Monday, October 08, 2012

आठवी खिडकी

जगभरातील तमाम टेक प्रेमी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होते ती मायक्रोसॉफ्टची विंडोज ८ही संगणकप्रणाली लवकरच सादर होणार आहे
गेल्या वीस वर्षापासून जगातील ९० टक्के संगणक प्रेमींचे आजही मायक्रोसॉफ्टची विंडोजवर जीवापाड प्रेम आहे त्यामुळे जगातील कोणतीच दुसरी संगणक प्रणाली अजूनही मायक्रोसॉफ्टची विंडोज चे स्थान घेऊ शकली नाही. जसे शाळेत गेल्यावर लहान मुलगा अ ब क ची बाराखडी सर्वात पहिले शिकतो अगदी तसंच कोणीही संगणक वापरायला लागल्यावर सर्वात पहिले मायक्रोसॉफ्टची विंडोज, वर्ड, एक्सल, पहिले शिकतो म्हणजेच संगणकाची पहिली पायरी ही मायक्रोसॉफ्टची विंडोजनेच सुरू होते आणि हेच मायक्रोसॉफ्टची विंडोज चे सर्वात मोठे यश आहे. जगातील कोणतेही सोफ्टवेअर सर्वात पहिले मायक्रोसॉफ्ट विंडोजसाठी लिहिले जाते मायक्रोसॉफ्टची विंडोज ८ ही संगणकप्रणालीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही संगणक प्रणाली युनिव्हर्सल प्रणाली असणार आहे म्हणजेच संगणक, मोबाईल, आणि टॅबलेट या सर्व डिजीटल गोष्टीवर ही प्रणाली चालणार आहे.
५. इतर वैशिष्ट्ये - विंडोजसाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर डाऊनलोड करता येऊ शकतात
- पिक्चर पासवर्डची सोय
- USB ३.० ची सोय
- संगणक रिफ्रेश करण्यासाठी वेगळी सोय
- चागले गेम्स चांगला आणि सोप्पा युसर इंटरफेस
एका दगडात अनेक पक्षीमायक्रोसॉफ्ट विंडोज ८ द्वारे एका दगडात अनेक पक्षी मारणार आहे एकीकडे त्यांना मोबाईल मार्केट मधील अन्द्रोईड आणि गुगल चे स्थान कमी करायचे आहे तर दुसरीकडे त्यांना सरळ सरळ ऍपलला आपल्या नवीन टॅबलेट सरफेस ने आव्हान द्यायचा प्रयत्न करायचा आहे, आणि मायक्रोसॉफ्ट सरफेस ची वैशिठे बघितल्यावर असे वाटत आहे कि कदाचित ऍपलला आपल्या क्रांतिकारी आय-प्याड मध्ये काहीतरी मोठे बदल करावे लागतील नाहीतर संगानकाप्रमाणेच मायक्रोसॉफ्ट विंडोज ८ द्वारे टॅबलेट मध्ये पण आपला झेंडा रोवू शकतो.
विंडोज ८ ची वैशिष्ट्ये- युनिव्हर्सल प्रणाली : संगणक, मोबाईल, आणि टॅबलेट ही सर्व डिजीटल गोष्टीवर ही प्रणाली चालणार आहे
- टच स्क्रीनची मजा : आता तुम्ही संगणकवर देखील टच स्क्रीनची मजा लुटू शकता आणि हे विंडोज ८ चे सर्वात मोठे किलर वैशिष्ट्य आहे, त्याचबरोबर मोबाईल, आणि टॅबलेट या सर्व डिजीटल गोष्टीवरदेखील आपल्याला टच स्क्रीनची मजा मिळू शकेल.
- इंटरनेट एक्स्प्लोरर १० : विंडोज ८ मध्ये मायक्रोसॉफ्टचे नवीन इंटरनेट एक्स्प्लोरर १० चा समावेश करण्यात आला आहे हे इंटरनेट ब्राऊजर अतिशय वेगवान आणि सुरक्षित आहे व इंटरनेट एक्स्प्लोरर १० मुळे आपला इंटरनेट वापराचा आनंद द्विगुणित होणार आहे.
- टाइल्स ची मजा : मोबाईल प्रमाणेच आता विंडोज ८ मध्ये टाइल्स देण्यात आल्या आहेत ज्याचा वापर करून तुम्ही कोणताही प्रोग्राम थेट त्या प्रोग्रामच्या टाइल्सवर क्लिक करून वापरू शकता.


सौजन्य:- फुलोरा, सामना ०६१०२०१२

Tuesday, October 02, 2012

कॉम्प्युटर म्हणी......

कॉम्प्युटर म्हणी......
चार दिवस हार्डडिस्कचे चार दिवस सी.डी.चे!
- (नेटवर्किंगमध्ये) सेलेरॉनशेजारी पेंटियम बांधला, स्पीड नाही पण व्हायरस वाढला!
- सीडींचा बाजार, व्हायरसांचा सुकाळ!
- वरून पेंटियम आतून फोर-एट-सिक्स!
- हार्डडिस्कमध्ये नाही ते फ्लॉपीत कोठून येणार!
- घरोघरी मायक्रोसॉफ्टच्याच विंडो!
- सॉफ्टवेअर नको पण व्हायरस आवर!
- हा मदरबोर्ड नि हा प्रोसेसर!
- मंदाळ डॉट-मॅट्रिक्सला खडखडाट फार!
- यथा ऑपरेटर तथा कॉम्प्युटर!

सौजन्य:- फुलोरा, सामना २९०९२०१२

पृथ्वीचे प्रेमगीत

सर्वात उष्ण, थंड, ओलसर व कोरडे प्रदेश
दलोल, देनाकिल डिप्रेशन, इथिओपिया,
- सर्वात उष्ण प्रदेश : दलोल, देनाकिल डिप्रेशन, इथिओपिया, वार्षिक सरासरी तापमान (९३.२०
F, ३४०C)
- सर्वात थंड जागा : पहाडी मैदान (प्लॅटियू), अंटार्क्टिका, वार्षिक सरासरी तापमान (-५६.७०
C)
- सर्वात कोरडी/ शुष्क जागा : अटाकामा (डिजर्ट), रेगिस्तान, चिली
इथे वर्षात कधीही पाऊस पडतो. विशेष असा कालावधी सांगता येत नाही.
सर्वात ओलसर पावसाळी जागा : मॉसिनराम, आसाम, हिंदुस्थान. वार्षिक सरासरी पाऊस (११,८७३ मिलिमीटर, ४६७.४")
सौजन्य :- फुलोरा, सामना २९०९२०१२

ई-स्टोअरेज

आज आपल्याकडे संगणकातील किंवा कोणत्याही डिजिटल उपकरणातील ‘डेटा’ अर्थात ‘माहिती’ साठवून ठेवण्यासाठी असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. आल्याकडील माहिती किंवा टेटा हा कोणत्याही स्वरूपात असू शकतो. डेटा किंवा माहिती ही मुख्यत्वे तीन प्रकारे विभागली गेली आहे व ती म्हणजे वैयक्तिक किंवा कार्यालयीन माहिती असे वर्ड/एक्सेल/पॉवरपॉईंट किंवा पीडीएफ व इतर प्रकारची माहिती, मीडिया माहिती जसे गाणे, व्हिडीओ किंवा डिजिटल कॅमेरा किंवा तत्सम माहिती व व्हॉईस व इतर जसे विविध व्हॉईस रेकॉर्डिंग्स किंवा आवाजसदृश इतर डेटा ही सर्व माहिती साठवण्यासाठी आपण संगणकातील हार्ड डिस्क, सीडी किंवा डिव्हीडी रोम, पेन ड्राईव्ह किंवा अगदी मोबाईलमधील मेमरी कार्ड अशा असंख्य गोष्टींचा वापर करतो. पारंपरिक प्रकारचा डेटा साठवण्याच्या पद्धतीमध्ये कोणतेही वेगळे साधन घेण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात व त्याचबरोबर पारंपरिक डेटा स्टोअरेज पद्धतीमध्ये अनेक तोटेदेखील आहेत, जसे जर आपला संगणक किंवा मोबाईल अचानक क्रॅश झाला तर आपली सर्व महत्त्वपूर्ण माहिती ‘वॉश ऑऊट’ अर्थात नाहीशी होण्याची शक्यता असते व ही माहिती काहीही असू शकते ती तुमची महत्त्वाची कागदपत्रेदेखील असू शकतात किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत सहलीला गेलेल्या सुंदर ठिकाणाचे फोटो अगदी अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांची आपल्या आवडीच्या गाण्यांच्या कलेक्शनचा केलेला संच व एकदा का ही माहिती नाहीशी झाली की मात्र ती परत मिळण्याची सुतराम शक्यता नसते. अशा सर्व अनेक अडचणींवर ‘ई-स्टोरेज’ हा सर्वोत्तम पर्याय आहे.
ई-स्टोरेजचे फायदे
- ई-स्टोअरेज म्हणजे आपली महत्त्वपूर्ण माहिती. मग ती कोणत्याही स्वरूपातील असो ती इंटरनेटचा वापर करून ई-स्टोअरेज पुरवणार्‍या कोणत्याही संकेतस्थळावर साठवून ठेवणे. ई-स्टोअरेज पुरवणारी शंभराहूनही अधिक अतिशय चांगली संकेतस्थळे सध्या इंटरनेटवर उपलब्ध आहेत जिथे आपण अगदी क्षणार्धात आपला डेटा स्टोअर करू शकतो व त्यासाठी काहीही पैसे खर्च करायची गरज पडत नाही.
- ई- स्टोअरेजचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण कोणत्याही संकेतस्थळावर साठवून ठेवलेली माहिती कधीही व कुठेही म्हणजेच जगातील कोणत्याही ठिकाणी वापरू शकतो व त्यासाठी आपणास फक्त इंटरनेटची गरज असते. म्हणजेच जर आपण सुट्टीसाठी बाहेरगावी गेला आहात व आपणास आपल्या घरातील संगणकावरील एखादी फाईल हवी असेल व ती फाईल आपण ई-स्टोअर केली असेल तर फक्त इंटरनेटवरून ती फाईल डाऊनलोड करून आपण ती वापरू शकतो.
- ई-स्टोअरेजमधील अजून एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट म्हणजे आपण आपला डेटा बॅकअप, डिलीट, दुसरीकडे मुव्ह, कॉपी आणि महत्त्वाचे म्हणजे शेअर अर्थात आपली माहिती फक्त आपणा व्यतिरिक्त दुसरे कोणीही वापरू शकत नाही अशा प्रकारची सुरक्षिततादेखील देऊ शकतो.
- इनक्रिप्शन/डिक्रिप्शन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अगदी प्रत्येक फाईल किंवा फोल्डरला सुरक्षित असा पासवर्डदेखील देऊ शकतो. त्यामुळे आपणा व्यतिरिक्त आपला डेटा कोणीही वापरू शकत नाही. त्याचबरोबर ‘मॅनेज बडी’ नावाच्या प्रकारात आपण आपल्याच ओळखीच्या लोकांना आपल्या डेटा वापरण्यास परवानगी देऊ शकतो.
- ई-स्टोअरेजमुळे आपणास आपल्या माहितीची काळजी करावयाची गरज पडत नाही. कारण ई-स्टोअर सेवा पुरवणार्‍या सर्व संकेतस्थळाकडे परिपूर्ण अशी बॅकअप सुविधा असते व आपली माहिती अनेक ठिकाणी स्टोअर केली जाते. म्हणजेच जरी संकेतस्थळामधील एखाद्या ठिकाणावरील डेटा खराब किंवा ‘वॉश आऊट’ झाला तरी त्याचा व्यवस्थित बॅकअप असल्यामुळे आपला डेटा सुरक्षित असतो. बहुतांशी संकेतस्थळे अगदी १०० जीबीपर्यंत आपल्याकडील डेटा स्टोअर करण्याची सुविधा देतात.
मायक्रोसॉफ्ट स्काय ड्राईव्ह
मायक्रोसॉफ्ट स्काय ड्राईव्हवर आपण २५ जीबी डेटा स्टोअर करू शकतो व तो शेअरदेखील करू शकतो. जर आपणाकडे hotmail किंवा live.com चा ई-मेल ऍड्रेस असेल तर आपण तत्काळ ही सुविधा वापरू शकतो. अन्यथा आपणास http://skydrive.live.com या मायक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.
ही देखील फोटो स्टोअर व शेअर करणारी लोकप्रिय संकेतस्थळे आहेत.
Rapiodshare.com

डेटा शेअरिंगमधील सर्वात जास्त वापरले जाणारे संकेतस्थळ म्हणजे रॅपीड शेअर.
http://myotherdrive.com
या संकेतस्थळावर आपण फोटो, गाणी तसेच व्हिडिओ स्टोअर व शेअर करू शकतो.
http://b2.crashplan.com
आपल्या संगणकातील संपूर्ण डेटा ऑनलाइन बॅकअप करण्यासाठी इंटरनेटवरील हे एक सर्वोत्तम संकेतस्थळ आहे.
www.mp3tunes.com

आपल्याकडील श्झ्३ गाणे इंटरनेटवर स्टोअर व शेअर करणारे हे संकेतस्थळ आपणास आपली स्टोअर केलेली गाणी कोणत्याही डिजिटल उपकरणावर डाऊनलोड करण्याचे अनोखे वैशिष्ट्यदेखील पुरवते.
गुगलचे पिकासा फोटो असेच व्हिडिओ शेअरिंगमधील अग्रणीय संकेतस्थळ आहे.
सौजन्य :- फुलोरा, सामना २९०९२०१२