नैऋत्य दिशेला घराची बांधणी असेल तर आरोग्य चांगले लाभते असं म्हणतात. या दिशेला पाण्याची टाकी वास्तूपेक्षा उंच असणं शुभ मानलं जातं. या दिशेला उंचीवर कचराकुंडी असणं मात्र अशुभकारक असतं म्हणे. या दिशेला शौचालये बांधली तरी कुटुंबाला अशुभ फल मिळते. नैऋत्य दिशेकडे उतार असल्यास सर्व प्रकारची अशुभ फळं मिळतात. या दिशेला रिकामी जागा सोडली असेल तर फारच वाईट अनुभव येतात असं भाकित केलं जातं.
दिशांच्या अष्टलक्ष्मीमध्ये नैऋत्य दिशेचे स्थान धैर्यलक्ष्मीचे असल्याचे म्हटले आहे. नैऋत्येला जीना असेल तर शुभ आणि तेथे व्हरांडा असेल तर वाईट फळ मिळते. या दिशेला सरहद्द भिंतीवर मजला बांधला तर चांगले आरोग्य प्राप्त होते. नैऋत्येला इलेक्ट्रीक मीटर असेल तर अपघातांचा संभव जास्त असतो. वाहनतळ असल्यास शुभ फळ असते. घराच्या छपराचा उतार असल्यास हत्या, आत्महत्या घडतात असं बोललं जातं. या दिशेला डायनिंग हॉल व स्वयंपाकघर असेल तरीही अशुभ फळं मिळतात.
या दिशेला विहीर, संडास, सेप्टीक टँक असणं तसेच सर्व दिशांपेक्षा नैऋत्येला उतार असल्यास व्यसन अपकिर्ती, ग्रहपीडा, पिशाच्च बाधा, दृष्ट स्रियांचा संग, चर्मरोग, मृत्यू इ. भोगावं लागतं. ही दिशा इतर सर्व दिशांपेक्षा उंच असून त्या भागात स्टोअर रूम, जड वस्तू, कचराकुंडी आदी ठेवणं हितकारक मानलं जातं.
सौजन्य :- फुलोरा, सामना २०१११५
No comments:
Post a Comment