मुंबई निवडणूक निकाल २०१७ आकलन :
शिवसेना मुंबई निवडणूक निकालानंतर काय करणार, ह्या कडे सर्वांचे लक्ष व उत्सुकता आहे. त्या मुळे आम्ही आमच्या अल्प बुद्धीने केलेले विचार पुढील प्रमाणे :-
काँग्रेस :-
काँग्रेस मधून फक्त नारायण राणेंनीच शिवसेना नेतृत्वार म्हणजेच श्री. उद्धव ठाकरे वर टीका केली आहे. पूर्वी "शिवसेना संपवणार" म्हणणारे राणे आता "राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो" हे ऐकून व सर्वात आधी मीच (राणे) यांनी शिवसेना मुंबई पालिकेत क्र. १ चा पक्ष ठरेल असे सांगितले होते, हे ऐकून बरे वाटले. तसेच शिवसेना नेतृत्वाने फक्त काँग्रेस च्या घोटाळ्यावर टीका केली होती, अशी कोणती खाजगी टीका झाली नव्हती. आणखी एक गोष्ट म्हणजे शिवसेना नेतृत्वाची नेमणूक पंतप्रधान सल्लागार समितीत केली होती.
राष्ट्रवादी :-
श्री. शरद पवारांनी बाळासाहेबांच्या एका सभेत तर पुष्पगुछ श्री राज ठाकरे ह्यांच्या हातात देऊन ह्यांच्या हातात शिवसेना द्यावी असे संकेत दिले होते. म्हणजेच श्री उद्धव ठाकरे ह्यांच्यावर अविश्वास दाखवला होता. आणि त्या नंतर हि बऱ्याच वेळा पवार साहेबानी शिवसेना नेतृत्वार खाजगी रित्या टीका केलेली आहे. म्हणजेच त्यांच्याही मनात शिवसेना संपवण्याचा डाव होता. पण आता अजितदादा म्हणाले "शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढेल" हे ऐकून देखील बरे वाटले.
भाजप :-
भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर फक्त शिवसेनेचा वापर करून घेतला हे सिद्ध झाले. आज जर बाळासाहेब असते तर ते देखील हळहळले असते. ज्या भाजप ला साथ दिली तेच आज निवडणुकीत शिवसेनेला संपवण्या एवढे वर आलेत, आणि हा सर्वात मोठा धक्का त्यांना लागला असता. आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने टीका चालवली होती, ती पाहता आता प्रश्नच येत नाही. आणि प्रत्येक वेळी शिवसेनाच मुंबई करांच्या मदतीला धावत असते, कधीतरी रा. स्व. चे स्वयंसेवक आलेत का धावून, हे तरी माहित आहे का त्या परप्रांतीयांना. ज्यांनी शेयर मार्केट प्रमाणे शिवसेनेच्या जागांमध्ये उपहारानंतर प्रॉफिट बुकिंग केली. आता खरा चेहरा भाजप चा समोर आला आहे. श्री. दानवे यांची आयबीएन लोकमत ह्या चॅनेल वर मुलाखत बघितली, एका प्रश्नाला त्यांनी पुढील प्रमाणे उत्तर दिले "आम्ही एवढी राज्ये वेगळी बनवली मग मुंबई गुजरात ला कधीही जाऊ शकते", पण नंतर सारवासारव केली कि "असे होत नसते." तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील अति आत्मविश्वास बघण्यासारखा होता. ह्याचा अर्थ विदर्भ कधीही वेगळे होऊ शकते, आणि ह्याला फक्त शिवसेना थोपवू शकते.
मनसे :-
माझी घुसमट होते करत शिवसेनेतून श्री. राज ठाकरे बाहेर पडले. व सुरुवातीच्या काळात त्यांनी देखील शिवसेना अप्रत्यक्ष पणे संपवण्याचा घाट घातला होता. व मला एक हाती सत्ता द्या केले तेव्हा त्यांना एक आमदार मिळाला. आणि आता "मराठी माणसांसाठी सात फोन केले" असं सांगितल्यावर सात नगरसेवक मुंबईतून मिळाले. आणि आता अचानक त्यांना शिवसेना हि मराठी माणसांसाठी आहे ह्याची उत्पत्ती झाली. ह्यातूनच तेव्हा शिवसेना कोर कमिटी बैठकीत श्री उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदी नेमणूक का झाली होती ह्याचे उत्तर पण मिळते.
============
बाकी मुंबई महापालिकेने बांधलेल्या जल बोगद्यांमुळे गेल्या चार वर्षांपासून मुंबईची पावसाळ्यातील बरीचशी स्तिथी सुधारली आहे. अजूनही एक दोन ठिकाणी पाणी साठते ते उर्वरित दोन जलबोगदे बांधल्यावर बंद होईल. आणि बरीचशी कामे अजूनही करायची आहेत. त्यामुळे शिवसेनेने बेधडक पुढील समीकरण ह्या वेळी करून मुंबईकरांची दणदणीत सेवा करावी.
शिवसेना ८४+४
काँग्रेस ३१
एकूण ११९.