बास्केटबॉल तसा मैदानात खेळायचा खेळ... इथं मैदान कुठेच नव्हतं. दहा बाय वीसच्या जागेत एका भिंतीवर बास्केट टांगलेला... आणि विनोद गोल करण्यासाठी सज्ज... एक पाय मागे करून शक्य तितका हातांवर जोर दिला ... बॉल फेकला आणि हा गोल... तिथून पंचांचा निर्णय. हा सामना रंगलेला पॅराप्लेजिक फाऊंडेशनच्या स्पोर्ट इव्हेंटमध्ये.
एखाद्या कामाविषयी जिद्द असेल तर ते काम कितीही अवघड असले तरी लीलया पेलता येते. याच ध्यासाने पछाडलेल्या पॅराप्लेजिक फाऊंडेशनने नुकतेच आय कॅन आय विल या टॅगलाईनअंतर्गत व्हिलचेअर्स गेम आयोजित केले होते. पॅराप्लेजिक... सर्वसामान्यांना ही संज्ञा कळणारी नसली तरी त्या खास लोकांसाठी समाजाने वापरलेला हा सोफिस्टिकेटेड शब्द.
अपंग व्यक्तींचा त्यांच्या कुटुंबीयांवर पर्यायाने समाजावर पडलेला भार पॅराप्लेजिक फाऊंडेशनने हलका केला आहे. १५ वर्षांपासून पुढे असलेले पॅराप्लेजिक पेशंट्स इथे येऊन आपल्या आजारावर शारीरिक तसेच मानसिक उपचार घेऊ शकतात. आजारावर उपचार करता करता त्या आजारावर मोठ्या धैर्याने मात करण्यासाठी मानसिक बळही वाढायला हवे, यासाठी या फाऊंडेशनतर्फे दरवर्षी स्पोर्ट्स घेतले जातात. यामध्ये व्हिलचेअर, सायकल रेस, डार्टस, बास्केट बॉल, स्टम्प हिट, थ्रो बॉल असे गेम असतात. यानिमित्त देशभरातून हे खेळ खेळण्यासाठी अपंग व्यक्ती एकत्र येतात. त्यांचा आत्मविश्वास बळावतो आणि जगाचा सामना करण्यासाठी तयार होतात... बस्स आणखी काय हवंय! अशी भावना व्यक्त केली या फाऊंडेशनच्या फाऊंडर सुलभा वर्दे यांनी. यावर्षीही घेण्यात आलेल्या स्पोर्टस् इव्हेंटमध्ये सोलापूर, नागपूर, अलाहाबाद अशा विविध ठिकाणहून सुमारे तीनशेहून अधिक रुग्ण सहभागी झाले होते.
संस्थेतर्फे दरवर्षी क्रीडाक्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्या पॅराप्लेजिक रुग्णांना पुरस्कार देण्यात येतो. यंदाही जिगर हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये पॅराप्लेजिक फाऊंडेशनच्या शॅम्स शेख या जलतरणपटू मुंबईकराची निवड झाली आहे.
‘अपंगांशी वागताना आपल्यातलंच एक समजून वागलं तर ते त्यांच्या भावना व्यक्त करतात. त्यांचे खेळ घेताना वेगळ्या प्रशिक्षणाची गरज नसते. त्यांना हवं तिथे ते मुक्तछंदाने वावरतात आणि त्यातूनचं सावरायला शिकतात. त्यातून मिळालेल्या आयुष्याचा आनंद कसा घ्यायचा हे ही त्यांना कळतं.’
- गॉस्पी कापाडीया क्रीडा प्रशिक्षक
सौजन्य :- फुलोरा, सामना 0२०३१३

No comments:
Post a Comment