टीएस
तुर्कमेनिस्तानातल्या डेरवेज या गावामध्ये जमिनीला पडलेले हे अग्निदिव्य महाकाय भोक आहे. यालाच बर्निंग गेट असं म्हटलं जातं. अश्गाबात इथल्या काराकुम वाळवंटाच्या मध्यवर्ती भागात हा गेट पाहायला मिळतो. मोठमोठ्या आगीच्या ज्वाला या गेटमधून बाहेर पडत असतात. असा हा धगधगता गेट तिथे असलेल्या नैसर्गिक गॅसच्या खाणींमुळे तयार झाला आहे. हा बर्निंग होल २७० फूट खोल आहे. जमिनीखाली असणारे प्राणघातक नैसर्गिक गॅसेस बाहेर पडू नयेत म्हणून ही आग विझवण्यात आलेली नाही. खूप वर्षांपासून या गेटमधून अशाच अग्निज्वाला बाहेर पडत आहेत. इथला संपूर्ण परिसर टुरिस्ट तसेच मूळ रहिवाशांसाठी बंद करण्यात आला आहे.
सौजन्य:- फुलोरा, सामना १३०४१३

No comments:
Post a Comment