Monday, June 26, 2017

स्वप्नातील घर - भाग १ : निर्णयासाठी परिस्थिती



पूर्वी मी लहान असताना आम्ही विक्रोळी पूर्व (जि. मुंबई) येथे चाळीच्या घरात राहत असू. ते घर ओनरशिप होत, व चाळीतील आपुलकी पणा व त्यातील संस्कृती आपण आमच्या "चाळ - एक संस्कृती" ह्या लेखात वाचलेली आहेच. नंतर आम्ही डोंबिवली पूर्व (जि. ठाणे) येथे पगडी पद्धतीच्या भाड्याच्या घरात राहत होतो. तिथे बाकी असलेले शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. 

आम्ही एवढी वर्ष डोंबिवली ला ऐकत होतो कि, आयरेगावात स्टेशन होणार.... होणार.... पण झाले नाही. आणि... आम्ही डोंबिवली सोडली आणि कोपर स्टेशन खाली व वर तयार झाले. त्या मुळे वसई, पनवेल, भिवंडी आयरेगाव वासियांना अँप्रोचबल झाले. आता जर आम्ही डोंबिवलीत राहत असतो तर, कणकवली ला जाण्यासाठी भिवंडी वरून जवळ पडले असते. आणि आता तर ऐकायला येते कि, कोपर (वरील) ला पुढील दहा वर्षात सर्व एक्सप्रेस थांबणार.
पण आता काय करणार.... त्या मुळे एखादी सुविधा मिस केल्यावर जेवढे चुक्चुक्ल्या सारखे वाटले होते, तेवढे शब्दात व्यक्त करता येणार नाही.

त्यानंतर पोस्टातून निवृत्त झाल्यावर वडिलांनी २००३ साली बदलापूर पूर्व (जि. ठाणे) येथे ओनरशिप फ्लॅट घेतला. ज्यात आम्ही फेब्रुवारी २००४ मध्ये राहण्यास आलो. ह्या फ्लॅट चा व्यवहार आम्ही पूर्ण कॅश मध्ये केला होता व तो करत असताना बिल्डर ने दोन तीन गोष्टी सहज सांगितल्या होत्या, "मै विंडो को ग्रिल बिठाऊंगा, किचन मे कडाप्पा लगाऊंगा, डोअर को हॅन्डल बिठाऊंगा." पण ह्यातील एकही गोष्ट बऱ्याचदा विचारून सुद्धा पूर्ण करण्यात आली नाही. मग आम्ही हि हा विषय सोडून दिला. 

पण आम्ही फेब्रुवारी २००४ मध्ये बदलापूरला आल्यावर, शिवसेनेतर्फे लगेचच एप्रिल २००४ मध्ये बदलापूर ते वाशी व बेलापूर NMMT  बस सेवा सुरु करण्यात आली व एप्रिल २००५ पासून बदलापूर ते टिटवाळा ST बस सेवा सुरु करण्यात आली. तसेच तत्कालीन नगराध्यक्ष श्री राम पातकर हे मुंबई रेल्वेच्या प्रवासी संघटनेत बदलापूरचे प्रतिनिधी म्हणून दोन वर्षे कार्यरत होते, तेव्हा त्यांनी ४ बदलापूर लोकल वाढवून दिल्या होत्या. त्यामुळे मनात एक गोष्ट कायमची कोरली गेली कि, विकसित होत असलेल्या शहरामध्ये सुविधा वाढवण्याचा वेग जास्त असतो.

मग कालांतराने ह्याच घरी विवाह पार पडला, एक मुलगा हि आहे, आई वडील पण आहेत. आणि सिंगल इमारती मध्ये राहण्याचे अडचणी पण लक्षात आल्या. कुणी सोसायटी च्या कामांची जबाबदारी घेत नाही वगैरे. म्हणून मग आम्ही दुसरे घर बघण्यास सुरुवात केली. बदलापूर मध्ये पण बघितले पण बजेट बसत नव्हते आणि आम्ही सध्या राहत असलेल्या एरिया सारखा एरिया मिळत नव्हता. म्हणजे आम्ही सध्या राहत असलेल्या एरिया मध्ये पायी चालणाऱ्यांची रहदारी बरीच असते व रात्री-अपरात्री सुद्धा आपण बिनधास्त चालत येऊ शकतो. म्हणून मग आम्ही शोध सोडून दिला, पण मनात मात्र सुप्त इच्छा राहिली होती. 

आणि आम्ही पहिल्या पासून पूर्वेलाच राहत आलो आहोत. पण पत्नी चे माहेर हे विरार (प) ला आहे. म्हणून मग विचार केला बघूया पश्चिम भाग पण. आणि तसे आता बदलापूर मध्ये पूर्व व पश्चिम भाग एवढा भरला आहे कि, स्टेशन पासून २० मिनिटे चालत जाऊ शकू असा एकही नवीन प्रोजेक्ट बनवण्याकरिता जागा शिल्लक नाही. कुणा सोसायटी ने त्यांची इमारत री-डेव्हलोपमेंट साठी दिली तर वेगळी गोष्ट.

आणि......

क्रमशः....  
========================================

हि लेखमालिका स्व-अनुभवावर आधारित आहे. ह्यात कोणत्याही व्यक्ती वा संस्थेचा अपमान किंवा मानहानी किंवा जाहिरात करण्याचा हेतू नाही. पण आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाला स्वतःचे घर घेताना येणाऱ्या प्रक्रियांचा अनुभव व्हावा हाच उद्देश आहे. कारण, इतर कोणीही त्यांना घर घेताना काय प्रक्रिया करावी लागली हे दुसऱ्याला सांगत नाहीत. म्हणून वाटले आपल्या सोबत घडणाऱ्या घटना आपल्यासारख्याच इतरांना मार्गदर्शक ठरतील, म्हणून हा खटाटोप.

No comments: