Saturday, March 31, 2018

स्वप्नातील घर : भाग ८ - अनियमिततेचा कळस

२८ व २९ मे, २०१७ ला रेजिस्ट्रेशन व व्हॅट रक्कम मागणी करणारा ई-मेल आला. शाहूल साठे ने ई-मेल सही केला होता. पहा



हा ई-मेल वाचून तर काय बोलावे तेच कळत नव्हतं. रेजिस्ट्रेशन व व्हॅट रक्कम ऍडव्हान्स मध्ये भरलेली असून सुद्धा व त्याची रीतसर आमच्या कडे पावती असताना सुद्धा असा ई-मेल येतो म्हणजे हा तर अनियमिततेचा कळसच एक्सर्बिया ने गाठला होता असं म्हणायला हरकत नव्हती. एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट करणाऱ्या कंपनीत अशी अनियमितता असते, हे पाहून तर आम्ही सुन्नच झालो. बरं, एवढी अनियमितता कि, पुणे कार्यालयातून फोन पण येत होता, रक्कम भरण्यासाठी आणि होम लोन सॅंक्शन लेटर पाठविण्यासाठी.

म्हणजे, बघा जेव्हा आम्हाला गृह कर्ज मान्यतेचे पत्रं मिळालेले, तेव्हाच त्याची प्रत आम्ही स्पीड पोस्ट केली होती, हे तुम्ही मागील लेखात वाचलेच आहे. तरी एक्सर्बिया गृह कर्ज मान्यतेचे पत्रं परत मागत होती.

मग, एकदा साठे ने पत्नीला फोन वर सांगितले, मी तुम्हाला ट्रायल ई-मेल पाठवतो त्यावर होम सॅंक्शन लेटर पाठवा व रेजिस्ट्रेशन व व्हॅट रक्कम लगेच भरा.

मग मात्र परत माझ्यातला अकाउंटंट व ग्राहक जागा झाला, व आम्ही साठे ला १ जून, २०१७ ला ई-मेल द्वारे उत्तर दिले. कारण, व्हॅट रक्कमेची परत मागणी करणे म्हणजे एक्सर्बिया ने गोळा केलेल्या  कराचा उपयोग बिजनेस खर्चासाठी केला असा होतो, जे कि तेव्हाच्या महाव्हॅट कायद्यानुसार चुकीचे होते,,, पण आता GST मुळे व्हॅट कायदाच रद्द झाला आहे. बघा.

मग १५ दिवस उलटून गेल्यावर आम्हाला वाटलं, सर्व शांत झालं म्हणून,,, पण कसलं काय !! आता मिस श्वेता चा फोन यायला सुरुवात झाली, होम लोण संकशन लेटर मागणी करण्याचा. मग पत्नीने तिला तिचा ऑफिसिअल ई-मेल आयडी एसएमएस करायला सांगितलं. परत श्वेता चा फोन पत्नीला आला होता, "मॅडम प्लिज, एच डी एफ सी कडून आलेले होम लोण संकशन लेटर चा ई-मेल फॉरवर्ड करा."  मग आम्ही तो एच डी एफ सी चा ई-मेल पण फॉरवर्ड केला. आणि त्यात पुन्हा एकदा रेजिस्ट्रेशन प्रोसिजर व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागद पत्रांची विचारणा २१ जून २०१७ ला केली. पण काही उत्तर आले नाही, म्हणून मग पत्नीने स्वतः ई-मेल ११ जुलै २०१७ रोजी टाईप करून पाठवला. बघा.



त्यानंतर, आम्ही परत तिला गृह कर्ज मान्यता पत्रं, साठे चा ई-मेल व स्पीड पोस्ट रिपोर्ट ज्याद्वारे आम्ही हार्ड कॉपी पाठवली होती, तोही दाखवला. बघा तो ई-मेल -

  
 
अश्या प्रकारे एक्सर्बिया ने अनियमिततेचे कळसावर कळस गाठले होते.
=================================
क्रमश :
हि लेखमालिका स्व-अनुभवावर आधारित आहे. ह्यात कोणत्याही व्यक्ती वा संस्थेचा अपमान किंवा मानहानी किंवा जाहिरात करण्याचा हेतू नाही. पण आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाला स्वतःचे घर घेताना येणाऱ्या प्रक्रियांचा अनुभव व्हावा हाच उद्देश आहे. कारण, इतर कोणीही त्यांना घर घेताना काय प्रक्रिया करावी लागली व काय सतर्कता बाळगावी लागली हे दुसऱ्याला सांगत नाहीत. म्हणून वाटले आपल्या सोबत घडणाऱ्या घटना आपल्यासारख्याच इतरांना मार्गदर्शक ठरतील, म्हणून हा खटाटोप.