Saturday, June 09, 2012

वायरसचा ताप


कम्प्युटरवर काम करताना मध्ये मध्ये सतत एक विंडो ओपन होते ती म्हणजे ऍण्टी वायरसची... काम करताना याचा अडथळा होतो म्हणून त्यावेळी ती तापदायक वाटते पण हा ऍण्टी वायरस आपल्या कम्प्युटरमध्ये असणं तितकचं गरजेचं आहे. ऍण्टी वायरस कम्प्युटरच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असून इंटरनेटवर काम करताना याची अधिक गरज भासते.


इंटरनेट एक्सप्लोरर हा जगातली सर्व माहिती पुरविणारा ब्राउजर अशी याची ख्याती असली तरी सर्वच कम्प्युटर्सना व्हायरस पुरवणारा ब्राउजर अशी कुख्यातीही आहे. गुगल सारख्या साइट्सवरून माहिती शोधताना हे वायरस येतात. शिवाय सोशल नेटवर्कींग साईट, पॉपअप्स, इंटरनेट जाहिरातीतूनही हे वायरस येतात.

- वायरसमुळे कोणताही डेटा करप्ट होऊ नये म्हणून ऍण्टी व्हायरस सोल्यूशन कम्प्युटरमध्ये असावं लागतं. हा ऍण्टी वायरस नेहमी अपडेट करावे लागतात.

- याचे डाऊनलोडिंग इंटरनेटवरून करता येते. हे ऍण्टी वायरस इंटरनेटच्या साइट्सवरून फ्री घेता येतात.

- ऍविरा, एव्हीजी, नॉरटॉन, थ्रेटफायर, कास्कपर्सकी हे ऍण्टी वायरस इंटरनेटवरून डाऊनलोड करता येतात.

- ऍण्टी वायरस प्रत्येकवेळा ऍक्टीव करण्याची गरज नसते. एकदा डाऊनलोड केल्यावर ते केवळ अपडेट करावे लागतात.

- ऍण्टी वायरस सुमारे सहा महिन्यात अपडेट करावे लागतात. पण हे तो ऍण्टी वायरस कोणता आहे यावर अवलंबून आहे.

सौजन्य : फुलोरा, सामना

No comments: