विवेकानंद केंद्राने सामूहिक सूर्यनमस्कार घालून नुकताच जागतिक विक्रम केला. काही शाळांमधूनही नियमित सूर्यनमस्कार घालण्याचे शिक्षण दिले जाते. सूर्याच्या कोवळ्या उन्हात सूर्यनमस्कार घालण्यासारखा उत्कृष्ट व्यायाम नाही. त्याची सुरुवात करायला थंडीचा मुहूर्त उत्तम आहे.
आबालवृद्ध कोणीही स्त्री - पुरुषाने रोज किमान बारा तरी सूर्यनमस्कार घालावेत. शरीरातील सर्व नाड्या, मांसपेशी, स्नायू त्यामुळे पूर्णत: कार्यक्षम बनतात, रक्ताभिसरण सुधारते, पचनेंद्रिये, मज्जारज्जू यांचे कार्य/ आरोग्य सुधारते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीरावर साठलेली अनावश्यक चरबी कमी होऊन शरीर सुडौल होण्यास सूर्यनमस्कार हा एक रामबाण उपाय ठरतो.
श्वसनाच्या लयबद्धतेमुळे फुप्फुसे आणि हृदय अधिक कार्यक्षम बनतात. सकाळी कोवळ्या सूर्यकिरणात ओंकार आणि बीजमंत्रासह सूर्यनमस्कार घातल्यास शारीरिक लाभासोबत आध्यात्मिक लाभसुद्धा मिळतात.
एक सूर्यनमस्कार पूर्ण झाल्यावरच प्रणवयुक्त बीजमंत्रासह सूर्याच्या नावाचा उच्चार करावा. सूर्य हा चराचर सृष्टीचा आत्मा आहे, असे ऋग्वेदात म्हटले आहे. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात सूर्याचे सामर्थ्य वर्णन करून सांगितले की सूर्याचे नामोच्चारण, दर्शन आणि सकाळच्या किरणात घातलेले सूर्यनमस्कार यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्तींचा विकास होतो.
ॐ च्या उच्चारणाने हृदय आणि मेंदूला चालना मिळते. र्हीम् व र्हाम्च्या उच्चारणाने अपान वायू फेकला जाऊन श्वसनसंस्था अधिक कार्यक्षम बनते. र्हूंच्या उच्चारणाने पोट आणि ओटीपोटीतील अवयवांची कार्यक्षमता वाढते. र्हैम्च्या उच्चारणामुळे मूत्रसंस्था कार्यक्षम बनते. र्हौम्च्या उच्चारणाने मलाशयावर परिणाम होतो. र्ह:च्या उच्चारणाने कंट आणि छाती कार्यक्षम बनतात.
प्रणव आणि बीजमंत्रासह सूर्याची बारा नावे खालीलप्रमाणे -
१) ॐ र्हाम् मित्राय नम:
२) ॐ र्हीम् रवये नम:
३) ॐ र्हूम् सूर्याय नम:
४) ॐ र्हैम् भानवे नम:
५) ॐ र्हौम् खगाय नम:
६) ॐ र्ह: पुष्णे नम:
७) ॐ र्हाम् हिरण्यगर्भाय नम:
८) ॐ र्हीम् मरीचये नमऽ
९) ॐ र्हूम् आदित्याय नम:
१०) ॐ र्हैम् सवित्रे: नम:
११) ॐ र्हौम् अर्काय नम:
१२) ॐ र्ह: भास्कराय नम:
सूर्यनमस्कार ही विविध योगासनांनी गुंफलेली एक शृंखला आहे. त्यामधील प्रत्येक अवस्थेला विशिष्ट योगासनाचे नाव आहे.
स्थिती १ - शक्यतो पूर्व दिशेला तोंड करून दोन्ही पाय जोडून ताठ उभे राहावे. दोन्ही हात छातीच्या मध्यावर जोडून नमस्कार करावा. (नमस्कारासन)
स्थिती २ - जोडलेले हात श्वास घेत असताना डोक्याच्या वर घ्यावेत. पाठीचा कणा मागच्या दिशेला झुकवावा. (ऊर्ध्व नमस्कारासन)
स्थिती ३ - श्वास सोडत असताना पुढे वाकून तळहात पायाच्या बाहेरच्या बाजूला जमिनीवर ठेवावेत. पण गुडघे वाकवू नयेत. (पाद हस्तासन)
स्थिती ४ - श्वास घेत उजवा पाय मागे नेऊन चवडा व गुडघा जमिनीवर ठेवावा, मान झुकवून वर पाहावे. (अर्ध भुजंगासन)
स्थिती ५ - श्वास सोडत डावा पाय मागे घेऊन उजव्या पायाप्रमाणे ठेवावा, छाती व कपाळ जमिनीला टेकवावे. (अष्टांगासन)
स्थिती ६ - श्वास घेत डोके व छाती वर उचलून वर पाहावे. (भुजंगासन)
स्थिती ७ - श्वास सोडताना हात व पायाचे तळवे जमिनीवर ठेवून कंबर वर उचलावी. डोके जमिनीकडे ठेवावे. (अधोमुख श्वानासन)
स्थिती ८ - श्वास घेत डावा पाय पुढे आणून पाऊल दोन्ही हातांच्या मध्ये ठेवावे. (अर्धभुजंगासन)
स्थिती ९ - श्वास सोडत उजवा पाय पुढे आणून डाव्या पायासोबत ठेवावा, पुन्हा ओणवे व्हावे. (पादहस्तासन)
स्थिती १० - श्वास घेत उभे राहत स्थिती २ मध्ये यावे. (ऊर्ध्व नमस्कारासन)
स्थिती ११ - हात खाली आणताना श्वास सोडत पूर्वस्थितीमध्ये यावे. (नमस्कारासन)
अशा रीतीने ताण, बाक एकामागोमाग देऊन शरीर (विशेषकरून पाठीचा कणा) लवचिक ठेवण्यासाठी सूर्यनमस्काराला तोड नाही.
- मनोज सूर्यकांत वराडे

No comments:
Post a Comment