Monday, April 23, 2018

गंमत शाळा २०१८ अनुभव

गंमत शाळेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्ही पण अचंबित झालो. गंमत शाळेतील काही क्षणचित्रे पुढे मांडली आहेत.
 गंमत शाळेत फक्त बदलापूर च नव्हे तर, बऱ्याच वेग वेगळ्या ठिकाणाहून वेग वेगळ्या शाळांमधून विद्यार्थी आले होते. बघा वाट्सअँप वरून बनविलेली यादी. उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त होती.

योगी श्री अरविंद गुरुकुल चे कार्यवाह श्री. श्रीकांत देशपांडे आर्यानी गंमत शाळेचा शुभारंभ केला,
सहभागी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. 



मध्यान्ह भोजन (दुपारचे जेवण) जेवताना विद्यार्थी.
शाळेच्याच स्विमिन्ग पूल "वीर सावरकर तरण तलाव" मध्ये स्विमिन्ग सेशन (पोहण्याचा सराव) करताना विद्यार्थी.

प्रार्थना व ध्यानधारणा करताना विद्यार्थी.
वनभोजन - डोणे गाव, वांगणी पश्चिम, जिल्हा रायगड, महाराष्ट्र, भारत.








गंमत शाळा प्रमाणपत्र वाटप व समारोप सोहळा.













आमच्या पाल्याने गंमत शाळेत क्राफ्ट (डिजाईन) केलेली बॅग.

छायाचित्र सौजन्य :- सौ. दीप्ती शेलार, आयोजक
संपूर्णाधिकार सौजन्य :- योगी श्री अरविंद गुरुकुल, बदलापूर पु, जि. ठाणे, महाराष्ट्र, भारत.

Saturday, April 07, 2018

गंमत शाळा !!

नमस्ते 
पालक बंधुभगिनींनो,

योगी श्री अरविंद गुरुकुल, येथे संपन्न होत असलेल्या 'गंमतशाळेबाबत
*गंमत शाळा*  हे नावच इतकं साजेसं आहे की मुलं आणि गंमत हे  जणू काही समानार्थी शब्दच.

शाळा म्हटंलं की साचेबध्दपणा, शिस्त, कडक नियम, शिक्षा,अभ्यास, पाठांतर, स्पर्धा या सर्व गोष्टी आपोआपच आठवतात.

हे सर्व तर आवश्यक आहेच पण गंमतीतून हे सर्व मुलांच्या पर्यंत पोहचवता आलं तर कीत्ती छान...!

म्हणूनच 'गंमत शाळा'

गेल्या वर्षी पासून गंमत शाळेला सुरुवात झाली 
"हाती घ्याल ते तडीस न्याल" या उक्ती प्रमाणे अगदी एका वर्षातच हा उपक्रम लोकप्रिय झाला.

या वर्षी देखील १६ एप्रिल पासून गंमत शाळेला सुरुवात होत आहे.

मुलांच्या वार्षिक परीक्षा संपल्या की पालकांची चिंता सुरू होते. 
आता सुट्टीत करायचे काय? 
मोबाइल, टी व्ही आणि विडिओ गेम या पासून मुलांना लांब कसे ठेवायचे?
सतत नवीन काय करून द्यायचे?   
असे प्रश्न पडायला लागतात. या सर्व प्रश्नांच एकच उत्तर आणि ते म्हणजे 'गंमतशाळा ' 

नवनिर्मिती, निसर्ग, स्वावलंबन  आणि पोहण्याचा आनंद मनमुराद लुटणं हे गंमत शाळेचं वैशिष्ट्य!

विविध खेळांच्या माध्यमातून मुलांमधील सांघीक भावना (टीम स्पिरिट ) जागरूक करणं, नेतृत्व गुणांना वाव देणं, जिंकायला आणि हार मानायला शिकवणं हे मुख्य उद्दिष्ट्य.

बरोबरीने कला कार्यानुभवातुन स्वत: बनविलेल्या कलाकृतींचा आनंद घेणं हेही एक वैशिष्ट्यच.
या सोबतच एक दिवस सर्व मंडळी निसर्गाच्या सानिध्यात  वनभोजनाचा आनंद घेतील . 
तर एक दिवस क्षेत्र भेटीतुन एका कारखान्याला भेट देतील . 

पोहणे हा तर मुलांचा आवडता छंद. गंमत शाळेतली मुले रोज पोहणार!

या बरोबरच प्रार्थना, श्लोक,व्यायाम, नृत्य आणि बरंच काही....

दुपारच्या जेवणाची व्यवस्था गंमत शाळेतच सर्वांचं एकदम, एकसारखं आणि पूर्ण पौष्टिक आहार. 

संध्याकाळचा नाश्ता मुलांच्या मदतीनेच बनविला जाणार यातुन रोज नवीन पदार्थ बनविण्याचा आनंद...

मग पाठवायचं ना मुलांना  या गंमत शाळेला......

वयोगट - ३.५ वर्षे ते १० वर्षे

ठिकाण - 'योगी श्री अरविंद गुरुकुल', आपटेवाडी, शिरगाव, बदलापुर (पू.), जि. ठाणे, महाराष्ट्र, भारत.

कालावधी - १६ एप्रिल ते २५ एप्रिल २०१८

सकाळी - १०.०० ते सायं ५.००

शुल्क - रू २०००/- फक्त
(जेवण, नाश्ता, पिक अप ड्रॉप सुविधे सहित*) 

अधिक माहितीसाठी संपर्क  ९५९४२२९१९१
9594229191

Friday, April 06, 2018

घोकंपट्टी बंद !

बघा, आपण सर्व पालकांनी एसएससी SSC बोर्डावर विश्वास ठेवून आपल्या पाल्याला मराठी (सेमी-इंग्लिश) शाळेत टाकले.

कारण, आपण सर्व त्याच बोर्ड मधून शिकलो आहोत. आता सरकार ने पण पाऊल उचलले आहे व त्यांनी CBSE प्रमाणे इयत्ता १० वि चा अभ्यासक्रम त्या प्रमाणे केला आहे.

त्यामुळे, ज्या पालकांनी CBSE साठी इंग्लिश मिडीयम घेतले, आता त्यांची कुचंबणा होणार. व त्या विद्यार्थ्यांना तर मराठी पण नीट समजत नाही. त्या उलट, मराठी मिडीयम चे विद्यार्थी इंग्लिश पण बोलतात, त्या सोबत आता CBSE प्रमाणे अभ्यास पण करणार,, म्हणजे ट्रिपल सोय (फायदा) आणि ते हि योग्य "फी" मध्ये.

वाचा दि. ५/४/२०१८ चा सामना,,, म्हणून आपल्या मातृभाषेशी (मातृभूमी शी) प्रामाणिक राहायचे असते.
================
आमची शाळा - योगी श्री अरविंद गुरुकुल, आपटेवाडी, शिरगाव, बदलापूर पु., जि. ठाणे, महाराष्ट्र, भारत.
ह्या शाळेत पूर्वी पासून पुढील पैकी मुद्दे अंमलात आहेत ते हि खेळगट (प्ले ग्रुप) पासून  - विद्यार्थ्यांच्या मताला महत्व, शब्दसंपत्तीचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्व अध्ययन, शोधवृत्ती, निरीक्षण, निर्णय क्षमता, उद्योग-व्यवसायाशी निगडित शिक्षणावर भर, मूल्यमापन पद्धती. मग नक्की या ह्या शाळेत. बदलापूरकांसाठी तर खूप मोठी सोय आहे.