आताच काही दिवसांपूर्वी सोसायटी
आवारात बसण्यासाठी बाकडी लावण्यात आलीत. सोसायटी ची परवानगी न घेता थेट अशी बाकडी लावणे
म्हणजे अतिक्रमण नाही का ? असाच गैर व्यवहार कायदेशीर मार्गाने जलवंती अपार्टमेंट,
नवीन शिंदे आली इथे करण्यात आला आहे. रजिस्ट्रेशन क्र. TNA/AMB/HSG/(TC)/24025/2012-13. सोसायटी ला दोन वर्षे चेअरमन नसल्यामुळे इमारती
मधील घाटकोपरला राहण्याऱ्या नगर सेवकाला सहा महिन्यासाठी चेअर मन बनविण्यात आले होते.
सदर माजी चेअरमन नि बरोबर जेव्हा अंबरनाथ निवडणूक
कार्यालय कडून सोसायटी ची निवडणूक घेतली जाते, त्या दरम्यान गेली १३ वर्षे बंद असलेले
सोसायटी चे गॅरेज बिल्डर च्या संगनमताने परस्पर
विकले. सोसायटी २०१२ सालापासून रजिस्टर आहे. त्या नंतर हि गॅरेज चा व्यवहार बिल्डर करू शकले नव्हते. कारण, माजी सेक्रेटरी एक
हाती बिल्डर विरुद्ध लढत होते. बिल्डर जेव्हडे गिर्हाईक पाठवायचा तेवढ्या गिर्हाईक
ना हाकलून लावायचे. पण सोसायटी मधील सर्व सदस्यांनी हि बाब गांभीर्याने घेतली नाही.
गॅरेज विकत घेणारा बिजनेसमॅन आहे. म्हणजे, ह्या त्रिकुटाने (नगरसेवक, बिल्डर, बिजनेसमॅन)
बरोबर वेळ साधत गॅरेज ला फ्लॅट दाखवून परस्पर रेजिस्ट्रेशन केले. सोसायटी ची एन ओ सी
न घेता.
त्या बिजनेसमॅन ने तर आता सोसायटी
मेंबर वर (आजी चेअरमन, आजी खजिनदार, दोन मेंबर) दादागिरी करत वीज मीटर पण फिक्स केला
आणि गॅरेज वापरायला पण सुरुवात केली.
सोसायटी ने सदर मेंबर ला अजून
शेयर सर्टिफिकेट दिलेलं नाही. म्हणजे, आज हि
पैश्याने सामर्थ्यवान व राजकीय शक्ती असणाऱ्यांची गुलामगिरी सामान्य मेंबर्स ना करावी
लागत आहे. आता काही प्रश्न निर्माण होतात ते असे -
१. महारेरा नुसार फक्त नोंदणी
कृत प्रोजेक्ट चा व्यवहार होऊ शकतो, मग अनोंदणीकृत गॅरेज चा व्यवहार रजिस्टर करण्याची
बिल्डर ची हिम्मत कशी झाली ?
२. रेजिस्ट्रार काय फक्त स्टॅम्प
ड्युटी पेयमेन्ट वर रेजिस्ट्रेशन करून देतात ? असे व्यवहार रजिस्टर करताना महारेरा
सर्टिफिकेट ची मागणी का करत नाहीत. ?
३. एकदा रजिस्टर झालेले डोकमेण्ट
रेजिस्ट्रार परत कॅन्सल करू शकत नाहीत, अशी म्हणे कायद्यात तरतूद आहे ? मग, रेजिस्ट्रार
रेजिस्ट्रेशन करण्यापूर्वी सोसायटी एन ओ सी का मागत नाहीत ?
४. महावितरण (वीज विभाग) फक्त
अग्रीमेंट वर वीज जोडणी कशी देऊ शकतात ? ते सोसायटी एन ओ सी ची मागणी का करत नाहीत
?
५. मुनिसिपालिटी टॅक्स विभाग
फक्त अग्रीमेंट वर टॅक्स नाव कसे बदलू शकतात ? ते सोसायटी एन ओ सी ची मागणी का करत
नाहीत ?
६. आता सर्व डेटा (माहिती) ऑनलाईन
मध्ये उपलब्ध आहे. मग रेजिस्ट्रार, महावितरण, मुनिसिपालिटी पाच मिनिटे खर्च करून सदर
सोसायटी रजिस्टर आहे कि नाही हे चेक करू शकत नाहीत का ?
७. माननीय सुप्रीम कोर्ट च्या
एका निर्णयानुसार गॅरेज हे सध्या राहत असलेल्या मेंबर ना कॉमन फॅसिलिटी म्हणून वापरण्यासाठी
असते. नुसते गॅरेज बिल्डर सेपरेट युनिट किंवा फ्लॅट दाखवून विकू शकत नाही. 2010
Judgement Nahalchand Laloochand Pvt. Ltd. v Panchali Co-operative Housing
Society Ltd. (AIR 2010 SC 3607).
मग प्रश्न असा उभा राहतो कि काय
महारेरा हे सुप्रीम कोर्ट पेक्षा मोठे आहे ?
८. आणि हौसिंग फेडेरेशन चा तर स्वतंत्र कारभार आहे.

मेम्बर्सनी महावितरण कर्मचाऱ्यांना
मीटर जोडण्यास मज्जाव केला तर त्यानेही दादागिरीत सांगितले, "आम्ही मीटर जोडणारच.
नंतर तुम्ही तो फोडूही शकतात." म्हणजे,
जेणे करून सोसायटी मेंबर फौल्ट मध्ये येतील. हे असं सर्व वातावरण निर्माण झाले आहे.
अर्धे मेंबर तर मुंबईत राहतात, त्यांनी फ्लॅट भाड्यावर देऊन ठेवले आहेत. त्यांना सोसायटी
बद्दल काही देणेघेणे नाही. आणि इथे वास्तव्यास असणाऱ्या सरळ मार्गी मेंबर्स ना चीड
येतेय, पण काही करू शकत नाहीत. एकूणच काय, आम्ही एक एक दिवस ह्या भीतीत घालवत आहोत,
कि आमचा फ्लॅट परस्पर विकला जाऊ नये, नाहीतर आमच्यावर पण बेघर व्हायची वेळ येईल.
सध्याचे खजिनदार ज्यांनी सर्वांतर्फे पुढाकार घेऊन विरोध केला होता, त्यांना मारण्यासाठी इमारतीच्या आजूबाजूस माणसे उभे ठेवण्याची तयारी त्या गॅरेज खरीददाराने केली होती, असे हल्लीच खजिनदारांच्या पत्नीकडून कळले. त्यामुळे, त्या खजिनदारानी पण इमारतीत येण्याचे जवळ जवळ बंद केले आहे. आता, ते परिवाराला घेऊन त्यांच्या सासऱ्यांच्या घरी राहत आहेत.
अर्थात, माझ्या मते खजिनदारांचे मत पण बरोबर आहे. त्यांचे म्हणणे आहे, "सेक्रेटरी बाहेर राहणार निवडला आहे. तो येत नाही, लक्ष देत नाही, मग मी कशाला सर्वांसाठी लढू". कारण, त्या गॅरेज वाल्याने जबरदस्ती ने वीज मीटर लावल्यावर, आजी खजिनदार, आजी चेयरमन, आणि काही सदस्यांनी एका लोकल नगरसेवकाचा सल्ला घेतला. त्यांनी, बदलापूर मुनिसिपालिटी, पोलीस स्टेशन व वीज मंडळाला ठराविक मथळा असलेले पत्रं सोसायटी तर्फे सबमिट करा असे सांगितले होते. त्या पद्धतीने मी पत्राचे फॉरमॅट बनवून आजी खजिनदाराना दिले. आज १५/८/२०१९ आहे, त्या अनुषंगाने जी मागची सभा झाली, त्यात इथे राहणारे सोसायटी सदस्य त्या पत्रांवर सही करून वरील संस्थांना ती पत्रं वरील सबमिट करतील, असे अपेक्षित होते.
पण, त्या मीटिंग मध्ये माजी खजिनदाराने त्याच्या पत्नीला बोलवून माझ्यावर आरोप करायला सुरुवात केली, "ह्याने, (म्हणजे मी) गॅरेज विकण्यात माझा (म्हणजे त्या खजिनदराचा) पण सहभाग आहे." आणि, मी असे बोललो हे प्रूफ करण्यासाठी त्या माजी खजिनदारांची पत्नी उपस्थित सदस्यांवर प्रेशर टाकत होती, मी वरील वाक्य बोललो म्हणून. त्या सर्व उपस्थित सदस्यांनी सांगितले, "संदिप तसा बोललेलं नाही." तर त्यांची पत्नी सदस्यांशी भांडायला लागली व मग आमची बाचाबाची सुरु झाली, तेव्हा माजी खजिनदाराच्या तोंडून त्यांच्या मनातील गोष्ट बाहेर पडली व त्यांनी मला धमकी दिली, "तू इथे राहतोस कसा, तेच बघतो." आणि, त्यांच्या पत्नीने खाली उतरताना आमच्या दारात धमकी दिली "घरात घुसून मारिन." मागे पण, एका वेगळ्या विषयावरून सदर महिलेने आम्हाला अशीच धमकी दिली आहे. आम्ही, आता पर्यंत ह्या धमक्यांना उत्तर दिलेले नाही.
तरी पण मी कळवळीने सांगत होतो, ह्या लेटर्स वर विचार करा व सबमिट करूयात. तेव्हा माजी खजिनदाराने उद्धटपणे दुसऱ्यांदा मला सांगितले, "तू मेंबर नाही, तुला काय करायचे आहे, मेंबर बघतील."
त्यामुळे, मग मला आजी सेक्रेटरी वर पण शंका आलीय, माझ्यावर आरोप होत असताना माझी बाजू मांडण्यासाठी मला बोलावले नव्हते, मोठं मोठे आवाज यायला लागले तेव्हा मी स्वतः वर मीटिंग मध्ये गेलो, तेव्हा वरील प्रकार घडला. आणि, मग त्या सेक्रेटरी ने मीटिंग कॅन्सल केली, त्यामुळे आम्हाला मिळालेली धमकी आम्ही सर्व मेंबर समोर मांडू शकलो नाही. तसेच, जी पत्रं सोसायटी तर्फे संस्थांना सबमिट करायची होती, तो विषय पण बाजूला राहिला.
आता तर तो गॅरेज खरेदीदार बिनधास्त झाला आहे, अधिकृत मेंबर बनवलेला नसताना पण त्याने डायरेक्ट गॅरेज भाड्यावर दिले आहे व दिवस रात्र वापरायला सुरुवात केली आहे.
माझे वडील (माजी सेक्रेटरी) पण त्यामुळे आता घाबरले आहेत. आणि, आम्ही सांगितलं, पोलिसात तक्रार करूयात, तर काहीच बोलले नाहीत. त्यामुळे, मी पण गप्प बसलो आहे, कारण, बिल्डर, घाटकोपरच नगरसेवक, तो बिजनेसमॅन हे आर्थिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या पॉवरफुल समजले जातात. आणि, ह्यांना मेंबर्स मधून कुणाकुणाचा छुपा सँपोर्ट आहे ते हि माहित नाही. त्यामुळे, आता आम्हाला आमचा स्वाभिमान बाजूला ठेवून घाबरून शांत पणे तणावाखाली राहावे लागत आहे.
(वरील लेख हा घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे, त्यामुळे जर शक्य झाले तर आम्ही ह्या इमारतीत फ्लॅट घेतल्यापासूनच्या घटना पण जर मन झाले तर मांडू. आता मी खूप उद्विग्न आहे, कारण, कायदेशीर खोटे व लबाड वागणाऱ्या लोकांविरुद्ध लढ्याची हिम्मत आता पूर्वी प्रमाणे लोकांमध्ये राहिलेली नाही.)