Thursday, December 14, 2017

स्वप्नातील घर : भाग ७ – सर्च

१२.०४.२०१७ रोजी पत्नीने कामावरून घरी आल्यावर सांगितले कि, एक्सर्बिया मधून फोन आला होता कि, काहीतरी इंटरेस्ट (व्याज) लावणार आहेत म्हणून. मग तिला फोन करायला सांगितले व मी बोललो, मिस स्नेहा ने फोन रिसिव्ह केला होता. 

स्नेहा :- तुम्हाला रेजिस्ट्रेशन साठी जावे लागेल. जर रजिस्ट्रेशन नाही केले तर तुम्हाला व्याज लावले जाईल. (हे ऐकून तर डोके आणखीन सटकले).

मी :- व्याज कोणत्या बेसिस वर लावणार ? एक्सर्बिया ने सांगितले होते, PMAY चा लाभ मिळेल, पण तेही नाही. बुकिंग च्या वेळी ग्राहकांना राजा प्रमाणे वागवता व नंतर साईट वर गेल्यावर नुसते पाणी पण पिऊ देण्यास मज्जाव केला जातो. आणि आम्ही एक महिन्यापूर्वी रजिस्ट्रेशन प्रक्रिया विचारली होती, त्याचा तुम्ही आता उत्तर दिले आहे. आम्ही आता एक महिना गावी जात असल्यामुळे व पूर्वी सांगितल्याप्रमाणे महिन्याच्या १-१५ तारखे पर्यंत सुट्टी घेऊ शकतो, त्या अनुसार जून मध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो.

स्नेहा :- ते आम्हाला काही माहित नाही आणि PMAY चे बेनेफिट आम्ही देऊ शकत नाही. ते सरकार वर अवलंबून आहे. आणि आम्ही संगणक सिस्टिम ला सांगू शकत नाही, तुम्ही गावाला गेला आहेत वगैरे,, सिस्टिम आपोआप व्याज लावणार. 

(आणि तिचा बोलण्याचा टोन अश्या प्रकारे होता, जसे आम्ही एक्सर्बिया कडूनच कर्ज घेतले आहे. म्हणजे बघा, PMAY होऊन जाईल सांगणारी एक्सर्बिया ने तर नुसते हातच वर केले नव्हते, तर ग्राहकांना सुद्धा अधांतरी सोडून दिले. आता तर डोके सैरभैरच झाले होते. मग मी सुद्धा भडकलो.)

मी :- एक्सर्बिया मस्त प्लांनिंग करून ग्राहकांना गळाला लावते. आमची अशी फसवणूक एकदा बदलापूर डॉमिनोज ने केली होती व आम्ही ऍक्शन घेतल्यावर त्यांना एक आठवडा दुकान बंद ठेवायला लागले होते. तुम्ही जर व्याज लावले तर बघा. आम्ही आमची परिस्थिती मांडली आहे. आणि लोन सॅंक्शन म्हणजे हे आमचे पैसे आहेत. आम्ही HDFC चे कर्जदार आहोत. आम्ही आता देखील फ्लॅट बुकिंग रद्द करू शकतो. पण तुमच्या रु. ५०,०००/- च्या जाचक अटींमुळे अडकले गेलो आहोत.

मग मात्र मी ठरवलं, आपला पूर्ण अकाउंटिंग चा अनुभव लावून डिटेल मध्ये लेटर लिहावे लागेलच. कंपनी निबंधकाच्या (Registrar of Companies) वेबसाईट वरून एक्सर्बिया ची आर्थिक परिस्थिती चेक करण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात आले कि, ३१.०३.२०१५ व ३१.०३.२०१६ ची बॅलन्स शीट पण फाईल केलेली नाही. मग मात्र पूर्ण चित्र स्वच्छ झाले कि, आपण एका अनियमित कंपनी बरोबर करार केला आहे. हा बघा ROC (कंपनी रेजिस्ट्रार) च्या वेबसाईट वरून डाउनलोड केलेला रिपोर्ट.
पण आता त्याचा काही उपयोग नव्हता, आम्ही पूर्ण अडकले आहोत. आता मात्र हे पत्रं आम्ही नवी मुंबई व पुणे ऑफिस दोन्ही ठिकाणी पाठवले. बघा ते पत्रं –


 
स्पीड पोस्ट डिलिव्हरी रिपोर्ट (पुणे व नवी मुंबई):-


आम्ही गावी जायची तिकिटे काही प्रूफ म्हणून मिस स्नेहा ला फॉरवर्ड केली नाही, कारण त्याचा तसा हि काही उपयोग झाला नसता हे आज घडीला वाटत आहे. फक्त तुमच्या माहिती साठी इथे पोस्ट करत आहोत. म्हणजे आमची बाजू खरी आहे, हे तुमच्या लक्षात येईल.

कारण इंटरेस्ट (व्याज) लावणे हि त्यांची प्रॅक्टिसच असेल, मी असे का म्हणतोय ते तुम्हाला पुढील लेखांमध्ये कळेलच.
क्रमश :
=============================
हि लेखमालिका स्व-अनुभवावर आधारित आहे. ह्यात कोणत्याही व्यक्ती वा संस्थेचा अपमान किंवा मानहानी किंवा जाहिरात करण्याचा हेतू नाही. पण आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाला स्वतःचे घर घेताना येणाऱ्या प्रक्रियांचा अनुभव व्हावा हाच उद्देश आहे. कारण, इतर कोणीही त्यांना घर घेताना काय प्रक्रिया करावी लागली हे दुसऱ्याला सांगत नाहीत. म्हणून वाटले आपल्या सोबत घडणाऱ्या घटना आपल्यासारख्याच इतरांना मार्गदर्शक ठरतील, म्हणून हा खटाटोप.