आज सकाळी मुंबई महानगरपालिकेची मतमोजणी सुरु झाली. बघे बघे पर्यंत उपहारापर्यंत २०० जागांच्या कला पैकी आघाडीवर असलेल्या जागांचा कल पुढील प्रमाणे होता.
शिवसेना - ९३
भाजप - ५७
काँग्रेस - १९
पण उपहारानंतर संगणकांना काय झाले कुणास ठाऊक,,, हरलेले भाजप चे उमेदवार (भाजप प्रवक्ते शाह) फेरमोजणीत समान मतांवर आले, हे हि अजब आहे. आणि नंतर शिवसेनेचे प्रस्थान ९३ ह्या अंकापुढे गेलेच नाहीत. उलट राहिलेल्या २७ जागांपैकी २५ जागा ह्या भाजप च्या वाढत गेल्या, आणि असे कसे झाले ते कुणालाच कळले नाही. व शेवटचे गणित अश्या प्रकारे समोर आले. नाहीतर आम्ही दिलेले १३४ जागांचे लक्ष्य सहज पूर्ण झाले असते. त्यामुळे शिवसेनेने ह्या गणितावर पण विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे शिवसेनेने उपहारानंतर झालेल्या जवळपास ५० जागांच्या फेर मोजणीची मागणी करावी अशी आशा आहे.
शिवसेना - ८४
भाजप - ८२
काँग्रेस - ३१
ह्या निवडणुकीत "शिवसेनेची वेगळी वाटचाल सुरु करत आहोत", ह्या विधानावर लढवणूक करण्यात आली. आता शिवसेनेने वेगळे राहावे, कारण जर त्यांनी भाजप ची मदत घेतली तर जी पॉवर शिवसेनेला एक हाती लढण्यामुळे मिळाली आहे ती कदाचित डगमगू शकते. आणि जे एबीपी माझा च्या चर्चेतून ऐकले ते असे "गुजराती व उत्तर भारतीय लोकसंख्या जास्त असलेल्या प्रभागात एक गठ्ठा मते भाजप ला मिळाली." त्या मुळे जर ह्या पुढे चुकून मुंबई वर कोणतीही आपत्ती आली असेल व शिवसैनिक मुंबईकरांच्या मदतीला धावतील तेव्हा हा मुद्दा पण लक्षात ठेवावा लागणार आहे, अगदी बाळासाहेबांनी तशी शिकवण दिली नसली तरी. कारण जर हेच स्वतःला मुंबईकर म्हणवणारे परप्रांतीय शिवसैनिकांची मदत घेत असतील आणि मतदान मात्र शिवसेनेच्या विरोधात करत असतील तर शिवसैनिकांना पण त्यांची पोलिसी बदलावी लागेल.
आणि शिवसेना नेतृत्वाने एक गोष्ट थोडीशी समजून घेतली पाहिजे, "अस्तनीतले निखारे" हे फक्त कार्यकर्त्यात नसतात, तर ते खासदार, आमदारांमध्ये पण असू शकतात. एबीपी माझा वर ते तीन चेहरे भाजप नेत्यांसोबत हॉटेल बसलेले आज सर्वानी पहिले आहेत.
बाकी शिवसेना पक्ष प्रमुखांचा निर्णय हा धाडसी आहे. बाकी निर्णय घेण्यात ते सक्षम आहेत.
छायाचित्र सौजन्य :- इंडिया टुडे
No comments:
Post a Comment