Sunday, July 16, 2017

वाचा म्हणजे समजेल... रेडिओ एफएम ९३.५

वाचा म्हणजे समजेल...
रेडिओ एफएम ९३.५ वर  आर जे मलिष्काचे एक मुंबई महापालिकेवरचे गाणे सध्या सोशल मीडियावर व न्यूजमध्ये चर्चेचा विषय बनला आहे व या मलिष्काला सर्वानी डोक्यावर घेतले आहे आणि त्या डोक्यावर घेण्यामध्ये  बिकावू पत्रकार हे आघाडीवर आहेत आणि तसे ते करणारच कारण मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे आणि अशा पत्रकारांना शिवसेनेची कावीळ आहे. पण हे गाणे ऐकताना त्या मलिष्काच्या मेंदूमध्ये झोल असल्याचे मला निदर्शनास आले. व तिचे अज्ञान दिसून आले.  त्याची मुद्दे सूद मांडणी खालील प्रमाणे.

.
१. ती गाण्याच्या पहिल्या कडव्यात म्हणते. मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे गोल गोल. मुंबई तुला बीएमसी वर भरोसा नाय काय, नाय काय?
खरं तर मुंबई मधील सर्वच रस्ते हे मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येत नाहीत. मुंबईचे रस्ते हे अनेक ऍथॉरिटी कडे आहेत.
त्यांमध्ये मुंबईचे मुख्य दोन रस्ते म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे  व ईस्टर्न एक्सप्रेस हायवे हे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या व एमएसआरडीसीच्याअंतर्गत येतात त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे असलेल्या एमएमआरडीए च्या अंतर्गत येतात..  आणि या मुख्य रस्त्यावरचे खड्डे हे मुंबई महापालिकेला भरण्यास कोणताही अधिकार नाही. या मुख्य दोन रस्त्यांची पूर्ण जबाबदारी हे राज्य शासनाची आहे. असे अनेक रोड हे राज्य शासनाच्या अखत्यारीत येतात. त्याच प्रमाणे MSRDC , MUIP , एअरपोर्ट अथॉरीटी यांच्या अखत्यारीत पण आहेत.     यांच्यावरच्या खड्यांचे खापर हे महापलिकेच्या माथ्यावर मारले जाते. मुंबईचे  सर्व रस्ते मुंबई महापलिकेच्या अखत्यारीत त्यावेत याची अनेक वेळा मागणी राज्य शासनाकडे महापालिकेने करूनही राज्य शासनाने त्या कडे दुर्लक्ष केले. आणि ह्या मालिष्काला याची माहिती नसावी किंवा माहित असून पण पैसे घेऊन मुंबई महापालिकेला बदनाम करण्यासाठी हे केलेले षडयंत्र असावे.

..

२. दुसऱ्या कडव्यात म्हणते की मुंबईचे ट्राफिक किती लांब लांब ट्राफिक मध्ये आपण जाम जाम, मुंबईचे सिग्नल गोल गोल, मुंबई तुला बी एम सी वर भरोसा नाय काय, नाय काय?
 मला सांगा जे मुंबई मध्ये काही ठिकाणी ट्राफिक जाम होते हे ट्राफिक हाताळण्याचे काम हे वाहतूक विभागाचे असते आणि वाहतूक विभाग हा राज्य शासनाच्या अखत्यारीत येतो, या मध्ये बीएमसीचा कोणताही दुरूनही संबंध येत नाही, परंतु या मलिष्काच्या मेंदूमध्ये झोल असल्याने तिने त्याचे  खापर बी एम सी फोडले आहे.
..

३. तिसऱ्या कडव्यात म्हणते की मुंबईचा पाऊस कसा ओव्हरफ्लो, मुंबईच्या ट्रेन चालतात स्लो स्लो, ट्रेनच्या शेड्युलमध्ये  झोल झोल, मुंबई तुला बी एम सी वर भरोसा नाय काय, नाय काय?
खरं तर रेल्वे आणि मुंबई महापालिकेचा दूरवर काहीही संबंध नाही. रेल्वे, ट्रेन सेवा ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. ट्रेन शेड्युल रेल्वे प्रशासनच पहते  दुसरी गोष्ट रेल्वचे सेवा हे राज्य शासनाच्या अंतर्गत सुद्धा येत नाही. हे सुद्धा या मेंदूत झोल असणाऱ्या बोलबच्चन मलिष्काला माहित नसावे म्हणजे काय?

४) आणि पावसाच्या बाबतीण बोलायचं झालं तर तो निसर्ग आहे. १००-१२० मिमी पावसात महाराष्ट्रातील इतर शहरे पाण्याखाली जातात पण मुंबईच्या बाजुने समुद्र आहे म्हणजे मुंबई एक बेटच आहे. अशा मुंबई मध्ये २०० मिमी पाऊस पडतो आणि थोडेसे पाणी रस्त्यावर येते आणि लगेच ते ओसरते ही.

या आरजे मलिष्काला म्हणावं मुंबईचा इतिहास वाच एकदा...
मुंबईकरांचा आणि मराठी माणसांचा बीएमसी वर पुर्ण विश्वास आहे.
म्हणून गेले २५ वर्ष झाले मुंबईकर शिवसेनेला निवडुन देतायत.
रात्री बेरात्री बिनधास्तपणे आमच्या ताई मुंबईत निडरपणे फिरू शकतात एवढी सुरक्षित आहे मुंबई.
आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईचा अभिमान आणि बीएमसीवर मुंबईकरांचा पुर्ण विश्वास आहे हे लक्षात ठेव म्हणावं.

जय महाराष्ट्र.!

#रोखठोक
#एकसर्वसामान्यमुंबईकर

सौजन्य :- आमोद नाईक, वॉट्सअँप  फॉरवर्ड, १५-७-२०१७

Thursday, July 06, 2017

वो दोस्त अब थकने लगे है...

किसीका पेट निकल आया है,
किसीके बाल पकने लगे है...

सब पर भारी ज़िम्मेदारी है,
सबको छोटी मोटी कोई बीमारी है...

दिनभर जो भागते दौड़ते थे,
वो अब चलते चलते भी रुकने लगे है...

पर ये हकीकत है,
सब दोस्त थकने लगे है...

किसी को लोन की फ़िक्र है,
कहीं हेल्थ टेस्ट का ज़िक्र है...

फुर्सत की सब को कमी है,
आँखों में अजीब सी नमीं है...

कल जो प्यार के ख़त लिखते थे,
आज बीमे के फार्म भरने में लगे है...

पर ये हकीकत है 
सब दोस्त थकने लगे है...

देख कर पुरानी तस्वीरें,
आज जी भर आता है...

क्या अजीब शै है ये वक़्त भी,
किस तरहा ये गुज़र जाता है...

कल का जवान दोस्त मेरा,
आज अधेड़ नज़र आता है...

ख़्वाब सजाते थे जो कभी ,
आज गुज़रे दिनों में खोने लगे है...
पर ये हकीकत है 
सब दोस्त थकने लगे है...
 
सौजन्य :- अजय भाटिया,  वॉट्सअँप  फॉरवर्ड

Saturday, July 01, 2017

स्वप्नातील घर - भाग ३ : डाउन पेयमेन्ट १ व २


तर एक्सर्बिया चा माणूस पहिल्या डाउन पेयमेन्ट मधील शिल्लक रकमेचा चेक घेऊन गेला, आणि आम्हाला सांगितले कि, पावती ई-मेल मध्ये येईल. पण चेक क्लिअर होऊन सुद्धा पावती काय ई-मेल मध्ये आली नाही. मग आम्ही सुद्धा विचार केला कि, आपण सेकंड डाउन पेयमेन्ट करायला जाऊ, तेव्हा घेऊ.


पण घरी आल्यावर सुद्धा तो एक उत्साह असतो, तो स्वस्थ बसू देत नव्हता. इंटरनेट मन म्हणत होतं, अजून काही तरी शोधूया.. मग अजून एक एक्सर्बिया चा विडिओ मिळाला त्यात प्रत्येक प्रोजेक्ट मधील कोणत्या इमारतीचे काम कुठं पर्यंत आले आहे त्याची माहिती असते. बघा हा तेव्हाचा विडिओ...


तेवढे बघून अजून बरं वाटलं कि, आपल्या इमारतीचे काम कुठपर्यंत आले आहे ते घर बसल्या तरी कळेल. 

मग घरी चर्चा करत असताना आणखी दोन तीन प्रश्न मनात आले, बाथरूम वर पाण्याची टाकी बसवायला जागा असेल का ?, सध्याच्या घरात जसा स्लॅब कडाप्पा आहे तसा बनवून देतील का ?. हे हि प्रश्न पुढ्याच्या फेरीच्या वेळी विचारू असं ठरलं. हा बघा स्लॅब कडप्पा...


दरम्यान, वाट्सअँप वर एक मेसेज आला होता, त्यात बदलापूर-मुरबाड-आसनगाव व नेरळ-मुरबाड-आसनगाव रेल्वे मार्ग होण्याची भविष्याच्या दृष्टीने अत्यंत गरज आहे असे म्हटले होते व त्यात लाल बिंदुने वांगणी समोर एक चिन्ह करण्यात आले होते, आणि ते चिन्ह म्हणजे हाच एक्सर्बिया चा प्रोजेक्ट असल्याचे म्हटले होते. ते चित्र पाहून तर आणखी एक सुखद धक्का बसला, तो म्हणजे सध्या बदलापूर-मुरबाड-आसनगाव असा रस्ता व कर्जत-मुरबाड-आसनगाव रस्ता पण आहे व त्यावरून MSRTC  ची बस सेवा पण उत्तम रित्या आहे आणि कर्जत-मुरबाड हा रस्ता प्रोजेक्ट पासून जवळ आहे, त्या मुळे जर भविष्यात असा रेल्वे मार्ग झाला तर, ह्या टप्प्यातील उपेक्षित गावांची भरभराट होण्यास वेळ लागणार नाही. आणि ह्या प्रोजेक्ट ला बदलापूर पूर्व कडून नेरळ हायवे वरून वांगणी लेवल क्रोसिंग करून व बदलापूर पश्चिमेवरुन कान्होर गावातून थेट पोचता येते. आणि सध्या वांगणी लेवल क्रोसिंग वर रस्ता पूल बनवण्यासाठी २५ जून २०१७ रोजी सेवा बंद ब्लॉक पण घेण्यात आला होता. आता हे जे विकास दर्शवणारी प्रक्रिया असते ती मनाला खूप समाधान देऊन जाते, व विकास अनुभवता येतो. बघा ते प्रोपोज्ड रेल्वे मार्गाचे छायाचित्र ...


७/१/२०१७ ला सेकंड डाउन पेयमेन्ट साठी आम्ही वांगणी ला पोचलो. आणि मग खरं स्वरूप पुढे येण्यास सुरुवात झाली. गेट वर उभ्या असलेल्या त्यांच्या बॉडीगार्ड ना आम्ही सांगितलं, आम्ही एक्सिस्टिंग कस्टमर आहोत, आम्हाला मनिष ला भेटायचे आहे. त्यांनी काहीही ऐकले नाही. व त्यांनी रजिस्टर मध्ये एन्ट्री करण्यास सांगितले, त्यानुसार आम्ही एन्ट्री केली व त्यांनी आम्हाला दुसराच रेप्रेसेंटेटिव्ह दिला. मग आम्ही त्या दुसऱ्याला सांगितले, आम्ही ऑलरेडी मनिष ला भेटलो आहोत व आम्ही ऑलरेडी बुकिंग केली आहे. मग मनिष आला तेव्हा तर आणखी मजा आली, मला कधीही फोन करा सांगणारा मनिष,,, त्याने आम्हाला ओळखलेच नाही व उलट आम्हालाच बुकिंग ची तारीख विचारली व मग स्वतःच्या मोबाईल मध्ये चेक केले. तेव्हा मी मनात समजून गेलो, ह्यांना फक्त मार्केटिंग साठी ठेवलेलं आहे. पुढे मनिष शी कॉन्टॅक्ट ठेवून काही उपयोग नाही. मग आम्ही त्याला काही प्रश्न विचारले, 

स्लॅब कडाप्पा बांधून मिळेल का ?

बाथरूम व टॉयलेट ची जागा इंटरचेन्ज करता येईल का किंवा टॉयलेट ला सेपरेट दरवाजा लावता येईल का ?

बाथरूम वर वॉटर टॅंक ठेवण्यासाठी जागा असेल का ?

वरील पैकी फक्त वॉटर टॅंक च्या जागेसाठी त्याने हो उत्तर दिले व बाकीच्या दोन प्रशनांच्या उत्तरात त्याने सांगितले कि, कंस्ट्रक्शन टीम बरोबर तुमची मीटिंग करून देण्यात येईल, तेव्हा सांगा. 

मग आम्ही रेजिस्ट्रेशन ची अंदाजे तारीख, लोन घेण्याची अंदाजे महिना वगैरे सर्व विचारून घेतले व मनिष ने सांगितले, कि तो आता टाटा कॅपिटल वाल्याशी ओळख करून देईल. म्हणून मग आम्ही दहा मिनिटे वाट बघितली, पण कोणी आलं नाही. मग मनिष आम्हाला गेट वर चेक कॅलेक्शन कॉउंटर वर घेऊन गेला. तिथे आम्ही सांगितले कि, तुमची पावती रु ८,७९०/- काय ई-मेल मध्ये आली नाही. मग त्याने आम्हाला पहिल्या पावती बद्दल विचारले. तेव्हा आम्ही स्वाईप केले होते असे सांगितले व शिल्लक रकमेचा चेक क्लिअर झाल्याची IDBI  च्या M-पासबुक मध्ये एन्ट्री दाखवली, तेव्हा त्याने आम्हाला शिल्लक रकमेची पावती दिली. मग लगेच आम्ही दुसऱ्या डाउन पेयमेन्ट चा चेक दिला व त्याची पावती मात्र लगेच घेतली, व आम्ही परतलो.

ह्या वेळी आम्हाला ना कोणी चहा बदल विचारलं, ना कोणी साध्या पाण्याबद्दल.

आणि...०९/०१/२०१७ रोजी एक एस एम एस पत्नीच्या मोबाईल वर आला होता कि, तुमचे विचारे कुरिअर ने येणारे लेटर रिटर्न झाले. आणि अश्या प्रकारे मग आम्हाला धक्के मिळायला सुरुवात झाली. मग मी लगेच विचारे च्या वेबसाईट वर तक्रार टाकली व त्यात सांगितले आमची ऍमेझॉन, होमशॉप, शॉपकलुज, इबे, शॉपिंग स्टोर ची वेगवेगळी कुरिअर येत असतात व आमचे डोर २४*७ उघडे असते, तेव्हा मग त्यांनी डिलिव्हरी केली.       

बघा विचारे डिलिव्हरी रिपोर्ट....



११/१/२०१७ ला एक एक्सर्बिया चे लेटर आले. त्यातील मसुदा पुढील प्रमाणे "बुकिंग च्या ९० दिवसात रेजिस्ट्रेशन करावे, २० जानेवारी २०१७ पर्यंत रेजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, लीगल चार्जेस, वॅट (सेल्स टॅक्स) असे एकूण रु ५५,०९६/-  जमा करावे व लोन संकशन लेटर देखील १५ जानेवारी २०१७ पर्यंत सानपाडा ऑफिस ला जमा करावे.

बघा एक्सर्बिया पत्रं .....


हे वाचल्यावर तर एकदम मनात गोंधळच निर्माण झाला व टेन्शन हि आले एकदम एवढी रक्कम कशी जमा करणार ! आणि एक्सर्बिया च्या सांगण्यात व लिहिण्यात किती तफावत होती बघा, आम्हाला मनिष कडून सांगण्यात आले होते कि, बुकिंग नंतर ६ महिन्यांनी रेजिस्ट्रेशन प्रोसिजर होईल व लोन ची रक्कम पण तेव्हा घेतली जाईल. पण डाउन पेयमेन्ट होई पर्यंत लोन संकशन करून घ्यावे लागेल. 

आणि आता लिखित स्वरूपात हि एक्सर्बिया ने एक प्रकारे धमकी वजा सूचनाच दिली होती. म्हणून मग पत्नी म्हणाली, मनिष शी बोलून घ्या, म्हणून फोन लावला पण सारखा बिझी येत होता.

मग मात्र मी पत्नीला सांगितलं, "मला वाटलंच होतं, त्याची ड्युटी फक्त बुकिंग करून घेणं इतपतच आहे, आपण पण लिखित उत्तरच दिलं पाहिजे. कारण बिजनेस कंमूनिकेशन विषयाचा फंडा हाच आहे कि, एखाद्याशी व्यवहार करताना जर लिखित स्वरूपात काही मागणी आली तर उत्तर पण लिखित स्वरूपात द्यावे, कारण अश्या वेळी तोंडी उत्तराला महत्व नसते."

मग मी सुद्धा लिखित पत्रं लिहिलं...ह्यात मनिष बरोबर झालेल्या चर्चेचा एकूण एक मुद्दा आम्ही आठवून लिहिला... कारण असं काही करावे लागेल असे आम्हाला वाटले नव्हते.. 

बघा ते..पत्रं...

आणि वरील पत्रं डिलिव्हरी झाल्याचे हा स्पीड पोस्ट रिपोर्ट...  


नंतर...


क्रमशः....   

====================================
हि लेखमालिका स्व-अनुभवावर आधारित आहे. ह्यात कोणत्याही व्यक्ती वा संस्थेचा अपमान किंवा मानहानी किंवा जाहिरात करण्याचा हेतू नाही. पण आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाला स्वतःचे घर घेताना येणाऱ्या प्रक्रियांचा अनुभव व्हावा हाच उद्देश आहे. कारण, इतर कोणीही त्यांना घर घेताना काय प्रक्रिया करावी लागली हे दुसऱ्याला सांगत नाहीत. म्हणून वाटले आपल्या सोबत घडणाऱ्या घटना आपल्यासारख्याच इतरांना मार्गदर्शक ठरतील, म्हणून हा खटाटोप.