Thursday, May 10, 2018

स्वप्नातील घर : भाग ९ - रजिस्ट्रेशन प्रक्रिया

एवढे पत्र व्यवहार करून सुद्धा एक्सर्बिया ला काहीच फरक पडत नाही,, हे लक्षात आले व मग आम्ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया  पूर्ण करूया असं ठरवलं. 

४ जुलै, २०१७ रोजी ०२०-६५२६८९१७ ह्या क्रमांकावरून पत्नीच्या मोबाईल वर फोन आला, व पत्नीने १४ जुलै हि रजिस्ट्रेशन ची तारीख नक्की केली व त्या रेप्रेसेंटेटिव्ह ला सांगितले कि, सर्व डिटेल्स ई-मेल / एस एम एस करा. पण काहीच हालचाल आली नाही. आणि... १६ जुलै, २०१७ ला १८.२८ वाजता ०२२-६१३२७०३२ ह्या नंबर वरून मिस स्नेहा ने कॉल केला होता. त्यातील संभाषणाचा काही भाग :-

पत्नी :- तुमच्या पुणे ऑफिस मधून कॉल आला होता, १४ जुलै ला रजिस्ट्रेशन ठरले होते, पण काही हालचाल आली नाही.

स्नेहा :- ते आंम्हाला काही माहित नाही. तुम्हाला पुढच्या दोन दिवसात रजिस्ट्रेशन ला यावं लागेल.

पत्नी :- पण आम्हाला अजून काय डोकमेण्ट पाहिजे, रजिस्ट्रेशन साठी कुठे यायचे, विटनेस ना सोबत घेऊन येण्यासाठी ते हि उपलब्ध हवेत. २२ जुलै २०१७ ला येऊ का ?

स्नेहा :-  (मोठ्या आवाजात उद्धटपणे). तुम्हाला समजत नाही. मी तुम्हाला २१ जुलै, २०१७ अगोदर यायला सांगत आहे.

मग मात्र पत्नी माझ्या प्रमाणेच भडकली. तिलाही जाणवलं कि, एक्सर्बिया हे प्रोस्पेक्टिव्ह कस्टमर ना त्यांचे ग्राहक म्हणून नाहीतर, कर्जदार म्हणून वागवतात. मी पत्नीला म्हणालो, तिचे नाव विचार.

पत्नी :- (मोठ्या आवाजात). मी १४ जुलै २०१७ ला एक आठवडा अगोदर सुट्टी संकशन करून घेतली होती. तुमचे पुणे ऑफिस व नेरुळ ऑफिस काही असो. आम्ही एक्सर्बिया शी बोलत आहोत असे समजतो. आणि तुम्हाला सर्व डोकमेण्ट पाहिजे, दोन विटनेस पाहिजे हे तुमचे नियम आहेत. आम्ही काही रिकामे बसलेलो नाही. मी सोमवारी १७ जुलै २०१७ ला ऑफिस मध्ये जाऊन तारीख सांगते.

स्नेहा :- तुम्ही २१ जुलै २०१७ पर्यंत रजिस्ट्रेशन केले तर विटनेस आम्ही अरेन्ज करू. आधार कार्ड, पण कार्ड, ४ फोटो घेऊन या. अर्जदार व सह अर्जदाराचे डिटेल्स आणा.

पत्नी :- आम्ही १९ जुलै २०१७ ला येऊ, तरी पण कन्फर्म मी सोमवारी १७ जुलै ला ऑफिस मध्ये गेल्यावर सांगेन. 

त्या नुसार मग पत्नीने १७ जुलै ला संध्याकाळी मिस स्नेहा ला फोन करून कन्फर्म केले. मग १८ जुलै ला मिस स्नेहा ने पुणे ऑफिस मधला नंबर देऊन मग तिथे कॉन्टॅक्ट करायला सांगितले, त्या नुसार पत्नीने चार जणांना फोन केले व मग रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जो एक्सर्बिया चा रिप्रेसेंटेटीव्ह आहे त्याचा नाव, नंबर, रजिस्ट्रार ऑफिस चा पत्ता व डॉक्युमेंट लिस्ट मेसेज मध्ये पाठवायला सांगितले. ते सर्व डिटेल्स मग रात्री ९ च्या सुमारास १८ जुलै ला मोबाईल मध्ये आले.

त्या नुसार मग १९ जुलै ला ज्या प्रमाणे मिस स्नेहा ने जोर देऊन सांगितले होते कि, ९.३० वाजता पोहचायचे आहे, त्या प्रमाणे ट्रेन उपलब्धते प्रमाणे आम्ही ९.४५ ला कर्जत स्टेशन ला उतरलो. व कुणाल ला फोन करण्याचा ४ ते ५ वेळा प्रयत्न केला तेव्हा फोन वरून कसे पोचायचे ते विचारून घेतले. त्याचा वोडाफोन चा क्रमांक असल्याने पटकन लागत नाही. मग आम्ही कल्याण दिशेकडील कर्जत चा पश्चिमे कडील पूल उतरून रिक्षा पकडली रजिस्ट्रार ऑफिस करिता. स्पेशल रिक्षाने दोघांचे फक्त रु २०/- घेतले, तोच बदलापूर मध्ये दर रु ४०/- आहे, आणि बदलापूर रिक्षाने कारण दिलं असत कि पसेंजर मिळत नाही. आम्ही कर्जत च्या रेजिस्ट्रेशन ऑफिस ला पोचलो तिथे तर रस्ता संपतो, आणि पॅसेंजर ची संख्या पण नगण्य असते. आणि तिथून कर्जत शहराचे जे रमणीय दृश्य पावसाळ्यात दिसते ते बघण्यासाठी एकदा तरी त्या डोंगरावर प्रत्येकाने चालत गेले पाहिजे.  आम्ही परत येताना चालताच आलो. १२ मिनिटे लागली.

आम्ही १० वाजता दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात पोचलो. व कुणाल ला फोन केला तेव्हा त्याने फक्त बसायला सांगितले, पण रेजिस्ट्रेशन विंग ला जावे लागेल असे काही मिस स्नेहा ने सांगितले नव्हते. मग आम्ही मॅजिस्ट्रेट च्या कार्यालयाबाहेर बसून वाट पाहू लागलो. पुन्हा १०.३० च्या दरम्यान त्याला फोन केला, तेव्हा तो ट्रेन मध्ये होता. ११ ला पुन्हा फोन केला तेव्हा पुन्हा फोन लागत नव्हता. मग ११.१५ दरम्यान कुणाल भेटला व आम्हाला रजिस्ट्रेशन विंग ला घेऊन गेला, तिथे अगोदर पासून एक्सर्बिया चे प्रोस्पेक्टिव्ह कस्टमर बसलेले होते. मग ११.३० च्या दरम्यान तो रजिस्ट्रेशन चे सर्व  कागदपत्रे घेऊन आला. 

आमचे नाव कुणाल सोबत असलेल्या दुसऱ्या मुलाने पुकारले तेव्हा पब्लिक डेटा फॉर्म मधील डिटेल्स चेक करायला सांगितले, जसे नाव, पॅन, पत्ता, अग्रीमेंट वाल्ह्यू, वय वगैरे. त्यात आम्हाला लक्षात आले कि, वय व पत्ता टाकलेलाच नाही. ते आम्ही निदर्शनास आणून दिले. म्हणजे आम्ही एक्सर्बिया ला रेजिस्ट्रेशन फॉर्म दोन्ही ऑफिसेस ला पाठवून सुद्धा हि त्रुटी राहिली होती. मग अश्या प्रकारे सर्वांचे फॉर्म तो करेक्शन साठी दु १२.१५ च्या दरम्यान आत घेऊन गेला.  

त्याच वेळेला री-शेड्युल केलेले कस्टमर, म्हणजेच ज्यांचे रेजिस्ट्रेशन पुढे ढकलले होते, ते सुद्धा आले होते. त्यामुळे कुणाल व त्याच्या सोबत असलेल्यांची तारांबळ उडत होती. त्यामुळे मग त्या कस्टमर चे रेजिस्ट्रेशन पहिल्यांदा घेण्यात आले. आणि मग आमच्या प्रमाणे आलेले १९ जुलै चे सर्व कस्टमर वाट पाहत बसलो. 

त्या नंतर साधारण दु १.४५ च्या दरम्यान आम्हाला आवाज देण्यात आलो व कुणाल आम्हाला रेजिस्ट्रार च्या केबिन मध्ये घेऊन गेले. तिथे नुसता गोंधळ सुरु होता.. इतर बिल्डर चे पण कस्टमर उभे होते. मग दु २.१०  च्या दरम्यान रेजिस्ट्रार चा सर्वर डाउन झाला. मग काय पुन्हा २.३० ला लंच टाइम झाला, तो ३ वाजे पर्यंत. मग आम्ही सुद्धा थोडा नाश्ता करून आलो. मग ३.१० च्या दरम्यान पुन्हा आम्हाला केबिन मध्ये घेऊन गेले. तिथे मग फोटो काढण्यात आला व डाव्या अंगठ्याचे बायो मेट्रिक करण्यात आले व आम्हाला पुन्हा बाहेर थांबण्यास सांगण्यात आले. मग ५ मिनिटाने तो मुलगा सर्व सेट घेऊन आला, त्या दोघांचे पॅन कार्ड व आमच्या पॅन कार्ड चे झेरॉक्स एका पानावर ४ असे काढून आणायला सांगितले. तो पर्यंत पत्नीने अर्जदार म्हणून त्या सेट वर दाखवलेल्या जागेवर सही व अंगठा केला. मग मी हि झेरॉक्स आणून दिली व सह अर्जदार म्हणून सही व अंगठा केला.  आणि मग त्या मुलाने सर्व सह्या चेक करून  सांगितले आमचे रेजिस्ट्रेशन पूर्ण झाले. 

हुश्श... मग आम्ही सुटकेचा निश्वास टाकून दु ३.३० ला बाहेर पडलो, म्हणजे काही सह्या व अंगठ्या साठी ६ तास लागले. इथे "अच्छे दिन" अजून आले नाहीत वाटत.

क्रमश :
हि लेखमालिका स्व-अनुभवावर आधारित आहे. ह्यात कोणत्याही व्यक्ती वा संस्थेचा अपमान किंवा मानहानी किंवा जाहिरात करण्याचा हेतू नाही. पण आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाला स्वतःचे घर घेताना येणाऱ्या प्रक्रियांचा अनुभव व्हावा हाच उद्देश आहे. कारण, इतर कोणीही त्यांना घर घेताना काय प्रक्रिया करावी लागली व काय सतर्कता बाळगावी लागली हे दुसऱ्याला सांगत नाहीत. म्हणून वाटले आपल्या सोबत घडणाऱ्या घटना आपल्यासारख्याच इतरांना मार्गदर्शक ठरतील, म्हणून हा खटाटोप.

Monday, April 23, 2018

गंमत शाळा २०१८ अनुभव

गंमत शाळेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्ही पण अचंबित झालो. गंमत शाळेतील काही क्षणचित्रे पुढे मांडली आहेत.
 गंमत शाळेत फक्त बदलापूर च नव्हे तर, बऱ्याच वेग वेगळ्या ठिकाणाहून वेग वेगळ्या शाळांमधून विद्यार्थी आले होते. बघा वाट्सअँप वरून बनविलेली यादी. उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त होती.

योगी श्री अरविंद गुरुकुल चे कार्यवाह श्री. श्रीकांत देशपांडे आर्यानी गंमत शाळेचा शुभारंभ केला,
सहभागी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. 



मध्यान्ह भोजन (दुपारचे जेवण) जेवताना विद्यार्थी.
शाळेच्याच स्विमिन्ग पूल "वीर सावरकर तरण तलाव" मध्ये स्विमिन्ग सेशन (पोहण्याचा सराव) करताना विद्यार्थी.

प्रार्थना व ध्यानधारणा करताना विद्यार्थी.
वनभोजन - डोणे गाव, वांगणी पश्चिम, जिल्हा रायगड, महाराष्ट्र, भारत.








गंमत शाळा प्रमाणपत्र वाटप व समारोप सोहळा.













आमच्या पाल्याने गंमत शाळेत क्राफ्ट (डिजाईन) केलेली बॅग.

छायाचित्र सौजन्य :- सौ. दीप्ती शेलार, आयोजक
संपूर्णाधिकार सौजन्य :- योगी श्री अरविंद गुरुकुल, बदलापूर पु, जि. ठाणे, महाराष्ट्र, भारत.

Saturday, April 07, 2018

गंमत शाळा !!

नमस्ते 
पालक बंधुभगिनींनो,

योगी श्री अरविंद गुरुकुल, येथे संपन्न होत असलेल्या 'गंमतशाळेबाबत
*गंमत शाळा*  हे नावच इतकं साजेसं आहे की मुलं आणि गंमत हे  जणू काही समानार्थी शब्दच.

शाळा म्हटंलं की साचेबध्दपणा, शिस्त, कडक नियम, शिक्षा,अभ्यास, पाठांतर, स्पर्धा या सर्व गोष्टी आपोआपच आठवतात.

हे सर्व तर आवश्यक आहेच पण गंमतीतून हे सर्व मुलांच्या पर्यंत पोहचवता आलं तर कीत्ती छान...!

म्हणूनच 'गंमत शाळा'

गेल्या वर्षी पासून गंमत शाळेला सुरुवात झाली 
"हाती घ्याल ते तडीस न्याल" या उक्ती प्रमाणे अगदी एका वर्षातच हा उपक्रम लोकप्रिय झाला.

या वर्षी देखील १६ एप्रिल पासून गंमत शाळेला सुरुवात होत आहे.

मुलांच्या वार्षिक परीक्षा संपल्या की पालकांची चिंता सुरू होते. 
आता सुट्टीत करायचे काय? 
मोबाइल, टी व्ही आणि विडिओ गेम या पासून मुलांना लांब कसे ठेवायचे?
सतत नवीन काय करून द्यायचे?   
असे प्रश्न पडायला लागतात. या सर्व प्रश्नांच एकच उत्तर आणि ते म्हणजे 'गंमतशाळा ' 

नवनिर्मिती, निसर्ग, स्वावलंबन  आणि पोहण्याचा आनंद मनमुराद लुटणं हे गंमत शाळेचं वैशिष्ट्य!

विविध खेळांच्या माध्यमातून मुलांमधील सांघीक भावना (टीम स्पिरिट ) जागरूक करणं, नेतृत्व गुणांना वाव देणं, जिंकायला आणि हार मानायला शिकवणं हे मुख्य उद्दिष्ट्य.

बरोबरीने कला कार्यानुभवातुन स्वत: बनविलेल्या कलाकृतींचा आनंद घेणं हेही एक वैशिष्ट्यच.
या सोबतच एक दिवस सर्व मंडळी निसर्गाच्या सानिध्यात  वनभोजनाचा आनंद घेतील . 
तर एक दिवस क्षेत्र भेटीतुन एका कारखान्याला भेट देतील . 

पोहणे हा तर मुलांचा आवडता छंद. गंमत शाळेतली मुले रोज पोहणार!

या बरोबरच प्रार्थना, श्लोक,व्यायाम, नृत्य आणि बरंच काही....

दुपारच्या जेवणाची व्यवस्था गंमत शाळेतच सर्वांचं एकदम, एकसारखं आणि पूर्ण पौष्टिक आहार. 

संध्याकाळचा नाश्ता मुलांच्या मदतीनेच बनविला जाणार यातुन रोज नवीन पदार्थ बनविण्याचा आनंद...

मग पाठवायचं ना मुलांना  या गंमत शाळेला......

वयोगट - ३.५ वर्षे ते १० वर्षे

ठिकाण - 'योगी श्री अरविंद गुरुकुल', आपटेवाडी, शिरगाव, बदलापुर (पू.), जि. ठाणे, महाराष्ट्र, भारत.

कालावधी - १६ एप्रिल ते २५ एप्रिल २०१८

सकाळी - १०.०० ते सायं ५.००

शुल्क - रू २०००/- फक्त
(जेवण, नाश्ता, पिक अप ड्रॉप सुविधे सहित*) 

अधिक माहितीसाठी संपर्क  ९५९४२२९१९१
9594229191

Friday, April 06, 2018

घोकंपट्टी बंद !

बघा, आपण सर्व पालकांनी एसएससी SSC बोर्डावर विश्वास ठेवून आपल्या पाल्याला मराठी (सेमी-इंग्लिश) शाळेत टाकले.

कारण, आपण सर्व त्याच बोर्ड मधून शिकलो आहोत. आता सरकार ने पण पाऊल उचलले आहे व त्यांनी CBSE प्रमाणे इयत्ता १० वि चा अभ्यासक्रम त्या प्रमाणे केला आहे.

त्यामुळे, ज्या पालकांनी CBSE साठी इंग्लिश मिडीयम घेतले, आता त्यांची कुचंबणा होणार. व त्या विद्यार्थ्यांना तर मराठी पण नीट समजत नाही. त्या उलट, मराठी मिडीयम चे विद्यार्थी इंग्लिश पण बोलतात, त्या सोबत आता CBSE प्रमाणे अभ्यास पण करणार,, म्हणजे ट्रिपल सोय (फायदा) आणि ते हि योग्य "फी" मध्ये.

वाचा दि. ५/४/२०१८ चा सामना,,, म्हणून आपल्या मातृभाषेशी (मातृभूमी शी) प्रामाणिक राहायचे असते.
================
आमची शाळा - योगी श्री अरविंद गुरुकुल, आपटेवाडी, शिरगाव, बदलापूर पु., जि. ठाणे, महाराष्ट्र, भारत.
ह्या शाळेत पूर्वी पासून पुढील पैकी मुद्दे अंमलात आहेत ते हि खेळगट (प्ले ग्रुप) पासून  - विद्यार्थ्यांच्या मताला महत्व, शब्दसंपत्तीचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्व अध्ययन, शोधवृत्ती, निरीक्षण, निर्णय क्षमता, उद्योग-व्यवसायाशी निगडित शिक्षणावर भर, मूल्यमापन पद्धती. मग नक्की या ह्या शाळेत. बदलापूरकांसाठी तर खूप मोठी सोय आहे.

Saturday, March 31, 2018

स्वप्नातील घर : भाग ८ - अनियमिततेचा कळस

२८ व २९ मे, २०१७ ला रेजिस्ट्रेशन व व्हॅट रक्कम मागणी करणारा ई-मेल आला. शाहूल साठे ने ई-मेल सही केला होता. पहा



हा ई-मेल वाचून तर काय बोलावे तेच कळत नव्हतं. रेजिस्ट्रेशन व व्हॅट रक्कम ऍडव्हान्स मध्ये भरलेली असून सुद्धा व त्याची रीतसर आमच्या कडे पावती असताना सुद्धा असा ई-मेल येतो म्हणजे हा तर अनियमिततेचा कळसच एक्सर्बिया ने गाठला होता असं म्हणायला हरकत नव्हती. एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट करणाऱ्या कंपनीत अशी अनियमितता असते, हे पाहून तर आम्ही सुन्नच झालो. बरं, एवढी अनियमितता कि, पुणे कार्यालयातून फोन पण येत होता, रक्कम भरण्यासाठी आणि होम लोन सॅंक्शन लेटर पाठविण्यासाठी.

म्हणजे, बघा जेव्हा आम्हाला गृह कर्ज मान्यतेचे पत्रं मिळालेले, तेव्हाच त्याची प्रत आम्ही स्पीड पोस्ट केली होती, हे तुम्ही मागील लेखात वाचलेच आहे. तरी एक्सर्बिया गृह कर्ज मान्यतेचे पत्रं परत मागत होती.

मग, एकदा साठे ने पत्नीला फोन वर सांगितले, मी तुम्हाला ट्रायल ई-मेल पाठवतो त्यावर होम सॅंक्शन लेटर पाठवा व रेजिस्ट्रेशन व व्हॅट रक्कम लगेच भरा.

मग मात्र परत माझ्यातला अकाउंटंट व ग्राहक जागा झाला, व आम्ही साठे ला १ जून, २०१७ ला ई-मेल द्वारे उत्तर दिले. कारण, व्हॅट रक्कमेची परत मागणी करणे म्हणजे एक्सर्बिया ने गोळा केलेल्या  कराचा उपयोग बिजनेस खर्चासाठी केला असा होतो, जे कि तेव्हाच्या महाव्हॅट कायद्यानुसार चुकीचे होते,,, पण आता GST मुळे व्हॅट कायदाच रद्द झाला आहे. बघा.

मग १५ दिवस उलटून गेल्यावर आम्हाला वाटलं, सर्व शांत झालं म्हणून,,, पण कसलं काय !! आता मिस श्वेता चा फोन यायला सुरुवात झाली, होम लोण संकशन लेटर मागणी करण्याचा. मग पत्नीने तिला तिचा ऑफिसिअल ई-मेल आयडी एसएमएस करायला सांगितलं. परत श्वेता चा फोन पत्नीला आला होता, "मॅडम प्लिज, एच डी एफ सी कडून आलेले होम लोण संकशन लेटर चा ई-मेल फॉरवर्ड करा."  मग आम्ही तो एच डी एफ सी चा ई-मेल पण फॉरवर्ड केला. आणि त्यात पुन्हा एकदा रेजिस्ट्रेशन प्रोसिजर व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागद पत्रांची विचारणा २१ जून २०१७ ला केली. पण काही उत्तर आले नाही, म्हणून मग पत्नीने स्वतः ई-मेल ११ जुलै २०१७ रोजी टाईप करून पाठवला. बघा.



त्यानंतर, आम्ही परत तिला गृह कर्ज मान्यता पत्रं, साठे चा ई-मेल व स्पीड पोस्ट रिपोर्ट ज्याद्वारे आम्ही हार्ड कॉपी पाठवली होती, तोही दाखवला. बघा तो ई-मेल -

  
 
अश्या प्रकारे एक्सर्बिया ने अनियमिततेचे कळसावर कळस गाठले होते.
=================================
क्रमश :
हि लेखमालिका स्व-अनुभवावर आधारित आहे. ह्यात कोणत्याही व्यक्ती वा संस्थेचा अपमान किंवा मानहानी किंवा जाहिरात करण्याचा हेतू नाही. पण आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाला स्वतःचे घर घेताना येणाऱ्या प्रक्रियांचा अनुभव व्हावा हाच उद्देश आहे. कारण, इतर कोणीही त्यांना घर घेताना काय प्रक्रिया करावी लागली व काय सतर्कता बाळगावी लागली हे दुसऱ्याला सांगत नाहीत. म्हणून वाटले आपल्या सोबत घडणाऱ्या घटना आपल्यासारख्याच इतरांना मार्गदर्शक ठरतील, म्हणून हा खटाटोप.