एवढे
पत्र व्यवहार करून सुद्धा एक्सर्बिया ला काहीच फरक पडत नाही,, हे लक्षात आले व मग आम्ही
रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करूया असं ठरवलं.
४ जुलै,
२०१७ रोजी ०२०-६५२६८९१७ ह्या क्रमांकावरून पत्नीच्या मोबाईल वर फोन आला, व पत्नीने
१४ जुलै हि रजिस्ट्रेशन ची तारीख नक्की केली व त्या रेप्रेसेंटेटिव्ह ला सांगितले कि,
सर्व डिटेल्स ई-मेल / एस एम एस करा. पण काहीच हालचाल आली नाही. आणि... १६ जुलै, २०१७
ला १८.२८ वाजता ०२२-६१३२७०३२ ह्या नंबर वरून मिस स्नेहा ने कॉल केला होता. त्यातील
संभाषणाचा काही भाग :-
पत्नी
:- तुमच्या पुणे ऑफिस मधून कॉल आला होता, १४ जुलै ला रजिस्ट्रेशन ठरले होते, पण काही
हालचाल आली नाही.
स्नेहा
:- ते आंम्हाला काही माहित नाही. तुम्हाला पुढच्या दोन दिवसात रजिस्ट्रेशन ला यावं
लागेल.
पत्नी
:- पण आम्हाला अजून काय डोकमेण्ट पाहिजे, रजिस्ट्रेशन साठी कुठे यायचे, विटनेस ना सोबत
घेऊन येण्यासाठी ते हि उपलब्ध हवेत. २२ जुलै २०१७ ला येऊ का ?
स्नेहा
:- (मोठ्या आवाजात उद्धटपणे). तुम्हाला समजत
नाही. मी तुम्हाला २१ जुलै, २०१७ अगोदर यायला सांगत आहे.
मग
मात्र पत्नी माझ्या प्रमाणेच भडकली. तिलाही जाणवलं कि, एक्सर्बिया हे प्रोस्पेक्टिव्ह
कस्टमर ना त्यांचे ग्राहक म्हणून नाहीतर, कर्जदार म्हणून वागवतात. मी पत्नीला म्हणालो,
तिचे नाव विचार.
पत्नी
:- (मोठ्या आवाजात). मी १४ जुलै २०१७ ला एक आठवडा अगोदर सुट्टी संकशन करून घेतली होती.
तुमचे पुणे ऑफिस व नेरुळ ऑफिस काही असो. आम्ही एक्सर्बिया शी बोलत आहोत असे समजतो.
आणि तुम्हाला सर्व डोकमेण्ट पाहिजे, दोन विटनेस पाहिजे हे तुमचे नियम आहेत. आम्ही काही
रिकामे बसलेलो नाही. मी सोमवारी १७ जुलै २०१७ ला ऑफिस मध्ये जाऊन तारीख सांगते.
स्नेहा
:- तुम्ही २१ जुलै २०१७ पर्यंत रजिस्ट्रेशन केले तर विटनेस आम्ही अरेन्ज करू. आधार
कार्ड, पण कार्ड, ४ फोटो घेऊन या. अर्जदार व सह अर्जदाराचे डिटेल्स आणा.
पत्नी
:- आम्ही १९ जुलै २०१७ ला येऊ, तरी पण कन्फर्म मी सोमवारी १७ जुलै ला ऑफिस मध्ये गेल्यावर
सांगेन.
त्या
नुसार मग पत्नीने १७ जुलै ला संध्याकाळी मिस स्नेहा ला फोन करून कन्फर्म केले. मग १८
जुलै ला मिस स्नेहा ने पुणे ऑफिस मधला नंबर देऊन मग तिथे कॉन्टॅक्ट करायला सांगितले,
त्या नुसार पत्नीने चार जणांना फोन केले व मग रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जो एक्सर्बिया
चा रिप्रेसेंटेटीव्ह आहे त्याचा नाव, नंबर, रजिस्ट्रार ऑफिस चा पत्ता व डॉक्युमेंट
लिस्ट मेसेज मध्ये पाठवायला सांगितले. ते सर्व डिटेल्स मग रात्री ९ च्या सुमारास १८
जुलै ला मोबाईल मध्ये आले.
त्या
नुसार मग १९ जुलै ला ज्या प्रमाणे मिस स्नेहा ने जोर देऊन सांगितले होते कि, ९.३० वाजता
पोहचायचे आहे, त्या प्रमाणे ट्रेन उपलब्धते प्रमाणे आम्ही ९.४५ ला कर्जत स्टेशन ला
उतरलो. व कुणाल ला फोन करण्याचा ४ ते ५ वेळा प्रयत्न केला तेव्हा फोन वरून कसे पोचायचे
ते विचारून घेतले. त्याचा वोडाफोन चा क्रमांक असल्याने पटकन लागत नाही. मग आम्ही कल्याण
दिशेकडील कर्जत चा पश्चिमे कडील पूल उतरून रिक्षा पकडली रजिस्ट्रार ऑफिस करिता. स्पेशल
रिक्षाने दोघांचे फक्त रु २०/- घेतले, तोच बदलापूर मध्ये दर रु ४०/- आहे, आणि बदलापूर
रिक्षाने कारण दिलं असत कि पसेंजर मिळत नाही. आम्ही कर्जत च्या रेजिस्ट्रेशन ऑफिस ला
पोचलो तिथे तर रस्ता संपतो, आणि पॅसेंजर ची संख्या पण नगण्य असते. आणि तिथून कर्जत
शहराचे जे रमणीय दृश्य पावसाळ्यात दिसते ते बघण्यासाठी एकदा तरी त्या डोंगरावर प्रत्येकाने
चालत गेले पाहिजे. आम्ही परत येताना चालताच
आलो. १२ मिनिटे लागली.
आम्ही
१० वाजता दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात पोचलो. व कुणाल ला फोन केला तेव्हा त्याने
फक्त बसायला सांगितले, पण रेजिस्ट्रेशन विंग ला जावे लागेल असे काही मिस स्नेहा ने
सांगितले नव्हते. मग आम्ही मॅजिस्ट्रेट च्या कार्यालयाबाहेर बसून वाट पाहू लागलो. पुन्हा
१०.३० च्या दरम्यान त्याला फोन केला, तेव्हा तो ट्रेन मध्ये होता. ११ ला पुन्हा फोन
केला तेव्हा पुन्हा फोन लागत नव्हता. मग ११.१५ दरम्यान कुणाल भेटला व आम्हाला रजिस्ट्रेशन
विंग ला घेऊन गेला, तिथे अगोदर पासून एक्सर्बिया चे प्रोस्पेक्टिव्ह कस्टमर बसलेले
होते. मग ११.३० च्या दरम्यान तो रजिस्ट्रेशन चे सर्व कागदपत्रे घेऊन आला.
आमचे
नाव कुणाल सोबत असलेल्या दुसऱ्या मुलाने पुकारले तेव्हा पब्लिक डेटा फॉर्म मधील डिटेल्स
चेक करायला सांगितले, जसे नाव, पॅन, पत्ता, अग्रीमेंट वाल्ह्यू, वय वगैरे. त्यात आम्हाला
लक्षात आले कि, वय व पत्ता टाकलेलाच नाही. ते आम्ही निदर्शनास आणून दिले. म्हणजे आम्ही
एक्सर्बिया ला रेजिस्ट्रेशन फॉर्म दोन्ही ऑफिसेस ला पाठवून सुद्धा हि त्रुटी राहिली
होती. मग अश्या प्रकारे सर्वांचे फॉर्म तो करेक्शन साठी दु १२.१५ च्या दरम्यान आत घेऊन
गेला.
त्याच
वेळेला री-शेड्युल केलेले कस्टमर, म्हणजेच ज्यांचे रेजिस्ट्रेशन पुढे ढकलले होते, ते
सुद्धा आले होते. त्यामुळे कुणाल व त्याच्या सोबत असलेल्यांची तारांबळ उडत होती. त्यामुळे
मग त्या कस्टमर चे रेजिस्ट्रेशन पहिल्यांदा घेण्यात आले. आणि मग आमच्या प्रमाणे आलेले
१९ जुलै चे सर्व कस्टमर वाट पाहत बसलो.
त्या
नंतर साधारण दु १.४५ च्या दरम्यान आम्हाला आवाज देण्यात आलो व कुणाल आम्हाला रेजिस्ट्रार
च्या केबिन मध्ये घेऊन गेले. तिथे नुसता गोंधळ सुरु होता.. इतर बिल्डर चे पण कस्टमर
उभे होते. मग दु २.१० च्या दरम्यान रेजिस्ट्रार
चा सर्वर डाउन झाला. मग काय पुन्हा २.३० ला लंच टाइम झाला, तो ३ वाजे पर्यंत. मग आम्ही
सुद्धा थोडा नाश्ता करून आलो. मग ३.१० च्या दरम्यान पुन्हा आम्हाला केबिन मध्ये घेऊन
गेले. तिथे मग फोटो काढण्यात आला व डाव्या अंगठ्याचे बायो मेट्रिक करण्यात आले व आम्हाला
पुन्हा बाहेर थांबण्यास सांगण्यात आले. मग ५ मिनिटाने तो मुलगा सर्व सेट घेऊन आला,
त्या दोघांचे पॅन कार्ड व आमच्या पॅन कार्ड चे झेरॉक्स एका पानावर ४ असे काढून आणायला
सांगितले. तो पर्यंत पत्नीने अर्जदार म्हणून त्या सेट वर दाखवलेल्या जागेवर सही व अंगठा
केला. मग मी हि झेरॉक्स आणून दिली व सह अर्जदार म्हणून सही व अंगठा केला. आणि मग त्या मुलाने सर्व सह्या चेक करून सांगितले आमचे रेजिस्ट्रेशन पूर्ण झाले.
हुश्श...
मग आम्ही सुटकेचा निश्वास टाकून दु ३.३० ला बाहेर पडलो, म्हणजे काही सह्या व अंगठ्या
साठी ६ तास लागले. इथे "अच्छे दिन" अजून आले नाहीत वाटत.
क्रमश
: