Saturday, March 09, 2013

मुंबई लोकल

मला आजही तो दिवस चांगला आठवतो. मी लहान असताना आम्ही एकदा विख्रोळी वरून डोंबिवलीला आमच्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी धीमी लोकल पकडली होती व मला खिडकी जवळ उभे राहण्याची संधी मिळाली होती, जशी आजही लहान मुलांना मिळते. तेव्हा आमच्याच लोकल बरोबर तेज मार्गावरून एक मालगाडी चालली होती. विशेष म्हणजे आमची ट्रेन स्थानकावर थांबली कि ती मालगाडी पुढे जायची व पुन्हा आमची ट्रेन त्या मालगाडीला मागे टाकून पुढच्या स्थानकावर पोचायची. तर अशी हि शर्यत डोंबिवली स्थानका पर्यंत सुरु होती. तर हा प्रसंग आठवला कि पटकन लक्षात येतो तो वेग. तेव्हा धीमी लोकल मुंबई ते डोंबिवली हे अंतर एक तास ४० मिनिटांमध्ये पूर्ण करायची. अर्थात मी जेव्हा जुलै १९९९ पासून प्रवासाला सुरुवात केली तेव्हा हेच लोकल १ तास ३० मिनिटांमध्ये पूर्ण करत होती. पण २००२ पासून तेच अंतर लोकल १ तास २० मिनिटांमध्ये पूर्ण करत आहे.




पूर्वी या लोकल प्रवासात एक वस्तुस्थिती अशी होती कि लोक लोकलच्या दरवाजाचा वापर समान पद्धतीत करत असत, म्हणजेच दरवाज्याच्या एका अर्ध्या बाजूने चढत असत व दुसर्या अर्ध्या बाजूने उतरत असत. तसेच पूर्वी लोक चोवथ्या सीट वर पण बसण्यास देत असत. खर म्हणजे लोकल या शब्दाचा अर्थच असा कि, लोकल प्रवाश्यांनी लोकल पद्धतीने प्रवास करावा.

पण काळाच्या ओघात बरेच बदल घडत गेले. रुळांखाली लाकडी स्लीपर्स जाऊन आता सिमेंट चे स्लीपर आले आहेत. आता लोकल पण आतून हवेशीर झालेल्या आहेत. पण त्याच बरोबर काही चुकीच्या गोष्टींची पण प्रथा पडत आलेली आहे. आता चार टाळकी मिळून लोकलचा अर्धा दरवाजा खास करून सकाळ व संध्याकाळी गर्दीच्या वेळी अडवून बसतात. त्यामुळे प्रत्येक स्थानकांवर चढणारे व उतरणारे यांच्यामध्ये जीवघेणी स्पर्धा रंगते. यातून हेच दिसते कि, जनसामान्यांची गुलामगिरी करण्याची मानसिकता अजून संपलेली नाही. आता तर प्रत्येक स्थानकावर चढ उतार करणारे सुमारे २५-३० जन त्या चार पाच लोकांच्या अधीन असतात. याच्या मुळे होत असा कि बदलापूर, आसनगाव, कर्जत अश्या पुढे जाणार्या प्रवाश्यांना कधी कधी लोकल चुकते, व परत त्यांना अर्धा ते पाऊन तास वाट बघावी लागते.

या मुंबई लोकल मध्ये बर्याच गोष्टी बघायला व ऐकायला मिळतात. अगदी नाश्ताच्या रेसीपे पासून ते दहशत वादि हल्ल्यापर्यंत. पूर्वी तेज व धीमी लोकल मध्ये एक पद्धत होती कि मुंबई वरून बसलेला माणूस घाटकोपर ते ठाण्या पर्यंत उठून दुसर्यास बसण्यासाठी जागा देत असत. हि पद्धत पण आता कमी होत चालली आहे.

पण एक गोष्ट अजूनही पाळली जाते ती म्हणजे पुरुष डब्यात आलेल्या स्त्रियांना लगेच बसण्यासाठी जागा दिली जाते. तर अशी हि मुंबई लोकल सतत धावत असते, अगदी पूल कोसळून, बॉम्बस्फोट होऊन सुद्धा. लाखो लोकांना त्यांची रोजी रोटी मिळवून देण्यासाठी. एक मात्र खर कि मुंबई लोकल धावली नाही तर मुंबई पण धावू शकत नाही. कारण एका सर्वे नुसार मुंबई तील उद्योग धंदे चालविण्य मध्ये ८०% लोक हे खोपोली - कसारा ते ठाण्या पर्यंतचे आहेत.

तर अश्या या मुंबई - लोकलचा विस्तार खालील दहा विभागात पसरलेला आहे -

१. मुंबई छत्रपति शिवाजी टर्मिनस ते कसारा व खोपोली - मध्य रेल्वे.

२. चर्चगेट ते विरार - डहाणू - पच्शिम रेल्वे.

३. मुंबई छत्रपति शिवाजी टर्मिनस ते पनवेल व अंधेरी - हार्बर रेल्वे.

४. ठाणे ते वाशी व पनवेल - ट्रांस हार्बर रेल्वे.

५. बोइसर, डहाणू कोपर मार्गे ते दिवा, पनवेल - नॉन सबअर्बन रूट.

६. कल्याण ते वाशी, पनवेल - प्रस्तावित

७. बदलापूर ते कल्याण भिवंडी मार्गे विरार, बोरीवली - प्रस्तावित

८. भिवंडी, मुरबाड, बदलापूर, पनवेल ते कल्याण रिंग रूट - मोनो रेल प्रस्तावित

९. अंधेरी ते घाटकोपर, मानखुर्द - मेट्रो रेल प्रगती पथावर

१०. कर्जत खोपोली मार्गे पनवेल - वाहतूक सुरु.

उगाच नाही मुंबई लोकल ला मुंबईची जीवनवाहिनी म्हटलं जात....

No comments: