प्राचीन काळापासून चांगले आरोग्य लाभावे म्हणून तांब्याचा वापर केला जात होता. आजही हे महत्त्व कायम आहे. तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ते सकाळी अनशापोटी घेतल्याने अनेक आजार नाहीसे होतात. इतर धातूंच्या तुलनेत तांब्यावर विषाणूंची संख्या सुमारे ९० टक्क्यांनी कमी आढळते असे एका अभ्यासातून निदर्शनास आले आहे. दैनंदिन जीवनात स्टील, लोखंड, ऍल्युमिनिअम अशा अनेक धातूंचा संपर्क येत असतो. यामुळे मोठ्या प्रमाणात विषाणू आपल्या शरीरात जातात. याला पर्याय म्हणून फायबर हा प्रकार वापरात आणण्यात आला. मात्र यावरही विषाणू अधिक आढळून आले.
तांब्याच्या भांड्याचा जेवण करताना किंवा पिण्याच्या पाण्यासाठी सातत्याने वापर झाल्याने आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. या दरम्यान त्या व्यक्तींमधली रोगप्रतिकारशक्तीही वाढली आहे. यामुळे आजारांशी दोन हात करताना खबरदारी म्हणून तांब्याच्या भांड्याचा वापर केला पाहिजे.
सौजन्य:- चिरायू, सामना ०४०८२०११.
No comments:
Post a Comment