प्रहर रात्रीच्या आत पूजा आटोपल्यावर मांडवाभोवती (जो वृंदावनाभोवती ऊस रचून केलेला असतो) आरती, दीपाराधना, उरकण्यात येऊन जमलेल्या लोकांस लाह्या, कुरमुरे, ऊसाच्या गंडेर्‍या देण्यात येतात.
त्या दिवसापासून हिंदू लोकांच्या विवाहासंबंधी कार्यास सुरूवात होते. ‘वधुपिते घराबाहेर पडतात व मुलीचे लग्न जुळवण्यासाठी चपला झिजवू लागतात’ असे पूर्वी म्हणत.
हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते. तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके तुळशीला महत्त्व आहे.
 "तुळसीचे पान. एक त्रैलोक्य समान |
उठोनिया प्रातःकाळी, वंदी तुळसी माऊली |
नाही आणिक साधन, एक पूजन तुळसीचे
न लगे तीर्थाधना जाणे, नित्य पूजने तुळसीसी
योगायोग न लगे काही, तुळसीवाचुनी देव नाही"
अशा शब्‍दांत संत एकनाथां नी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. तुळशीमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त असल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास तिचा उपयोग होतो. दारात वा घरात तुळशीचे झाड असल्यास घरात पिसवा, हिवतापाचे जंतू शिरकाव करत नाहीत. तुळस प्रदूषणनाशक आहे. ताप, सर्दी, खोकला दूर करणे, हवा शुद्ध करणे हे तिचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत.
हिंदूंच्या अंत:करणात तुळशीसंबंधात पूज्यभाव आहेच; पण इतर धर्मीयदेखील तुळशीबद्दल आदर दाखवतात. इंग्रजी शब्दकोशात तुळशीला ‘पवित्र झाड’ असे म्हटले आहे. ग्रीक भाषेतील बेंझिलिकॉन हा तुळशीसंबंधीचा शब्द राजयोग या अर्थाचा आहे. तुळशीला फ्रेंच व जर्मन भाषांतही ग्रीक शब्दांप्रमाणे बहुमानाचे अर्थ लाभलेले आहेत. इटाली व ग्रीस देशांत प्राचीन काळी तुळशीच्या अंगी विशिष्ट शक्ती आहे असे मानत असत.
सुरेश वाघे- दूरध्वनी:(022) 28752675
संदर्भ: आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास- लेखक ऋग्वेदी, प्रथमावृती 1916
(ऋग्वेदी : वामन मंगेश दुभाषी यांनी हे टोपणनाव धारण केलेले होते. पु.ल.देशपांडे हे त्यांचे नातू होते.)
सौजन्य :- http://thinkmaharashtra.com/

पराती मिसळचा चटका

संभाजीनगरचे ग्रामदैवत असणार्‍या राजाबाजार येथील संस्थान गणपतीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी येथे नियमितपणे येण्याचे आणखी एक खास आकर्षण आहे. बाप्पाचा प्रसाद खाल्ल्यानंतर संभाजीनगरवासीयांची पाऊले आपोआप वळतात ती या ठिकाणची ओळख झालेल्या पराती मिसळ पाव या हॉटेलकडे. हॉटेल तसे छोटेखानीच आहे, पण गेल्या ६० वर्षांपासून या पराती मिसळचा चटका शहरातील चोखंदळ खवय्यांची तृष्णा भागवत आहे.
जुन्या संभाजीनगरचे साक्षीदार बाबुलाल पराती यांनी ६० वर्षांपूर्वी या दुकानाची सुरुवात केली. शहागंज हा सुरुवातीपासूनच गजबजलेला बाजारपेठेचा भाग. येथे कामानिमित्त जिल्ह्यातून दूरदूरहून लोक येत. पूर्वी येथेच बस स्टँडही होते. त्यामुळे काम आटोपताच खमंग मिसळ-पाव खाण्यासाठी लोक येथे गर्दी करायचे. सहा दशकांनंतरही ही गर्दी आहे तशीच आहे. मधले काही काळ हे दुकान बंद होते, पण खवय्यांच्या तीव्र मागणीवरून पराती कुटुंबीयांच्या पुढच्या पिढीने ते पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. शहराच्या खाद्य परंपरेचा हा वारसा बाबुलाल यांचे पुतणे अजय पराती चालवतात. काळानुरूप त्यांनी दुकानात थोडे बदल केले आहेत. जुने जाऊन चकाचक फर्निचर आले, पण मिसळीची चव आहे तशीच आहे.
फक्त ५ तासच खमंग मिसळआधुनिकतेच्या काळात आता २४ तास हॉटेल उघडे ठेवण्याबाबत चर्चा सुरू आहे, पण पराती मिसळ पाव केवळ ५ तासच उघडे असते. सकाळी ७ ते १२ अशीच याची वेळ आहे. सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडणार्‍यांचा नाश्ता येथेच होतो तर आपली प्लेट मिस होऊ नये यासाठी ग्राहकांच्या अक्षरश: रांगा लागतात. अजय यांनी पारंपरिक मिसळीशिवाय येथे काही नवीन पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. यात जैन समाजासाठी कांदा-लसूण नसणारी जैन मिसळ, कोल्हापुरी मिसळ, बटर मिसळ आणि दही मिसळचा समावेश आहे. याशिवाय समोसे, भजी, वडापाव हे पदार्थ आहेतच, पण यात ग्राहकांच्या उड्या पडतात त्या मिसळ पाववरच. मिसळीचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे याचा रस्सा काळा आहे. इतर ठिकाणी लालभडक रस्सा पाहताच डोळ्यांतून पाणी येते, पण परातीच्या मिसळीचा काळा रस्सा तिखट तर आहेच पण याची चव दिवसभर जिभेवर रेंगाळते.


अजय परातीसंचालक, पराती मिसळ पाव.
संभाजीनगरची परंपरामधल्या काळात काही वर्षे मी नोकरी केली, पण काकांनी सुरू केलेला हा व्यवसाय मला स्वस्थ बसू देत नव्हता. अनेक जणांनीही हॉटेल पुन्हा सुरू करण्याचा रेटा लावून धरला होता. त्यांच्या प्रेमामुळेच पुन्हा नवीन जोमात या व्यवसायात उतरलो. संभाजीनगरची खाद्यपरंपरा ठरलेल्या या हॉटेलला पूर्वीपेक्षा अधिक प्रतिसाद मिळतोय, हेच आमच्या चवीचे यश आहे.

सौजन्य :- फुलोरा, सामना २४१११३

Monday, November 04, 2013

गुंतवणुकीची क्षेत्रे आणि विश्लेषण

आपण जेव्हा कधी गुंतवणुकीची चर्चा करत असतो, तेव्हा एक गोष्ट आपल्या सहज लक्षात आली असेल कि  बर्याचश्या लोकांची गुंतवणूक हि एक किंवा दोन अश्या विशिष्ट क्षेत्रातच असते. तर आज आपण आपल्या बचत खात्याव्यातिरिक्त व प्रोपर्टी या क्षेत्राव्यतिरिक्त असलेल्या रु १,००० ची गुंतवणूक  इतर गुंतवणुकीच्या क्षेत्रात  कशी करावी याबद्दल जाणून घेऊया.
१. शेयर्स - इथे शेयर्स म्हणजे मुंबई स्टोक एक्स्चेंज व नशनल स्टोक एक्स्चेंज (BSE व NSE) इथे व्यवहार होत असलेले विविध कंपन्यांचे शेयर्स. इथे तस बघितलं तर शेयर्स व्यावसायिक हे छोट्या अवधीसाठी गुंतवणूक करीत असतात. पण गुंतवणुकीचे क्षेत्र म्हणून जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर आपण मोठ्या अवधीसाठी गुंतवणूक करणे आवश्यक असते. आता कोणत्या शेयर्स मध्ये गुंतवणूक करायची याचे बेसिक ज्ञान तरी आपणास असले पाहिजे. कारण शेयर्स मधील गुंतवणूक हि जोखीम ची गुंतवणूक मानली जाते. यासाठी आपण आपल्या शेयर ब्रोकर चा सल्ला घेण्याबरोबरच आपण ज्या कंपनीच्या शेयर्स मध्ये गुंतवणूक करणार आहोत किंवा केली आहे त्या बद्दल येत असलेली वर्तमान पत्रातील माहिती व बिजनेस न्यूज चनेल वरील माहिती वर पण लक्ष ठेवले पाहिजे. जर आपली गुंतवणूक योग्य कंपनीच्या शेयर्स मध्ये असेल तर त्यातून मिळणारा परतावा हा देखील इतर गुंतवणुकीच्या क्षेत्रापेक्षा उत्तम असतो. आजही अशी उदाहरण पाहायला मिळतात कि ज्यांनी मोठ्या अवधीसाठी चांगल्या शेयर्स मध्ये गुंतवणूक केली होती त्यांना मिळालेला परतावा हा देखील कितीतरी पटीने मोठा आहे . उदा. ज्या गुंतवणूक दारांनी आयशर मोटर ह्या कंपनीचे शेयर्स २७ वर्षांपूर्वी रु १२/- ला घेतले होते त्याचा भाव रु ३९००/- वर आहे,,, तर वोखहार्ट ह्या कंपनीचा शेयर एका वर्ष पूर्वी रु २१००/- वर होता तो आज वाईट बातम्यांमुळे रु ४५०/- वर आहे .
तर अस आहे "शेयर्स" हे गुंतवणुकीच क्षेत्र. त्यामुळे ह्या क्षेत्रात ३०% गुंतवणूकच करावी. 
तर आता आपण पाहूया सुरक्षित गुंतवणुकीची क्षेत्रे.
२. रिकरिंग डिपोजिट-(आर. डी. ) :- रीकरिंग म्हणजे परत परत केली जाणारी गुंतवणूक. हि गुंतवणूक दर दिवसाची किंवा दर महिन्याची सुद्धा असू शकते. अर्थात बँकेतील आर. डी.व्याज दर हा फिक्सड डिपोजिट प्रमाणेच असतो. बँकेतील आर. डी.  हा  कमीत कमी  सहा महिन्यासाठीठेवावा लागतो. हे क्षेत्र पण आपल्या बचत खात्याप्रमाणेच काम करत. आपण ह्या क्षेत्रात आपल्या इतर खर्चानबरोबरच सतत बचत करू शकतो. त्यामुळे ह्या क्षेत्रात १०% गुंतवणूक ठेवण्यास काहीच हरकत नाही. आपल्यापैकी बरेच जन आर डी हा एख्याद्या पतसंस्थेत किंवा सहकारी सोसायटी किंवा इतर कोणत्याही आर्थिक  संस्थेत ठेवतात, तेव्हा हे बघण पण आवश्यक आहे कि ती संस्था आरबीआय (RBI) किंवा सेबी (SEBI) किंवा तत्सम रेगुलेटरी ऑथोरिटी बरोबर रजीस्टार आहे. पोस्ट ऑफिस पण आर डी ची सुविधा देत.
३. एफ डी बँक्स कुमुलेटीव :- एफ डी म्हणजे फिक्सड डेपोजीट किंवा मुदत ठेव. नावावरुनच तुमच्या लक्षात येईल कि ठेव किंवा गुंतवणूक हि एका विशिष्ट कालावधी साठी करावी लागते. कुमुलेटीव म्हणजे व्याज पण मुद्दलीत जमा होऊन त्यावर व्याज मिळून जमा झालेली रक्कम.
उदा. समजा तुम्ही रु. १००००/- जर ९% दराने ५ वर्षांसाठी ठेवले तर तुम्हाला मचुरीटी (एफ डी बंद होणाऱ्या) दिवशी रु १५,५६७/- मिळतील.
त्यामुळे ह्या गुंतवणूक क्षेत्रात १०% गुंतवणूक करण्यास काहीच हरकत नाही.          
४. एफ डी बँक्स नॉन-कुमुलेटीव :- एफ डी म्हणजे फिक्सड डेपोजीट किंवा मुदत ठेव. नावावरुनच तुमच्या लक्षात येईल कि ठेव किंवा गुंतवणूक हि एका विशिष्ट कालावधी साठी करावी लागते. नॉन- कुमुलेटीव म्हणजे एफ डी बंद होणार्या दिवशी सुद्धा आपली मुद्दल तशीच परत मिळते, मात्र त्यावरील व्याज हे आपल्या बचत खात्यात दर महिना / त्रैमासिक / सहा महिन्यांनी जमा होते.  
उदा. समजा तुम्ही रु. १००००/- जर ८ % दराने ५ वर्षांसाठी ठेवले तर तुम्हाला मचुरीटी (एफ डी बंद होणाऱ्या) दिवशी रु १०,०००/- च मिळतील. मात्र जर तुम्ही दरमहा हे ऑप्शन घेतले असेल तर रु ६६/-  दरमहा तुमच्या बचत खात्यात व्याज रूपाने ५ वर्षांपर्यंत जमा होत राहतील.     
त्यामुळे हे क्षेत्र देखील १०% गुंतवणूक करण्यास योग्य आहे.           
५. एल. आय. सी., मेडिक्लेम पोलिसिज वगैरे :- आपल्यापैकी सर्वच  जणांचा कल हा आपले पुढील आयुष्य सुरक्षित करण्याचा असतो म्हणजेच जीवन इंसुरड करण्यावर असतो व त्यामुळेच आपण लाईफ इंसुरंस व तत्सम पोलिसिज मध्ये गुंतवणूक करत असतो .    त्यामुळेच ह्या क्षेत्रात पण आपल्या एकूण गुंतवणूक क्षमतेतील १०% गुंतवणूक ठेवण्यास काहीच हरकत नाही.    
६. कंपनीचे बोन्ड्स डेबेण्चार कुमुलेटीव :- लिमिटेड कंपनीज त्यांना लागणारे भांडवल हे लोकांकडून तीन प्रकारे घेऊ शकतात - १. इक्विटी शेयर्स २. प्रेफेरंस शेयर्स ३. बोन्ड्स किंवा डेबेन्चार . ४. फिक्सड डिपोजिट 
बोन्ड्स किंवा डेबेन्चार कुमुलेटीव किंवा जर फिक्सड डिपोजिट मध्ये व्याज हा ज्या कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे त्या दरम्यान मुद्दलीत जमा होऊन त्यावर पुन्हा व्याज जमा होते व एकूण रक्कम मचुरिटी दिवशी मिळते. 
७. कंपनीचे बोन्ड्स डेबेण्चार नॉन कुमुलेटीव -   ह्या गुंतवणूक क्षेत्रात व्याज हे मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक पद्धतीने घेण्याची सुविधा असते.         
८. एन. एस. सी., पी. पी. एफ., के. वि. पी. वगैरे - एन. एस. सी  म्हणजे नशनल सेविंग सर्टीफिकेट  व के. वि. पी. म्हणजे किसान विकास पत्र. हे दोन्ही गुंतवणुकीचे विकल्प पोस्ट ऑफिस (टपाल कार्यालय) द्वारे दिले जातात. ह्या प्रकारात पण गुंतवणूक हि एका विशिष्ट कालावधी साठी करावी लागते. पी. पी. एफ. म्हणजे पब्लिक प्रोविडेंट फंड . पी. पी. एफ. ची सुविधा हि पूर्वी फक्त एस बी आय मधूनच दिली जात होती ती आता इतर बँकांमधून सुद्धा दिली जाते. ह्यातील गुंतवणूक हि पंधरा वर्षांकरिता असते पण पाच वर्षानंतर जमा रकमेवर काही प्रमाणात कर्ज घेण्याची  सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे ह्या गुंतवणूक क्षेत्रात पण १० % गुंतवणूक ठेवणे पण योग्य आहे .   ह्या क्षेत्रात व्याज हे मुद्दलीतच जमा होण्याचा  विकल्प आहे .
९. म्युच्युअल फंड -  हा एक गुंतवणूकीचा पर्याय आहे ज्याचा वापर करून भारतीय गुंतवणूकदार कर बचत, संपत्ती निर्माण करणे, नियमित उत्पन्न मिळवणे, इ. उदिष्टे साध्य करू शकतो संपत्ती निर्माण करणेसाठी समभाग निगडीत योजना, ज्यात शेअर बाजाराची जोखिम अंतर्भुत असते व कर्जरोखे निगडीत योजना ज्यात व्याज दराचे बदलाची व पतदर्जाची जोखिम अंतर्भुत असते. समभाग निगडीत योजनांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या जास्त जोखिम असते व कर्जरोख्याशी निगडीत योजनांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या कमी जोखिम असते. ह्या क्षेत्रात ४% पर्यंत गुंतवणूक ठेवू शकता.
१०. सोने फिजिकल किंवा ईटिएफ - भारतीयांमध्ये सोन्याबद्दल विशेष आकर्षण आहे. प्रत्येक सणासुदीला भारतीयांकडून सोन्याची जोरदार खरेदी केली जाते. सोने अलंकार म्हणून ठेवण्यात काहीच हरकत नाही पण जेव्हा आपण तेच सोने बाजारात विक्री साठी नेतो तेव्हा आपल्याला बाजार भावापेक्षा कमी किंमत  मिळते हे देखील लक्षात ठेवले पाहिजे. सोने जर आपण फिजिकल स्वरुपात ठेवले तर ते चोरी होण्याची शक्यता असते . तेच आपण ईटीएफ स्वरुपात डीमट ख्यातात सुरक्षित ठेवू शकतो. त्यामुळे ह्या क्षेत्रात ५% गुंतवणूक ठीक आहे .
११. चांदी -  भारतीयांना चांदी घेण्यामध्ये पण विशेष रस आहे. पण चांदी मध्ये पण अलंकार म्हणून गुंतवणूक ठीक आहे. गेल्या एका वर्षात जरी चांदीच्या किंमती मध्ये रु सुमारे ३००००  ते ६५००० असा  चढ-उतार झाला असला तरी ह्यात ३%  गुंतवणूक करणे ठीक आहे.
वरील चर्चिलेल्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये प्रत्येक जन आपल्या गरजेनुसार चढ उतार करू शकतो.
Copy rights  Reserved –Marathi Shyear Bajar