(योगेश नगरदेवळेकर)
चंद्रावर वातावरण नसल्याने सूर्यांचे किरण परावर्तित होत नाहीत, यामुळे चंद्राच्या आकाशात सूर्य आणि तारे एकाच वेळी पाहता येतात. वातावरणाच्या अभावामुळे दुर्बिणीच्या सहाय्याने आकाश निरीक्षण अतिशय चांगले होईल. आपल्याकडे रोज चंद्र पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो तसे चंद्रावर पृथ्वी रोज उगवत किंवा मावळत नाही. चंद्राच्या एका अर्ध्या भागात ती चंद्राच्या क्षितिजाजवळ वर किंवा खाली घुटमळताना दिसेल. चंद्राच्या दुसर्या अर्ध्या भागातून पृथ्वी अजिबात दिसत नाही. याचे कारण म्हणजे पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग आणि चंद्राचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग सारखाच असल्याने चंद्राची एकच बाजू आपल्या समोर असते. दुसरी बाजू बघण्यासाठी आपल्याला अंतराळात जाऊन चंद्राच्या मागच्या बाजूस जावे लागेल.
चंद्रांचा पृष्ठभाग लाव्हारसांच्या मैदानांनी बनला आहे. ही मैदाने एखाद्या समुद्रासारखी दिसत असल्याने त्यांना ‘मरिआ’ म्हणतात. चंद्रावर वातावरण नसल्याने अवकाशातून येणारी प्रत्येक गोष्ट थेट पृष्ठभागावर येऊन आपटते. या अशा अनेक अशनीच्या आघातातून चंद्रावर मोठ्याप्रमाणावर प्रचंड आकाराची विवरे बनली आहेत.
चंद्राच्या पृथ्वीवरील आकर्षणामुळे पृथ्वीवरील पाणी त्याच्याकडे खेचले जाते. यालाच आपण समुद्राची भरती-ओहोटी असे म्हणतो. जसा चंद्राचा पृथ्वीवर परिणाम होतो तसाच पृथ्वीच्या आकर्षणाचा चंद्राच्या पृष्ठभागावर ताण पडतो. आज चंद्र सुमारे ३ लाख ८० हजार किमीवर आहे हाच चंद्र काही कारणास्तव पृथ्वीच्या १५००० किमी इतक्या जवळ आला तर पृथ्वीच्या आकर्षणाच्या ताणामुळे त्याचे तुकडे तुकडे होतील. पण ते होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आपण त्या काळजीत न पडता मस्तपैकी चंद्राच्या दिशेने दुर्बिण रोखून चांद्रदर्शनाचा आनंद घेऊया.
सौजन्य:- फुलोरा, सामना १३०४१३