Saturday, June 23, 2012

पृथ्वीचे प्रेमगीत

अंदाजे वजन : ५,९४०,०००,०००,०००,०००,०००,००० मेट्रीक टन.


अंदाजे वय : ४.६ दशकोटी वर्षे. सध्याची अंदाजे लोकसंख्या : ७,०००,०००,००१.

तळ क्षेत्र : ५१०,६४७,००० चौ. कि.मी. २९.१ज्ञ्. भूमी क्षेत्र : १४८,६४७,००० चौ. कि.मी. २९.१ज्ञ्

सागरी क्षेत्र : ३३५,२५८,००० चौ. कि.मी.

एकूण पाण्याचे क्षेत्र : ३६१,४१९,००० चौ. किमी. ७०.९ज्ञ्

पाण्याचे प्रकार : ९७ज्ञ् खारट पाणी, ३ज्ञ् ताजे पाणी.

भूमध्यरेखा : ४०,०६६ कि.मी. भूमध्यरेखा. व्यास : १२,७५३ कि.मी. भूमध्यरेखा त्रिज्या : ६,३७६ कि.मी.

दोन धु्रवांना जोडणारा परिघ : ३१,९९२ कि.मी.

दोन धु्रवांमधील व्यास : १२,७१० कि.मी. दोन धु्रवांच्या त्रिज्या : ६,३५५ कि.मी.

कक्षा गती : पृथ्वी सूर्याभोवती १०७,३२० कि.मी. प्रतिताशी वेगाने फिरते.

सूर्याची कक्षा : पृथ्वी सूर्याभोवती ३६५ दिवस, ५ तास, ४८ मिनिटे आणि ४६ सेकंद फिरते.

सौजन्य :- फुलोरा, सामना 230612

गॅझेटस् - पॉवर टेक्नॉलॉजी

- ल्युमिनसची नवी सौर उत्पादने... ‘सौरचार्ज कंट्रोलर’ आणि ‘सौरदिवे’


सूर्याच्या उर्जेने चार्ज होणारे दिवे. तसेच मुख्य वीजप्रवाहातूनही चार्ज होणार.

इंटेन्सिटी कंट्रोल, मायक्रो कंट्रोलर या वैशिष्ट्यांनी युक्त.

केवळ एका रिचार्जमध्ये कमीतकमी १६ तास बॅकअप क्षमता.

सौरदिव्यांत समाविष्ट असलेल्या विशिष्ट पॉइंटसोबत मोबाईल चार्ज करण्याचीही सुविधा.

पोर्टेबल एसी


- कोणत्याही प्रकारच्या इन्स्टॉलेशनची गरज नाही.


- कुठेही नेता येणारा, सुटसुटीत एसी.

- ऍटोमॅटिक रिस्टार्ट होणार.

- इंटेलिजन्ट स्लीप मोड ऑपरेशन.

- क्वीक कंट्रोल तंत्रज्ञान

स्टीरीओ ब्लुटूथ

- सुपर्ब ऑडिओ क्वालिटीसाठी नोकियाचा नवा ब्लूटूथ स्टीरीओ हेडसेट.


- फक्त ७० ग्रॅम वजन आणि सलग ११ तासांचा बॅटरी बॅकअप

- मधूर संगीतात हरवून जाल. तरीही कोणताही कॉल मिस करणार नाही. म्युझिक प्लेअर आणि कॉल यासाठी वेगवेगळ्या कीज.

- उच्च प्रतीचा स्टीरीओ साऊंड. वेळ वाचविणारे फास्ट चार्जिंग.

- स्टायलीश डिझाईन. कानांसाठी खास रचना.

सौजन्य :- फुलोरा, सामना 230612   

Saturday, June 09, 2012

वायरसचा ताप


कम्प्युटरवर काम करताना मध्ये मध्ये सतत एक विंडो ओपन होते ती म्हणजे ऍण्टी वायरसची... काम करताना याचा अडथळा होतो म्हणून त्यावेळी ती तापदायक वाटते पण हा ऍण्टी वायरस आपल्या कम्प्युटरमध्ये असणं तितकचं गरजेचं आहे. ऍण्टी वायरस कम्प्युटरच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असून इंटरनेटवर काम करताना याची अधिक गरज भासते.


इंटरनेट एक्सप्लोरर हा जगातली सर्व माहिती पुरविणारा ब्राउजर अशी याची ख्याती असली तरी सर्वच कम्प्युटर्सना व्हायरस पुरवणारा ब्राउजर अशी कुख्यातीही आहे. गुगल सारख्या साइट्सवरून माहिती शोधताना हे वायरस येतात. शिवाय सोशल नेटवर्कींग साईट, पॉपअप्स, इंटरनेट जाहिरातीतूनही हे वायरस येतात.

- वायरसमुळे कोणताही डेटा करप्ट होऊ नये म्हणून ऍण्टी व्हायरस सोल्यूशन कम्प्युटरमध्ये असावं लागतं. हा ऍण्टी वायरस नेहमी अपडेट करावे लागतात.

- याचे डाऊनलोडिंग इंटरनेटवरून करता येते. हे ऍण्टी वायरस इंटरनेटच्या साइट्सवरून फ्री घेता येतात.

- ऍविरा, एव्हीजी, नॉरटॉन, थ्रेटफायर, कास्कपर्सकी हे ऍण्टी वायरस इंटरनेटवरून डाऊनलोड करता येतात.

- ऍण्टी वायरस प्रत्येकवेळा ऍक्टीव करण्याची गरज नसते. एकदा डाऊनलोड केल्यावर ते केवळ अपडेट करावे लागतात.

- ऍण्टी वायरस सुमारे सहा महिन्यात अपडेट करावे लागतात. पण हे तो ऍण्टी वायरस कोणता आहे यावर अवलंबून आहे.

सौजन्य : फुलोरा, सामना