Saturday, March 09, 2013

मुंबई लोकल

मला आजही तो दिवस चांगला आठवतो. मी लहान असताना आम्ही एकदा विख्रोळी वरून डोंबिवलीला आमच्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी धीमी लोकल पकडली होती व मला खिडकी जवळ उभे राहण्याची संधी मिळाली होती, जशी आजही लहान मुलांना मिळते. तेव्हा आमच्याच लोकल बरोबर तेज मार्गावरून एक मालगाडी चालली होती. विशेष म्हणजे आमची ट्रेन स्थानकावर थांबली कि ती मालगाडी पुढे जायची व पुन्हा आमची ट्रेन त्या मालगाडीला मागे टाकून पुढच्या स्थानकावर पोचायची. तर अशी हि शर्यत डोंबिवली स्थानका पर्यंत सुरु होती. तर हा प्रसंग आठवला कि पटकन लक्षात येतो तो वेग. तेव्हा धीमी लोकल मुंबई ते डोंबिवली हे अंतर एक तास ४० मिनिटांमध्ये पूर्ण करायची. अर्थात मी जेव्हा जुलै १९९९ पासून प्रवासाला सुरुवात केली तेव्हा हेच लोकल १ तास ३० मिनिटांमध्ये पूर्ण करत होती. पण २००२ पासून तेच अंतर लोकल १ तास २० मिनिटांमध्ये पूर्ण करत आहे.




पूर्वी या लोकल प्रवासात एक वस्तुस्थिती अशी होती कि लोक लोकलच्या दरवाजाचा वापर समान पद्धतीत करत असत, म्हणजेच दरवाज्याच्या एका अर्ध्या बाजूने चढत असत व दुसर्या अर्ध्या बाजूने उतरत असत. तसेच पूर्वी लोक चोवथ्या सीट वर पण बसण्यास देत असत. खर म्हणजे लोकल या शब्दाचा अर्थच असा कि, लोकल प्रवाश्यांनी लोकल पद्धतीने प्रवास करावा.

पण काळाच्या ओघात बरेच बदल घडत गेले. रुळांखाली लाकडी स्लीपर्स जाऊन आता सिमेंट चे स्लीपर आले आहेत. आता लोकल पण आतून हवेशीर झालेल्या आहेत. पण त्याच बरोबर काही चुकीच्या गोष्टींची पण प्रथा पडत आलेली आहे. आता चार टाळकी मिळून लोकलचा अर्धा दरवाजा खास करून सकाळ व संध्याकाळी गर्दीच्या वेळी अडवून बसतात. त्यामुळे प्रत्येक स्थानकांवर चढणारे व उतरणारे यांच्यामध्ये जीवघेणी स्पर्धा रंगते. यातून हेच दिसते कि, जनसामान्यांची गुलामगिरी करण्याची मानसिकता अजून संपलेली नाही. आता तर प्रत्येक स्थानकावर चढ उतार करणारे सुमारे २५-३० जन त्या चार पाच लोकांच्या अधीन असतात. याच्या मुळे होत असा कि बदलापूर, आसनगाव, कर्जत अश्या पुढे जाणार्या प्रवाश्यांना कधी कधी लोकल चुकते, व परत त्यांना अर्धा ते पाऊन तास वाट बघावी लागते.

या मुंबई लोकल मध्ये बर्याच गोष्टी बघायला व ऐकायला मिळतात. अगदी नाश्ताच्या रेसीपे पासून ते दहशत वादि हल्ल्यापर्यंत. पूर्वी तेज व धीमी लोकल मध्ये एक पद्धत होती कि मुंबई वरून बसलेला माणूस घाटकोपर ते ठाण्या पर्यंत उठून दुसर्यास बसण्यासाठी जागा देत असत. हि पद्धत पण आता कमी होत चालली आहे.

पण एक गोष्ट अजूनही पाळली जाते ती म्हणजे पुरुष डब्यात आलेल्या स्त्रियांना लगेच बसण्यासाठी जागा दिली जाते. तर अशी हि मुंबई लोकल सतत धावत असते, अगदी पूल कोसळून, बॉम्बस्फोट होऊन सुद्धा. लाखो लोकांना त्यांची रोजी रोटी मिळवून देण्यासाठी. एक मात्र खर कि मुंबई लोकल धावली नाही तर मुंबई पण धावू शकत नाही. कारण एका सर्वे नुसार मुंबई तील उद्योग धंदे चालविण्य मध्ये ८०% लोक हे खोपोली - कसारा ते ठाण्या पर्यंतचे आहेत.

तर अश्या या मुंबई - लोकलचा विस्तार खालील दहा विभागात पसरलेला आहे -

१. मुंबई छत्रपति शिवाजी टर्मिनस ते कसारा व खोपोली - मध्य रेल्वे.

२. चर्चगेट ते विरार - डहाणू - पच्शिम रेल्वे.

३. मुंबई छत्रपति शिवाजी टर्मिनस ते पनवेल व अंधेरी - हार्बर रेल्वे.

४. ठाणे ते वाशी व पनवेल - ट्रांस हार्बर रेल्वे.

५. बोइसर, डहाणू कोपर मार्गे ते दिवा, पनवेल - नॉन सबअर्बन रूट.

६. कल्याण ते वाशी, पनवेल - प्रस्तावित

७. बदलापूर ते कल्याण भिवंडी मार्गे विरार, बोरीवली - प्रस्तावित

८. भिवंडी, मुरबाड, बदलापूर, पनवेल ते कल्याण रिंग रूट - मोनो रेल प्रस्तावित

९. अंधेरी ते घाटकोपर, मानखुर्द - मेट्रो रेल प्रगती पथावर

१०. कर्जत खोपोली मार्गे पनवेल - वाहतूक सुरु.

उगाच नाही मुंबई लोकल ला मुंबईची जीवनवाहिनी म्हटलं जात....

Sunday, March 03, 2013

सलाम - आय कॅन आय विल

बास्केटबॉल तसा मैदानात खेळायचा खेळ... इथं मैदान कुठेच नव्हतं. दहा बाय वीसच्या जागेत एका भिंतीवर बास्केट टांगलेला... आणि विनोद गोल करण्यासाठी सज्ज... एक पाय मागे करून शक्य तितका हातांवर जोर दिला ... बॉल फेकला आणि हा गोल... तिथून पंचांचा निर्णय. हा सामना रंगलेला पॅराप्लेजिक फाऊंडेशनच्या स्पोर्ट इव्हेंटमध्ये.


एखाद्या कामाविषयी जिद्द असेल तर ते काम कितीही अवघड असले तरी लीलया पेलता येते. याच ध्यासाने पछाडलेल्या पॅराप्लेजिक फाऊंडेशनने नुकतेच आय कॅन आय विल या टॅगलाईनअंतर्गत व्हिलचेअर्स गेम आयोजित केले होते. पॅराप्लेजिक... सर्वसामान्यांना ही संज्ञा कळणारी नसली तरी त्या खास लोकांसाठी समाजाने वापरलेला हा सोफिस्टिकेटेड शब्द.

अपंग व्यक्तींचा त्यांच्या कुटुंबीयांवर पर्यायाने समाजावर पडलेला भार पॅराप्लेजिक फाऊंडेशनने हलका केला आहे. १५ वर्षांपासून पुढे असलेले पॅराप्लेजिक पेशंट्स इथे येऊन आपल्या आजारावर शारीरिक तसेच मानसिक उपचार घेऊ शकतात. आजारावर उपचार करता करता त्या आजारावर मोठ्या धैर्याने मात करण्यासाठी मानसिक बळही वाढायला हवे, यासाठी या फाऊंडेशनतर्फे दरवर्षी स्पोर्ट्स घेतले जातात. यामध्ये व्हिलचेअर, सायकल रेस, डार्टस, बास्केट बॉल, स्टम्प हिट, थ्रो बॉल असे गेम असतात. यानिमित्त देशभरातून हे खेळ खेळण्यासाठी अपंग व्यक्ती एकत्र येतात. त्यांचा आत्मविश्‍वास बळावतो आणि जगाचा सामना करण्यासाठी तयार होतात... बस्स आणखी काय हवंय! अशी भावना व्यक्त केली या फाऊंडेशनच्या फाऊंडर सुलभा वर्दे यांनी. यावर्षीही घेण्यात आलेल्या स्पोर्टस् इव्हेंटमध्ये सोलापूर, नागपूर, अलाहाबाद अशा विविध ठिकाणहून सुमारे तीनशेहून अधिक रुग्ण सहभागी झाले होते.

संस्थेतर्फे दरवर्षी क्रीडाक्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या पॅराप्लेजिक रुग्णांना पुरस्कार देण्यात येतो. यंदाही जिगर हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये पॅराप्लेजिक फाऊंडेशनच्या शॅम्स शेख या जलतरणपटू मुंबईकराची निवड झाली आहे.

‘अपंगांशी वागताना आपल्यातलंच एक समजून वागलं तर ते त्यांच्या भावना व्यक्त करतात. त्यांचे खेळ घेताना वेगळ्या प्रशिक्षणाची गरज नसते. त्यांना हवं तिथे ते मुक्तछंदाने वावरतात आणि त्यातूनचं सावरायला शिकतात. त्यातून मिळालेल्या आयुष्याचा आनंद कसा घ्यायचा हे ही त्यांना कळतं.’

- गॉस्पी कापाडीया क्रीडा प्रशिक्षक
सौजन्य :- फुलोरा, सामना 0२०३१३ 

पाला’वरचं चिकन

हिंदुस्थानी बैठक, झणझणीत जुन्नरी चिकन रस्सा, आळणी चिकन, चिकन मसाला, ज्वारी, बाजरीची भाकरी, चपाती, जोडीला कांदा अन् लिंबू असं पोटभर जेवण, तेही हॉटेल आणि ढाब्याच्या तुलनेत अगदीच स्वस्त. ग्रामीण ढंगाची अवीट चव असलेले जुन्नर तालुक्यातील पूर्वभागातील बेल्हे गावच्या ‘पालांवरचं चिकन’ पुण्या-मुंबईसह ग्रामीण भागातील खवैयांच्या तोंडाला पाणी आणत आहे.


मुंबई-विशाखापट्टनम राष्ट्रीय महामार्गावर आळेफाट्यापासून पूर्वेकडे १५ किमी अंतरावर असलेल्या बेल्हे हे गाव राज्यातील एक प्रमुख बैल बाजार म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे ७० वर्षांपूर्वी दर सोमवारी बैल बाजार सुरू झाला. या बाजारात येणार्‍या लोकांसाठी ‘पालं’ लावून जेवण बनविणे सुरू झाले. ते आजतागायत सुरू आहे. बाजारात येणार्‍या शेतकर्‍यांना कमीत कमी दरात सर्वोत्तम गुणवत्तेची सेवा देण्याची परंपरा आम्ही पुढे नेत असल्याचे अशोक हिंद खानावळीचे मालक बबनराव बांगर सांगतात.

मांसाहारी जेवणासह शाकाहारी जेवणाची सोय असलेली ही ‘पालं’ दर रविवार आणि सोमवारी सुरू असतात. हा बैल बाजार असल्याने येथे फक्त चिकनच जेवणात दिले जाते. खास जुन्नरी पद्धतीचा घरगुती मसाला, रश्श्याला घट्टपणा येण्यासाठी भाजलेला कांदा, आले, कोथिंबीरची दगडी पाट्यावर वाटून केलेली पेस्ट वापरण्यात येते. चुलीवरची खरपूस भाकरी असल्याने जेवण्याची लज्जत वाढते. खाणार्‍याला लागेल तेवढा रस्सा देण्यात येतो. हिंदुस्थानी बैठकीमध्ये जेवणासाठी एका वेळी तीस ते चाळीस लोक जेवायला बसतात. त्यामुळे जेवताना घरात बसून घरचे जेवल्यासारखं वाटतं. पोटभर जेवण झाल्यांनतरही रश्याच्या फुरका मारण्याचा मोह आवरत नाही.

सौजन्य - अमोल कुटे, फुलोरा, सामना  0२० ३१ ३