नमस्ते
पालक बंधुभगिनींनो,
*गंमत शाळा* हे नावच इतकं साजेसं आहे की मुलं आणि गंमत हे जणू काही समानार्थी शब्दच.
शाळा म्हटंलं की साचेबध्दपणा, शिस्त, कडक नियम, शिक्षा,अभ्यास, पाठांतर, स्पर्धा या सर्व गोष्टी आपोआपच आठवतात.
हे सर्व तर आवश्यक आहेच पण गंमतीतून हे सर्व मुलांच्या पर्यंत पोहचवता आलं तर कीत्ती छान...!
म्हणूनच 'गंमत शाळा'
गेल्या वर्षी पासून गंमत शाळेला सुरुवात झाली
"हाती घ्याल ते तडीस न्याल" या उक्ती प्रमाणे अगदी एका वर्षातच हा उपक्रम लोकप्रिय झाला.
या वर्षी देखील १६ एप्रिल पासून गंमत शाळेला सुरुवात होत आहे.
मुलांच्या वार्षिक परीक्षा संपल्या की पालकांची चिंता सुरू होते.
आता सुट्टीत करायचे काय?
मोबाइल, टी व्ही आणि विडिओ गेम या पासून मुलांना लांब कसे ठेवायचे?
सतत नवीन काय करून द्यायचे?
असे प्रश्न पडायला लागतात. या सर्व प्रश्नांच एकच उत्तर आणि ते म्हणजे 'गंमतशाळा '
नवनिर्मिती, निसर्ग, स्वावलंबन आणि पोहण्याचा आनंद मनमुराद लुटणं हे गंमत शाळेचं वैशिष्ट्य!
विविध
खेळांच्या माध्यमातून मुलांमधील सांघीक भावना (टीम स्पिरिट ) जागरूक करणं,
नेतृत्व गुणांना वाव देणं, जिंकायला आणि हार मानायला शिकवणं हे मुख्य
उद्दिष्ट्य.
बरोबरीने कला कार्यानुभवातुन स्वत: बनविलेल्या कलाकृतींचा आनंद घेणं हेही एक वैशिष्ट्यच.
या सोबतच एक दिवस सर्व मंडळी निसर्गाच्या सानिध्यात वनभोजनाचा आनंद घेतील .
तर एक दिवस क्षेत्र भेटीतुन एका कारखान्याला भेट देतील .
पोहणे हा तर मुलांचा आवडता छंद. गंमत शाळेतली मुले रोज पोहणार!
या बरोबरच प्रार्थना, श्लोक,व्यायाम, नृत्य आणि बरंच काही....
दुपारच्या जेवणाची व्यवस्था गंमत शाळेतच सर्वांचं एकदम, एकसारखं आणि पूर्ण पौष्टिक आहार.
संध्याकाळचा नाश्ता मुलांच्या मदतीनेच बनविला जाणार यातुन रोज नवीन पदार्थ बनविण्याचा आनंद...
मग पाठवायचं ना मुलांना या गंमत शाळेला......
वयोगट - ३.५ वर्षे ते १० वर्षे
ठिकाण - 'योगी श्री अरविंद गुरुकुल', आपटेवाडी, शिरगाव, बदलापुर (पू.), जि. ठाणे, महाराष्ट्र, भारत.
कालावधी - १६ एप्रिल ते २५ एप्रिल २०१८
सकाळी - १०.०० ते सायं ५.००
शुल्क - रू २०००/- फक्त
(जेवण, नाश्ता, पिक अप ड्रॉप सुविधे सहित*)
अधिक माहितीसाठी संपर्क ९५९४२२९१९१
9594229191
No comments:
Post a Comment