...
१७-१२-१६ दिवशी नेहमी प्रमाणे सामना वाचत असताना एका जाहिराती वर नजर पडली,
"लोन
मिळेल घर बनेल", फ्लॅट रु ५.३* लाखांपासून सुरु” (आता हा * एवढासा दिसणारा, पण
त्याची महिती खूप मोठी आहे.) २५ डिसेंबर च्या अगोदर बुकिंग केल्यास कोणताही फ्लोअर
राईज नाही.”
व त्या जाहिरातीत टेबल स्वरूपात १ आर के साठी लागणारी
किंमत (रु ७,५१,६१०/-), डाउन पेयमेन्ट किती (रु ७५,१६०/-), लोन चा इ एम आय किती बसेल
वगैरे सर्व माहिती एवढी डिटेल मध्ये दिली होती कि एक स्वतःचे घर असावे हि सुप्त इच्छा
पुन्हा जागृत झाली व पत्नीला पण हि जाहिरात दाखवली. कारण सध्या जॉब अस्थिर असल्यामुळे
हे जर घ्यायचे झाले तर तिच्या नावेच घ्यायचे होते. तसेच त्या जाहिराती मध्ये ज्या प्रधान
मंत्री आवास योजने अंतर्गत घर बनवणार ह्याचा उल्लेख करण्यात आला होता, त्या योजनेची
मूळ अट अशी आहे कि, प्रथम अर्जदार हि महिला असावी व तिचे उत्पन्न PMAY अंतर्गत दिलेल्या
मर्यादेत असेल तर तिला लोन च्या व्याजावर सबसिडी मिळेल व रु ६,३२५/- चा मासिक हफ्ता
रु ४,२६८/- इतका पडेल. हे बघा त्या जाहिरातीचे कात्रण....
तशी TV जाहिराती बघितल्या होत्या. पण वाटलं अजून थोडं
शोधूया. जर जाहिरात एवढी पारदर्शक देऊ शकतात, तर अजून माहिती देखील मिळू शकते. आणि
जाहिरातीतील "एक्सर्बिया" हे नाव वाचून हे हि लक्षात आले कि, ह्या कंपनीला
CNBC Aawaz ह्या चॅनेल वर प्रक्षेपित होणाऱ्या
"रिअल इस्टेट अवॉर्ड" मधील अवॉर्ड एका वर्षी मिळालेला आहे. मग सवयी प्रमाणे
गूगल करून बघितले. आणि हा वांगणी प्रोजेक्ट चा विडिओ यु ट्यूब वर मिळाला. बघा...
आणि
पुढे हे हि लक्षात आले कि, एका बातमी मध्ये ह्याच कंपनीचा पुण्या जवळील एक प्रोजेक्ट पुणे - नाशिक हायवे झाल्यामुळे दोन्ही
हायवे म्हणजेच पुणे - मुंबई व पुणे - नाशिक हायवे ला अँप्रोचबल झाला.
आणि
वरील विडिओ मध्ये दर्शविल्या प्रमाणे १ आर के चा लुकआऊट पण आवडला. म्हणून मग पत्नीने
पण मन बनवलं, एकदा बघायला जाऊ.
१९/१२/२०१६ हा दिवस उजाडला व आम्ही वांगणी येथे पोचलो.
त्या आधी आम्ही जाहिरातीतील फोन क्र. वर कॉल करून अपॉइंटमेंट फिक्स केली, मग आम्हाला
मेसेज मध्ये काही फोन क्र. आले. ते घेऊन आम्ही वांगणी स्टेशन ला उतरलो. तिथे उभ्या
असलेल्या रेप्रेसेंटेटिव्ह ने सर्व भविष्यातील ग्राहकांना एकत्र करून त्यांच्या वही
मध्ये नावे व सोबत असलेली माणसे ह्यांची नोंद केली व आम्हाला वांगणी पश्चिमेला नेऊन
त्यांच्या गाड्यांमध्ये बसविले. त्या गाडीने आम्हाला ४ कि मी वर असलेल्या प्रोजेक्ट
ला नेऊन सोडले. तिथे एक्सर्बिया ने exhibition structure उभारले होते. त्यात आम्ही
प्रवेश केल्यावर आम्हाला त्यांच्या रजिस्टर मध्ये एन्ट्री करण्यास सांगण्यात आले. नंतर
बसवण्यात आले. तेव्हा पाणी सर्व करण्यात आले. मग एक्सर्बिया च्या मनिष ह्या रेप्रेसेंटेटिव्ह
ने आम्हाला कॉन्टॅक्ट करून आम्हाला मीटिंग च्या टेबल वर घेऊन गेला. तिथे आम्हाला प्रोजेक्ट
ची माहिती दिली. जसे हे प्रोजेक्ट कधी पर्यंत पूर्ण होईल (डिसेंबर २०१८), ह्या प्रोजेक्ट
चे बांधकाम सुप्रीम इन्फ्रा कंपनीला दिले आहे, आता पर्यंत किती फ्लॅट बुक झाले, स्टॅम्प
ड्युटी, vat , रेजिस्ट्रेशन रक्कम लीगल चार्जेस यांची अंदाजे माहिती दिली. आम्हाला
विकसित होण्या आधीचा व विकसित झाल्यानंतरच्या फ्लॅट मधील रेट चा फरक पण समजावलं. पहा
हा तक्ता :-
आणि त्या नंतर मनिष आम्हाला यु ट्यूब वरचा विडिओ दाखवणार
इतक्यात आम्हीच त्याला म्हणालो, "हा आम्ही बघितला आहे." मग मात्र तो हि पटकन मनातलं बोलून गेला, "मग
चेक पण आणला आहे का !", आम्ही म्हटले नाही, "आम्ही फक्त चौकशी साठी आलो आहोत."
त्या नंतर तो आम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखविण्यासाठी घेऊन गेला. पहा हा विडिओ.....
नंतर
आम्हाला चहा / कॉफी ऑफर करण्यात आली. सॅम्पल फ्लॅट मध्ये किचन मध्ये ड्रॉवर दाखवले
होते, म्हणून मी विचारले "असे बनवून देणार का !" तो बोलला नाही, "ते
सॅम्पल आहे. असे तुम्ही बनवू शकता." हि सर्व सिस्टिमॅटिक पद्धत बघून आम्ही इतके
भारावून गेलो कि, मग पत्नीने पटापट इमारतीची व फ्लॅट ची निवड केली. सी५-११५. आणि हा
प्रोजेक्ट समुद्र सपाटी पासून बऱ्याच उंचीवर असल्याने २६ जुलै सारखी भीती पण नव्हती.
मग मी विचारले, "दोन वर्षांनी इथे मैण्टिनन्स किती लागेल ?" ह्यावर मनिषने
उत्तर दिले, "रु २/- प्रति square फीट." मग आम्ही विचारले, "प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर,
येण्या जाण्याची काय व्यवस्था असेल !" ह्यावर उत्तर मिळालं कि, "बससेवा असेल
रु १००/- प्रति फॅमिली प्रति महिना. त्यात कितीही वेळा फॅमिली मेंबर्स ये जा करू शकतात."
त्यानंतर,
मनिष ने सांगितले लवकर बुकिंग करा, नाहीतर हवा असलेला फ्लॅट विकला जाईल, कारण १० बुकिंग काउंटर एका वेळी सुरु आहेत. मग मात्र आम्ही बुकिंग फॉर्म भरून दिला, त्यात असलेले
पेयमेन्ट schedule पण भरून घ्यायला आम्ही मनिष
ला सांगितले, पण तो म्हणाला ते पेयमेन्ट schedule
फक्त जे विदाऊट लोन पेयमेन्ट करतात, त्यांच्या साठी आहे. व पहिली डाउन पेयमेन्ट
करणार होतो व त्या साठी मग मनिष ने सांगितले कि, माणसाला चेक कल्लेक्ट करायला पाठवतो.
पण बुकिंग करण्यासाठी थोडी तरी रक्कम भरावी लागेल. म्हणजे फ्लॅट लॉक होईल, मग पत्नी
ने मत मांडलं कि, आम्ही पूर्ण १८,७९०/- पहिले
डाउन पेयमेन्ट करतो. पण शेयर मार्केट च्या लिन मध्ये फंड्स अडकल्यामुळे मग पत्नी
ने रु १०,०००/- चे कार्ड पेयमेन्ट केले व बाकी रु ८.७९०/- चा चेक त्यांचा माणूस बदलापूरला
येऊन घेऊन गेला. मनिष ने हि सांगितले, त्याला कधीही आम्ही फोन करू शकतो. त्यांचा माणूस
पुढील पोस्ट डेटेड चेक पण मागत होता, मग आम्ही मनिष ला फोन लावून लगेच क्लिअर करून
घेतले व आम्ही पुढील चेक आणून देऊ असे सांगितले.
आणि
इतरही बरेचशे मुद्दे जसे लोन प्रक्रिया, रेजिस्ट्रेशन कधी होणार, इ एम आय कधी सुरु
होणार, व PMAY योजने खाली पत्नी चे इनकम कसे
पात्र आहे व आम्हाला व्याज सूट मिळेल अशी नक्की खात्री वगैरे मुद्दे डिसकस झाले, जे
पुढील लेखमालेत आपल्यासमोर उलगडतील.
अश्या
प्रकारे आमचा स्वप्नातील घराच्या बाबतीतला निर्णय, निवड व बुकिंग पूर्ण झाले व आम्ही
त्या समाधानात घरी परतलो.
क्रमशः....
==================================
हि
लेखमालिका स्व-अनुभवावर आधारित आहे. ह्यात कोणत्याही व्यक्ती वा संस्थेचा अपमान किंवा
मानहानी किंवा जाहिरात करण्याचा हेतू नाही. पण आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाला
स्वतःचे घर घेताना येणाऱ्या प्रक्रियांचा अनुभव व्हावा हाच उद्देश आहे. कारण, इतर कोणीही
त्यांना घर घेताना काय प्रक्रिया करावी लागली हे दुसऱ्याला सांगत नाहीत. म्हणून वाटले
आपल्या सोबत घडणाऱ्या घटना आपल्यासारख्याच इतरांना मार्गदर्शक ठरतील, म्हणून हा खटाटोप.