तर एक्सर्बिया चा माणूस पहिल्या
डाउन पेयमेन्ट मधील शिल्लक रकमेचा चेक घेऊन गेला, आणि आम्हाला सांगितले कि, पावती ई-मेल
मध्ये येईल. पण चेक क्लिअर होऊन सुद्धा पावती काय ई-मेल मध्ये आली नाही. मग आम्ही सुद्धा
विचार केला कि, आपण सेकंड डाउन पेयमेन्ट करायला जाऊ, तेव्हा घेऊ.
पण घरी
आल्यावर सुद्धा तो एक उत्साह असतो, तो स्वस्थ बसू देत नव्हता. इंटरनेट मन म्हणत होतं,
अजून काही तरी शोधूया.. मग अजून एक एक्सर्बिया चा विडिओ मिळाला त्यात प्रत्येक प्रोजेक्ट
मधील कोणत्या इमारतीचे काम कुठं पर्यंत आले आहे त्याची माहिती असते. बघा हा तेव्हाचा
विडिओ...
तेवढे बघून अजून बरं वाटलं कि,
आपल्या इमारतीचे काम कुठपर्यंत आले आहे ते घर बसल्या तरी कळेल.
दरम्यान, वाट्सअँप वर एक मेसेज आला होता, त्यात बदलापूर-मुरबाड-आसनगाव
व नेरळ-मुरबाड-आसनगाव रेल्वे मार्ग होण्याची भविष्याच्या दृष्टीने अत्यंत गरज आहे असे
म्हटले होते व त्यात लाल बिंदुने वांगणी समोर एक चिन्ह करण्यात आले होते, आणि ते चिन्ह
म्हणजे हाच एक्सर्बिया चा प्रोजेक्ट असल्याचे म्हटले होते. ते चित्र पाहून तर आणखी
एक सुखद धक्का बसला, तो म्हणजे सध्या बदलापूर-मुरबाड-आसनगाव असा रस्ता व कर्जत-मुरबाड-आसनगाव
रस्ता पण आहे व त्यावरून MSRTC ची बस सेवा
पण उत्तम रित्या आहे आणि कर्जत-मुरबाड हा रस्ता प्रोजेक्ट पासून जवळ आहे, त्या मुळे
जर भविष्यात असा रेल्वे मार्ग झाला तर, ह्या टप्प्यातील उपेक्षित गावांची भरभराट होण्यास
वेळ लागणार नाही. आणि ह्या प्रोजेक्ट ला बदलापूर पूर्व कडून नेरळ हायवे वरून वांगणी
लेवल क्रोसिंग करून व बदलापूर पश्चिमेवरुन कान्होर गावातून थेट पोचता येते. आणि सध्या
वांगणी लेवल क्रोसिंग वर रस्ता पूल बनवण्यासाठी २५ जून २०१७ रोजी सेवा बंद ब्लॉक पण
घेण्यात आला होता. आता हे जे विकास दर्शवणारी प्रक्रिया असते ती मनाला खूप समाधान देऊन
जाते, व विकास अनुभवता येतो. बघा ते प्रोपोज्ड रेल्वे मार्गाचे छायाचित्र ...
७/१/२०१७ ला सेकंड डाउन पेयमेन्ट
साठी आम्ही वांगणी ला पोचलो. आणि मग खरं स्वरूप पुढे येण्यास सुरुवात झाली. गेट वर
उभ्या असलेल्या त्यांच्या बॉडीगार्ड ना आम्ही सांगितलं, आम्ही एक्सिस्टिंग कस्टमर आहोत,
आम्हाला मनिष ला भेटायचे आहे. त्यांनी काहीही ऐकले नाही. व त्यांनी रजिस्टर मध्ये एन्ट्री
करण्यास सांगितले, त्यानुसार आम्ही एन्ट्री केली व त्यांनी आम्हाला दुसराच रेप्रेसेंटेटिव्ह
दिला. मग आम्ही त्या दुसऱ्याला सांगितले, आम्ही ऑलरेडी मनिष ला भेटलो आहोत व आम्ही
ऑलरेडी बुकिंग केली आहे. मग मनिष आला तेव्हा तर आणखी मजा आली, मला कधीही फोन करा सांगणारा
मनिष,,, त्याने आम्हाला ओळखलेच नाही व उलट आम्हालाच बुकिंग ची तारीख विचारली व मग स्वतःच्या
मोबाईल मध्ये चेक केले. तेव्हा मी मनात समजून गेलो, ह्यांना फक्त मार्केटिंग साठी ठेवलेलं
आहे. पुढे मनिष शी कॉन्टॅक्ट ठेवून काही उपयोग नाही. मग आम्ही त्याला काही प्रश्न विचारले,
स्लॅब कडाप्पा बांधून मिळेल का
?
बाथरूम व टॉयलेट ची जागा इंटरचेन्ज
करता येईल का किंवा टॉयलेट ला सेपरेट दरवाजा लावता येईल का ?
बाथरूम वर वॉटर टॅंक ठेवण्यासाठी
जागा असेल का ?
वरील पैकी फक्त वॉटर टॅंक च्या
जागेसाठी त्याने हो उत्तर दिले व बाकीच्या दोन प्रशनांच्या उत्तरात त्याने सांगितले
कि, कंस्ट्रक्शन टीम बरोबर तुमची मीटिंग करून देण्यात येईल, तेव्हा सांगा.
ह्या वेळी आम्हाला ना कोणी चहा
बदल विचारलं, ना कोणी साध्या पाण्याबद्दल.
आणि...०९/०१/२०१७ रोजी एक एस
एम एस पत्नीच्या मोबाईल वर आला होता कि, तुमचे विचारे कुरिअर ने येणारे लेटर रिटर्न
झाले. आणि अश्या प्रकारे मग आम्हाला धक्के मिळायला सुरुवात झाली. मग मी लगेच विचारे
च्या वेबसाईट वर तक्रार टाकली व त्यात सांगितले आमची ऍमेझॉन, होमशॉप, शॉपकलुज, इबे,
शॉपिंग स्टोर ची वेगवेगळी कुरिअर येत असतात व आमचे डोर २४*७ उघडे असते, तेव्हा मग त्यांनी
डिलिव्हरी केली.
बघा विचारे डिलिव्हरी रिपोर्ट....
११/१/२०१७ ला एक एक्सर्बिया चे लेटर आले. त्यातील मसुदा पुढील प्रमाणे "बुकिंग च्या ९० दिवसात रेजिस्ट्रेशन करावे, २० जानेवारी २०१७ पर्यंत रेजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, लीगल चार्जेस, वॅट (सेल्स टॅक्स) असे एकूण रु ५५,०९६/- जमा करावे व लोन संकशन लेटर देखील १५ जानेवारी २०१७ पर्यंत सानपाडा ऑफिस ला जमा करावे.
११/१/२०१७ ला एक एक्सर्बिया चे लेटर आले. त्यातील मसुदा पुढील प्रमाणे "बुकिंग च्या ९० दिवसात रेजिस्ट्रेशन करावे, २० जानेवारी २०१७ पर्यंत रेजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, लीगल चार्जेस, वॅट (सेल्स टॅक्स) असे एकूण रु ५५,०९६/- जमा करावे व लोन संकशन लेटर देखील १५ जानेवारी २०१७ पर्यंत सानपाडा ऑफिस ला जमा करावे.
बघा एक्सर्बिया पत्रं .....
हे वाचल्यावर तर एकदम मनात गोंधळच
निर्माण झाला व टेन्शन हि आले एकदम एवढी रक्कम कशी जमा करणार ! आणि एक्सर्बिया च्या
सांगण्यात व लिहिण्यात किती तफावत होती बघा, आम्हाला मनिष कडून सांगण्यात आले होते
कि, बुकिंग नंतर ६ महिन्यांनी रेजिस्ट्रेशन प्रोसिजर होईल व लोन ची रक्कम पण तेव्हा
घेतली जाईल. पण डाउन पेयमेन्ट होई पर्यंत लोन संकशन करून घ्यावे लागेल.
आणि आता लिखित स्वरूपात हि एक्सर्बिया
ने एक प्रकारे धमकी वजा सूचनाच दिली होती. म्हणून मग पत्नी म्हणाली, मनिष शी बोलून
घ्या, म्हणून फोन लावला पण सारखा बिझी येत होता.
मग मात्र
मी पत्नीला सांगितलं, "मला वाटलंच होतं, त्याची ड्युटी फक्त बुकिंग करून घेणं
इतपतच आहे, आपण पण लिखित उत्तरच दिलं पाहिजे. कारण बिजनेस कंमूनिकेशन विषयाचा फंडा
हाच आहे कि, एखाद्याशी व्यवहार करताना जर लिखित स्वरूपात काही मागणी आली तर उत्तर पण
लिखित स्वरूपात द्यावे, कारण अश्या वेळी तोंडी उत्तराला महत्व नसते."
मग
मी सुद्धा लिखित पत्रं लिहिलं...ह्यात मनिष बरोबर झालेल्या चर्चेचा एकूण
एक मुद्दा आम्ही आठवून लिहिला... कारण असं काही करावे लागेल असे आम्हाला
वाटले नव्हते..
बघा ते..पत्रं...
आणि वरील पत्रं डिलिव्हरी झाल्याचे
हा स्पीड पोस्ट रिपोर्ट...
नंतर...
क्रमशः....
हि
लेखमालिका स्व-अनुभवावर आधारित आहे. ह्यात कोणत्याही व्यक्ती वा संस्थेचा अपमान किंवा
मानहानी किंवा जाहिरात करण्याचा हेतू नाही. पण आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाला
स्वतःचे घर घेताना येणाऱ्या प्रक्रियांचा अनुभव व्हावा हाच उद्देश आहे. कारण, इतर कोणीही
त्यांना घर घेताना काय प्रक्रिया करावी लागली हे दुसऱ्याला सांगत नाहीत. म्हणून वाटले
आपल्या सोबत घडणाऱ्या घटना आपल्यासारख्याच इतरांना मार्गदर्शक ठरतील, म्हणून हा खटाटोप.
No comments:
Post a Comment